Nashik News : जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनात लम्पीच्या प्रादुर्भावाने पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले आहे. सिन्नर व निफाड तालुक्यांत प्रत्येकी चार गावांत मिळून ८१ पशुधन बाधित आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने आतापर्यंत ७० पशुधन बरे झाले आहे. तर ११ पशुधनावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी दिली..जिल्ह्यात ६ लाखांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी ३ महिन्यांहून लहान वासरांना लसीकरण झालेले नाही. तर काही ठिकाणी नवीन पशुधन आले आहे. त्यामुळे लसीकरण राहून गेलेल्या पशुधनामध्ये प्रादुर्भाव अधिक आहे. दोन पशुधन दगावले असून त्यांचा शवविच्छेदन करून अहवाल तपासणीसाठी पाठवला आहे..Lumpy Skin Disease: राज्यात नऊ हजार पशुधनांना ‘लम्पी’.यंदा पाऊस लवकर झाल्याने तसेच डासांचे प्रमाण वाढल्याने हा प्रादुर्भाव वाढला. अनेक ठिकाणी पशुधन मोकळ्या ठिकाणी चरत असल्याने अथवा बांधली जात असल्याने तसेच ते एकमेकांच्या संपर्कात आल्याने प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही पातळी नियंत्रणासाठी डॉ. धर्माधिकारी यांनी क्षेत्रीय मनुष्यबळाला सूचना केल्या. .Lumpy Disease: सोलापूर जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या दोन हजारांवर.अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारखे यांनी १२ दिवसापूर्वीच संसर्ग असलेले क्षेत्र ३ किमी परिसरात बाधित क्षेत्र तर १० किमी क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश िदले. सटाण्यात लक्षणे असलेल्या पशुधनाची पाहणी डॉ. धर्माधिकारी यांनी केली. मात्र लम्पीचा प्रादुर्भाव नसल्याचे निष्पन्न झाले आहे.\.३० हजार लसींची मागणीप्रामुख्याने लसीकरण न झालेल्या ठिकाणी या प्रादुर्भावाची स्थिती आहे. त्यामुळे नियंत्रणासाठी गोटपॉक्स लसीकरण करण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीची आगामी उपाययोजना म्हणून ३० हजार लसींची मागणी नोंदवण्यात आली आहे. यासह तालुक्याच्या ठिकाणी क्षेत्रीय यंत्रणेला बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.