डॉ. रवींद्र निमसे, डॉ. समीर ढगेपावसाळा हा शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्यासाठी एक संवेदनशील कालावधी असतो. या काळात वातावरणातील आर्द्रता, थंडी-उष्णतेतील बदल, ओलसर परिस्थितीमुळे विविध संसर्गजन्य व परजीवी आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. योग्य आरोग्य व्यवस्थापन तसेच नियमित लसीकरण आवश्यक आहे..घटसर्पजिवाणूमुळे होणारा अत्यंत घातक व वेगाने पसरणारा आजार आहे. विशेषतः भरपूर पोषण किंवा पचन बिघडल्यावर याचा उद्रेक होतो. वेळीच लस दिली नाही, तर शेळ्या, मेंढ्यांमध्ये मृत्युदर अत्यंत जास्त असतो.जास्त वयाच्या मेंढीपेक्षा कमी वयाच्या कोकरांमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.पीपीआरसंसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. यामध्ये ताप येणे, डोळे व नाक वाहणे, तोंडात जखमा, अतिसार आणि मृत्यू होतो.विशेषतः ६ महिन्यांपासून पुढील वयातील शेळ्यांमध्ये याचा धोका अधिक असतो. ही लस तीन वर्षांतून एकदा द्यावी..लाळ्या खुरकूतएक विषाणूजन्य आजार आहे. तोंड, जीभ, खुरांवर फोड येतात, त्यामुळे खाणे-पिणे बंद होते. दूध उत्पादन कमी होते. शारीरिक वाढीवर याचा थेट परिणाम होतो.बाह्य परजीवीमुळे होणारे आजारआर्द्रतेमुळे त्वचेवर बुरशी आणि बाह्यपरजीवींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे त्वचा खाजवणे, केस गळणे, जखमा होणे अशी लक्षणे दिसतात.उपायपशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत. गोठ्यातील भिंती, कोपरे इत्यादी निर्जंतुक ठेवावेत..Sheep Goat Disease : शेळ्या, मेंढ्यांतील लसिका ग्रंथींचा आजार.जंतपोटात असणारे गोल, चपटे किंवा हुकवर्म प्रकारचे जंत यामुळे अशक्तपणा व वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसतात. हे अंतर परजीवी पावसाळ्यात गवतावर अंडी घालतात, त्यांच्या अळ्या सक्रिय होतात.उपायदर सहा महिन्यांनी जंतनाशक शिफारशीत प्रमाणात द्यावे.पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर ही प्रक्रिया करणे उपयुक्त ठरते.लसीकरणाचे वेळापत्रकपीपीआर३ ते ६ महिन्यांचे वय झाल्यावर एकदा लस द्यावी. त्यानंतर दर ३ वर्षांनी बूस्टर डोस द्यावा..पोटफुगीदरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला (मे-जूनमध्ये) लस द्यावी.लाळ्या खुरकूतदर ६ महिन्यांनी (जानेवारी आणि जुलै) लस द्यावी.घटसर्पजर मेंढ्या पाणथळ भागात असतील, तर वर्षातून एकदा ही लस द्यावी.नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपायलिंबाचा डहाळाशेळ्या, मेंढ्यांना आठवड्यातून किमान एकदा तरी लिंबाच्या पाल्याचा डहाळा खावू घालावा. जेणेकरून आंतरपरजीवी कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते..लसूणआहारात थोड्या प्रमाणात ठेचलेला लसूण वापरावा. यामुळे आतड्यांतील जंत कमी होतात. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.संमिश्र आहारप्रथिनयुक्त, खनिजयुक्त आणि जीवनसत्त्वयुक्त आहार देणे रोगप्रतिकारशक्तीस पोषक ठरते.मिठाचे पाणीआठवड्यातून एकदा खारट पाणी दिल्यास पचनक्रिया सुधारते. अंतर्गत कृमीवर काही प्रमाणात नैसर्गिक नियंत्रण मिळते.इतर खबरदारीआजारी जनावरे विलगीकरण करून इतरांपासून वेगळी ठेवावीत.कोणतेही नवीन जनावर कळपात आणल्यास लसीकरण व निरीक्षणानंतरच कळपात मिसळावे.खुरांची कापणी, त्वचेची तपासणी आणि केसांची स्वच्छता नियमित करावी..पायांचे सामान्य विकारलंगडीही एक जिवाणूजन्य विकृती आहे. चिखल आणि ओलसर जमिनीवर चालल्यामुळे जनावरांच्या खुरांमध्ये जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या लंगडतात. योग्य स्वच्छता, खुरांची कापणी व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.पायांमध्ये सडचिखल आणि जंतुसंसर्गामुळे खुरांमध्ये सूज, सडणे आणि दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो. आजार गंभीर झाल्यास जनावरे हालचाल करणे थांबवतात, खणेपिणे कमी अथवा बंद होते.काही परिस्थितीमध्ये जनावरे दगावण्याची श्यक्यता असते.जंत, बुरशी संसर्गपायांच्या फटीत, खुरांच्या तळाशी कीटकांची अंडी व अळ्या वाढू लागतात. बुरशीमुळे त्वचेला खाज सुटते, सोलटते, सूज येते आणि जखम चिघळते.साप्ताहिक पाय धुण्याची प्रक्रियापावसाळ्यात आठवड्यातून एकदा पाय संक्रमक द्रावणामध्ये बुडवून स्वच्छ करणे आवश्यक आहे..Goat and Sheep Disease Prevention : शेळ्या, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन.सोडिअम हायपोक्लोराइटएक टक्का द्रावण हे एक शक्तिशाली जिवाणूनाशक आहे. यामुळे खुरांवर असणारे जिवाणू, विषाणू आणि बुरशी नष्ट होतात.वापर१० लिटर पाण्यात सुमारे १०० मिलि सोडिअम हायपोक्लोराइट मिसळावे.सर्व जनावरे या द्रावणातून चालवावीत किंवा त्यांचे पाय द्रावणात बुडवावे. द्रावणात २ ते ३ मिनिटे राहू द्यावे. नंतर कोरड्या जमिनीवर उभे करावे.पोटॅशिअम परमॅंगनेटजखमांवर उपचार करणारे, बुरशी नियंत्रणासाठी प्रभावी ठरते.वापर१० लिटर पाण्यात १ ग्रॅम पोटॅशिअम परमॅंगनेट पावडर मिसळून फिकट जांभळे द्रावण तयार करावे.यामध्ये जनावरांचे पाय काही वेळ बुडवावेत.हे द्रावण फोड, खरूज आणि पायातील घाण साफ करण्यास उपयुक्त ठरते.पाय स्वच्छतेसाठी नियमित पद्धतीदररोज खुरांची तपासणी करावी.खुरांवर चिखल साचलेला असल्यास तो लगेच पाण्याने धुऊन घ्यावा.खुरांची वाढ वाकडी, अनियमित झाली असल्यास दर ४ ते ६ आठवड्यांनी ती व्यवस्थित कापून आकारात आणावी.खूर साळणी करताना सिमेंटच्या चपट्या पृष्ठभागाचा वापर करावा किंवा शिस्तबद्ध खूर-कापणी यंत्राचा वापर करावा.पाय स्वच्छ करून लगेचच ओलसर जागेत परत नेल्यास स्वच्छतेचा फायदा होत नाही. त्यामुळे पाय धुतल्यावर जनावरांना काही वेळ वाळू, भुसा किंवा सुकवलेल्या गवताच्या थरावर उभे ठेवावे..प्रतिबंधक उपायखुरांची जखम लक्षात आल्यास त्यावर लगेच मलम लावावे.जखम गंभीर असल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.बाधित जनावरांपासून इतर जनावरे वेगळी ठेवावीत.खुरांची मजबुती व पुनरुत्पत्ती साठी बायोटिन, झिंक आणि कॅल्शिअम युक्त खनिज मिश्रण शेळ्या मेंढ्यांच्या आहारात नियमित असणे आवश्यक आहे.निरीक्षणशेळी, मेंढी पालनात यशस्वी उत्पादनासाठी दररोज जनावरांचे बारकाईने निरीक्षण करणे हा सर्वांत महत्त्वाचा व आधारभूत भाग असतो. विशेषतः पावसाळ्यासारख्या संवेदनशील हंगामात वातावरणातील बदल, चारा-पाण्याची गुणवत्ता आणि संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असल्यामुळे दररोजची आरोग्य तपासणी व हालचालींचे निरीक्षण आवश्यक ठरते.जनावर जेव्हा चारा कमी खाते, निवडक खाते, पाणी न पिता फक्त उभे राहते, तेव्हा हे आरोग्य बिघडल्याचे प्राथमिक लक्षण आहे.पचनक्रिया बिघडल्यास चाऱ्याचा वापर अचानक कमी होतो.सामान्यतः शेळ्या, मेंढ्या सक्रिय असतात, पण जर ते सुस्त, जास्त वेळ बसून राहणे किंवा जमिनीवर डोके टेकवून बसणे अशी लक्षण दाखवत असेल, तर आजारी असण्याची दाट शक्यता असते.जर जनावरास हळूवार हात लावल्यास शरीर जास्त गरम वाटले, तर त्याला ताप आलेला असण्याची शक्यता आहे.डोळे लालसर होणे, नाकातून स्राव किंवा श्वसनात अडथळा यासारखी लक्षणे तापासोबत दिसतात.पावसाळ्यात लंगडी, खुरांमध्ये फोड, सूज किंवा सड झाल्यास जनावर लंगडते किंवा उठत नाही. दररोज चालण्यावर लक्ष ठेवल्यास ही स्थिती लगेच ओळखता येते.खरूज, डाग, बुरशीजन्य संसर्ग यामुळे त्वचेवर चट्टे येतात.खाजवणे, त्वचा सोलवटणे, रक्त येणे यासारखी चिन्हे/लक्षणे आढळल्यास त्वचारोगाची सुरुवात झालेली असते.अतिसार असल्यास पातळ विष्ठा, काळसर किंवा पिवळसर रंग किंवा रक्त मिसळलेली विष्ठा दिसते.लघवीत रंग बदल, घटसर्पासारख्या आजारांचे द्योतक असू शकतात.प्रत्येक जनावराच्या हालचाली लक्षात ठेवण्यासाठी नोंदवही वापरावी.तापमापक, नाक-डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कापड व आवश्यक प्रथमोपचारसाठी औषधे जवळ असावीत.एकाच वेळी सर्व जनावरांची तपासणी करण्यापेक्षा त्यांच्या वयोगटानुसार निरीक्षण करून विभागणी करावी.- डॉ. रवींद्र निमसे ९४२२१७९५२५(पशु वैद्यकीय अधिकारी, पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, पदव्युतर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)- डॉ. समीर ढगे ९४२३८६३५९६(विभाग प्रमुख, पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, पदव्युतर महाविद्यालय, महात्मा फुलेकृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.