Temperature Drop: महाराष्ट्रावर आज व उद्या (ता.३,४) हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. म्हणजेच या दोन्ही दिवशी कमाल व किमान तापमान अधिक राहील. मात्र मंगळवारपासून शनिवार (ता.५ ते ९) पाच दिवसांत हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके राहतील आणि तापमानात घसरण सुरू होईल. उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होईल..हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पूर्व भागात ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस आणि बंगालच्या उपसागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. हे मॉन्सूनपूर्व पावसासाठी तसेच मॉन्सून वेळेपूर्वी दाखल होण्यास अनुकूल ठरेल. जेव्हा हिंदी महासागराचे पूर्व भागात पाणी गरम असते व पश्चिम भागात थंड असते, ही तफावत असलेली स्थिती चांगला मॉन्सून येण्यास पोषक ठरते. ठाणे व पालघर तसेच नाशिक, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत आणि पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. ती मॉन्सूनपूर्व पावसासाठी पोषक आहे..Maharashtra Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाची शक्यता.प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १७ अंश सेल्सिअस तर इक्वॅडोरजवळ ते २७ अंश सेल्सिअस आहे. याचाच अर्थ असा की ते पाणी थंड आहे. तिकडे हवेचे दाब अधिक आहेत. अद्याप ‘एल-निनो’ सक्रीय झालेला नाही. त्यामुळे यावर्षी देखील मॉन्सूनचे आगमन अंदमान, केरळ, गोवा आणि मुंबईत निर्धारीत वेळेपूर्वी २ ते ३ दिवस आधी होण्याची शक्यता आहे..कोकणसिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज (ता.३) ०.१ मि.मी. इतक्या अल्पशा पावसाची शक्यता राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, पालघर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस तर ठाणे जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. .सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ७० ते ७९ टक्के तर सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत ८२ टक्के इतकी अधिक राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ३५ टक्के तर पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४० ते ४४ टक्के राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २ कि.मी. तर ठाणे जिल्ह्यात ताशी ४ कि.मी. आणि पालघर जिल्ह्यात ताशी ७ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, रायगड जिल्ह्यात आग्नेयेकडून तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील..उत्तर महाराष्ट्रकमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस तर नंदुरबार जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ५५ टक्के तर धुळे जिल्ह्यांत ६५ टक्के राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात १४ टक्के, धुळे जिल्ह्यात १८ टक्के तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात २२ टक्के इतकी कमी राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात नैऋत्येकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील..मराठवाडाकमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस तर धाराशिव व जालना जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. .मात्र नांदेड जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ३३ ते ३४ टक्के तर लातूर जिल्ह्यात ३९ टक्के, परभणी जिल्ह्यात ४० टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व जालना जिल्ह्यांत ४५ टक्के, बीड जिल्ह्यात ४७ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अत्यंत कमी म्हणजेच ११ ते १३ टक्के इतकी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात १८ ते १९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील..Maharashtra Rain Forecast: पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता.पश्चिम विदर्भकमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस तर वाशीम जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ३८ टक्के तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ४३ ते ४६ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २० कि.मी. तर वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील..मध्य विदर्भनागपूर जिल्ह्यात आज (ता.३) ०.२ मि.मी. इतक्या अल्प पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर वर्धा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यात २६ ते २७ टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ९ टक्के तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ७ ते ९ कि.मी. तर यवतमाळ जिल्ह्यात ताशी १८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नागपूर जिल्ह्यात नैऋत्येकडून तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत वायव्येकडून राहील..पूर्व विदर्भपूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता राहील. आज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ०.१ मि.मी., भंडारी जिल्ह्यात ०.५ मि.मी. आणि गोंदिया जिल्ह्यात ०.७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के तर गोंदिया जिल्ह्यात ३४ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ४६ टक्के राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ टक्के इतकी कमी राहील. तर गडचिरोली जिल्ह्यात ती १५ टक्के राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ कि.मी. तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ताशी १४ ते १५ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील..पश्चिम महाराष्ट्रकमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ते ३९ अंश सेल्सिअस राहील. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर सातारा जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. .कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ४६ ते ४९ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्यात ५९ टक्के राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८३ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यात ९१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत १२ ते १६ टक्के तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ३५ टक्के, सांगली जिल्ह्यात ४३ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात १० ते १४ कि.मी. राहील. सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील..कृषी सल्लाडाळिंब बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करावे. बागेतील वाळलेल्या, तुटलेल्या फांद्या छाटाव्यात. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर बोर्डो पेस्ट लावावी.रब्बी ज्वारीची काढणी करून मळणी करावी व धान्य सुरक्षित स्थळी साठवावे.उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दुपारच्या वेळेत जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. शक्य असल्यास गोठ्यामध्ये फॉगरची व्यवस्था करावी.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.