डॉ. कृष्णा गिऱ्हे, डॉ. रविंद्र जाधवVeterinary Care: लंम्पी त्वचा आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरीही आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसान होते. आजारी जनावराच्या दूध उत्पादनात घट येते, जनावर अशक्त होते, काही वेळा गर्भपात होण्याची शक्यतादेखील असते. बैलांमध्ये तात्पुरते किंवा कायमचे वंध्यत्व येऊ शकते. हे लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करावी..लं म्पी त्वचा आजार हा गोवंशातील विषाणूजन्य त्वचा आजार आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव गाय, म्हशींमध्ये आढळून येतो. याची तीव्रता संकरित गायींमध्ये अधिक प्रमाणात असते. सर्व वयोगटातील जनावरांमध्ये प्रादुर्भाव आढळतो, प्रौढ जनावरांच्या तुलनेत लहान वासरांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरीही आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसान होते..आजारी जनावराच्या दूध उत्पादनात घट येते, जनावर अशक्त होते, काही वेळा गर्भपात होण्याची शक्यतादेखील असते. बैलांमध्ये तात्पुरते किंवा कायमचे वंध्यत्व येऊ शकते. शेतीकाम करण्याची क्षमता कमी होते. आजारी जनावराच्या उपचारासाठी लागणारा खर्च जास्त असतो. कधीकधी तीव्र आजाराने जनावराचा मृत्यू होतो. जास्त बाधा झालेल्या जनावराची त्वचा कायमस्वरूपी खराब होऊन जनावर विकृत दिसते, त्यामुळे जनावरांचे बाजारमूल्य घटते. मानवांमध्ये या विषाणूची लागण होऊ शकत नाही. जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकांशी संपर्क साधून त्वरित उपचार करावेत..Monsoon Animal Care: जनावरांना पावसाळ्यातील आजारांपासून वाचवण्यासाठी व्यवस्थापन पद्धती.प्रसार कीटकहा आजार मुख्यतः रक्त शोषणाऱ्या कीटकामार्फत पसरतो. डास, माशा, गोचीड, कीटक, चिलटे हे महत्त्वाचे कीटक लंम्पी विषाणूच्या संक्रमणात वाहक म्हणून काम करतात. हे कीटक संक्रमित जनावरांच्या रक्तातून विषाणू घेतात आणि नंतर निरोगी जनावरांना चावल्यावर त्यांच्या शरीरात विषाणू सोडतात.वातावरणातील वाढती आर्द्रता, गोठ्यातील ओलावा यामुळे रोगप्रसार करणारे कीटक गोचीड, गोमाश्या यांची वाढ होते. ढगाळ हवामान, उष्ण-दमट वातावरण आणि गोठ्यातील अंधारात लंम्पीचा विषाणू अधिक सक्रिय होतो आणि प्रादुर्भाव वाढतो..थेट संपर्कसंक्रमित जनावरांच्या त्वचेवरील गाठी, जखमा, लाळ, अश्रू, नाकातील स्त्राव, दूध यामध्ये विषाणू असतो. त्यामुळे बाधित पशूंच्या संक्रमित भागाचा थेट संपर्क आल्यास निरोगी जनावरांमध्ये संसर्ग होतो.अप्रत्यक्ष संपर्कसंक्रमित जनावरांचे भांडे, पाणी, चारा, गोठ्यातील साहित्य वापरल्यामुळे विषाणू पसरतो. वाहतूक करताना एकत्र ठेवलेल्या जनावरांमध्येही आजार पसरतो..रेतनसंक्रमित बैलाच्या वीर्यात देखील विषाणू असतो. अशा संक्रमित बैलाच्या विर्याचा वापर कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतानासाठी केल्यास आजाराची लागण मादी जनावरांमध्ये होऊ शकते.आईपासून वासरामध्ये संक्रमणगर्भवती गाय/म्हशींमध्ये जर संसर्ग झाला, तर तो गर्भामध्ये संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. दूध पिणाऱ्या वासरास बाधित गायीच्या दुधातून किंवा सडावरील जखमेतील स्रावातून बाधा होऊ शकते..लक्षणेअचानक उच्च ताप (४०-४१ अंश सेल्सिअस पर्यंत) येतो, जनावर सुस्त राहते, खाणेपिणे बंद करते, हालचाल कमी होते.गाईची दूध उत्पादन क्षमता अचानक कमी होते.बाधित जनावरांच्या प्रामुख्याने मानेतील लसिका ग्रंथीवर मोठ्या प्रमाणावर सूज येते. काही जनावरांच्या पोळीवर सूज येते, पायांमध्ये सूज येऊन जनावराला चालणे कठीण जाते, वेदनेमुळे जनावर बसून राहते किंवा सूज तीव्र स्वरूपाची असल्यास काही जनावरांना बसायला त्रास होत असल्याने अशी बराच काळ खाली न बसता उभीच राहतात. बाधित जनावराच्या त्वचेवर गोलसर व टणक गाठी निर्माण होतात. त्वचेवर त्या ठळकपणे दिसून येतात..गाठींमुळे त्वचा खडबडीत दिसते, केस गळतात,कधी कधी या गाठी फुटून जखमा होतात आणि त्यामध्ये आसडी पडते.नाकातून स्त्राव येतो, डोळ्यातून पाणी येणे व डोळे सुजतात. श्वास घेताना घरघर होते किंवा अडचण जाणवते.गाभण जनावरांत गर्भपात होऊ शकतो, बैलांमध्ये तात्पुरते वंध्यत्व, भूक मंदावणे, वजन घटणे अशी लक्षणे दिसून येतात.तीव्र स्वरूपाच्या आजारात आणि दुय्यम आजाराच्या संसर्गामुळे काही जनावरे मृत्युमुखी पडतात..Animal Health : पशू आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन.प्रतिबंधात्मक उपायलसीकरणया आजाराविरुद्ध लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. भारतात शेळी व मेंढी देवी लस लंम्पी प्रतिबंधासाठी वापरली जाते.रोग नियंत्रणआजारी जनावरांना ताबडतोब वेगळे करावे, निरोगी जनावरांशी संपर्क होऊ देऊ नये. बाधित वनिरोगी जनावरांना एकत्र चारा,पाणी किंवा चरायला सोडू नये..कीटक नियंत्रणगोठा व परिसरात डास, माशा, गोचीड यांचे नियंत्रण करणे, नियमित स्वच्छता राखावी.गोठा नेहमी हवेशीर आणि स्वच्छ ठेवावा, यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.गोठ्यात डास, माश्या आदींचा शिरकाव होऊ नये यासाठी शेणाच्या गोवऱ्या व कडूलिंबाचा पाला जाळून धूर करावा.गोठ्यात निलगिरी तेल, कापूर, करंज तेल, गवती चहाची पाने यांच्या द्रावणाची पाण्यात मिसळून फवारणी करावी.जनावराच्या शरीरास कडूलिंबाचे तेल लावल्यास डास कीटकांचा प्रादुर्भाव कमी करता येतो..स्वच्छतागोठ्याची स्वच्छता राखावी. संक्रमित जनावराचे तत्काळ विलगीकरण करावे. आजाराने मृत जनावरांच्या मृतदेहाची शात्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी.हालचालींवर नियंत्रणआजार पसरलेल्या भागातून जनावरांची ने-आण, विक्री किंवा हालचाल थांबवावी. जेणेकरून अशासंसर्गजन्य आजाराच्या साथीला आळा घालण्यास मदत होईल..आजारावर उपचारहा विषाणूजन्य आजार असल्यामुळे विशिष्ट औषध नाही. आजाराचा उपचार हा लक्षणांवर आधारित पद्धतीने केला जातो. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लंम्पीग्रस्त पशूंवर तातडीने उपचार करावेत.जखमांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ०.१ टक्के पोटॅशिअम परमँगनेट द्रावण वापरावे. त्यानंतर आयोडीन द्रावण वापरावे. माशा व डास नियंत्रणाची उपाययोजना करावी.घरगुती उपाय म्हणजे हळद, कापूर यांचा लेप किंवा लिंबाच्या पाल्याचा लेप गाठीवर जखमांवर लावावा..पाय, पोळीवरील सूज तसेच लसिकाग्रंथी यांना संतृप्त मीठ द्रावण (पाण्यामध्ये मीठ विरघळणे बंद होईपर्यंत मीठ मिसळणे) कोमट करून दिवसातून २ ते ३ वेळा शेकून घेतल्यास सुजेला आराम मिळतो.बाधित जनावराची भूक वाढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात जीवनसत्वे तसेच खनिजक्षार मिश्रण द्यावीत.कमजोर जनावरांची व लहान वासराची विशेष निगा द्यावी आणि आवश्यकतेनुसार शुश्रुषा करावी.- डॉ.कृष्णा गिऱ्हे ९९२२४१७०१८(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.