Nashik News : सुरगाणा तालुक्यातील काही गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी स्किनची लक्षणे निदर्शनास आल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या निर्देशानुसार जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. .यामध्ये ३ जलद कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांद्वारे गावोगावी भेट देऊन तपासणी, उपचार व लसीकरणाची कार्यवाही करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्या सुचनेनुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रशांत धर्माधिकारी व जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रकाश आहेर यांनी ३० ऑगस्ट रोजी सुरगाणा तालुक्यातील रगतविहीर गावास भेट देऊन फणसपाडा येथील नागरिकांच्या गोठ्यांतील बाधित जनावरांची तपासणी केली. .त्याचबरोबर संबंधित जनावरांचे नमुने संकलित करून ते पुणे येथील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.यासंबंधीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबण्यात येत असून जलद प्रतिसाद दल, लसींचा पुरवठा, बाधित जनावरांवर उपचार, लसीकरण न झालेल्या जनवारांचे लसीकरण या बाबींवर कार्यवाही करण्यात येत आहे..Lumpy Skin : अहिल्यानगर जिल्ह्यात १९३० पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा.सध्या सुरगाणा तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी सांगितले.सुरगाणा तालुका हा केंद्र शासनाच्या वतीने आकांक्षित तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सुरगाणा तालुक्यातील विकास कामे, वैद्यकीय सुविधा, पशू वैद्यकीय सुविधा व पंचायत समितीचे कामकाज याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार हे लवकरच आढावा घेणार आहेत. .तालुक्यातील सर्व पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन जलद कृती दल स्थापन करण्यात आले आहे तालुक्यासाठी आपत्कालीन स्वरूपात २,००० डोस लसींचा तत्काळ पुरवठा करण्यात आला आहे..Lumpy Skin : पुण्याच्या पथकाने घेतले लम्पी स्किनचे नमुने .‘त्या’ जनावरांवर उपचार सुरूबाधित ९ जनावरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आली असून आवश्यक औषधोपचार व पोषक आहाराची सोय करून दिली आहे. अद्याप लसीकरण न झालेल्या २८९ गायीवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. दूध संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक यांच्या सहकार्याने लसीकरण आणि कीटकनाशक फवारणीची मोहीम गतीने सुरू असून गुरुवारपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. .यापूर्वी तालुक्यात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत एकूण २१,५८० जनावरांना गोअट पॉक्स (लम्पी) लसीकरण देण्यात आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे सुरक्षित आहेत. जिल्हास्तरावरून आवश्यक औषधे व साहित्याचा पुरवठा नियमितपणे करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने व उपचार केंद्रांना पुरेसा साठा उपलब्ध आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.