डॉ. जी. एस. निटुरे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. मुसळधार पावसाचा अंदाज असल्यास नदीपात्राजवळील जनावरे उंच जागी हलवावीत. अतिवृष्टीचा इशारा असल्यास जनावरांना नदीपात्राजवळ चरण्यास सोडू नये..पुरेशा प्रमाणात पशुखाद्य आणि वैरणीची साठवणूक करावी. वैरण कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावी.साठवलेल्या खाद्याला बुरशी लागली नसल्याची खात्री करावी.गोठ्यातील विद्युत उपकरणे, तारा, आणि कडबाकुट्टी मशीन सुरक्षित असल्याची खात्री करावी. विद्युत तारा मोकळ्या नसाव्यात, याची काळजी घ्यावी.गोठ्यात जनावरे दाटीवाटीने बांधू नका; पुरेसे अंतर ठेवा. नदीपात्रालगतच्या रस्त्यांवर पाणी धोकादायक पातळीवर असल्यास बैलगाडी किंवा जनावरांची वाहतूक टाळावी.पूरपरिस्थितीत जनावरांना दावणीस बांधू नका; त्यांना मोकळे सोडा, कारण जनावरे नैसर्गिकरीत्या पोहू शकतात..Animal Care: जनावरांमधील कीडनाशकाची विषबाधा.आरोग्य व्यवस्थापनजनावरांना नियमित जंतनाशक औषधे द्यावीत.घटसर्प आणि फऱ्या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.बाह्य परोपजीवी (गोचीड, गोमाशी) नियंत्रणासाठी गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.निरगुडी, तुळस, किंवा गवती चहाच्या पानांच्या पेंडी बांधून परोपजीवींचा प्रादुर्भाव कमी करावा.कडूलिंब तेलाचा वापर बाह्य परोपजीवी नियंत्रणासाठी करावा..गोठ्यातील व्यवस्थापनजनावरांना ओल्या ठिकाणी बांधणे टाळावे.गोठ्यात वायुविजनाची व्यवस्था असावी.वाळलेले गवत जाळण्यापासून निर्माण होणारा धूर जनावरांना त्रासदायक ठरू शकतो, याची काळजी घ्यावी.जनावरांसाठी स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करावे..मृत जनावरांची विल्हेवाटमृत जनावरांची विल्हेवाट पाण्याचा स्रोत आणि सार्वजनिक ठिकाणांपासून दूर लावावी.स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि आवश्यक माहितीचा फलक लावावा. .Animal Care: गाई, म्हशीतील वंध्यत्वाची कारणे अन् उपाययोजना....या गोष्टी टाळाअतिवृष्टीच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका.पावसात किंवा ओल्या ठिकाणी जनावरांना विद्युत खांब किंवा डी.पी. जवळ बांधू नका.भिजलेली वैरण किंवा पशुखाद्य जनावरांना देऊ नका.अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीत नदीपात्राजवळ जनावरे चरण्यास सोडू नका.मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरण किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी लावू नका..नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाईनैसर्गिक आपत्ती जसे, की अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, वीज कोसळणे इत्यादी मुळे बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्त पशुपालकांना केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पशुधनाच्या नुकसानीसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन पशुधन मालकांना वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार साह्य केले जाते. यासाठी मृत जनावराचा तलाठी यांचा पंचनामा, पशुवैद्यकीय अधिकारी यांचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे महसूल विभागाकडे जमा करावीत. जेणेकरून पात्र पशुपालकांना आर्थिक साह्य मिळू शकते.- डॉ. जी. एस. निटुरे ९९७०१२३२२०(पशुधन विकास अधिकारी, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, रेणापूर, जि. लातूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.