डॉ. अतुल पाटणेPoultry Industry: कुक्कुटपालनामध्ये एकूण उत्पादन खर्चाच्या अंदाजे ६० ते ७० टक्के खर्च खाद्यावर होत असतो. शरीर व्यवस्थापन, वाढीसाठी तसेच उत्पादनासाठी लागणारी पोषणतत्त्वे ज्या आहारातून पूर्ण होतात अशा आहारास ‘संतुलित आहार’ म्हणतात. कोंबड्यांना खाद्यात काय देतो यावरून बरेचसे आजार नियंत्रणात येतात. समजा खराब, दूषित खाद्य दिल्याने बरेचसे आजार उद्भवू शकतात..वयानुसार पोषण तत्त्वांचे प्रमाणबऱ्याचदा शेतकरी देशी कोंबड्यांना फक्त घरातील उरलेले शिळे अन्न किंवा शेतातील खराब झालेले धान्य देऊन त्यांचे पोषण करतात, परिणामी अशा कोंबड्यांमध्ये आपल्याला वाढ दिसत नाही, अंडी उत्पादन देखील खूप कमी मिळते. त्या आजारांना सहज बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांना त्यांच्या वयाच्या टप्प्यानुसार वेगवेगळे खाद्य द्यावे, कारण त्यांच्या वयानुसार आवश्यक पोषण तत्त्वांचे प्रमाण त्या खाद्यात दिलेले असते. त्यानुसार त्यांच्या वाढीस व उत्पादनानुसार शरीराची गरज भागवता येते. त्यामुळे जेवढा संतुलित आहार देऊ तेवढेच आपल्याला कोंबड्यांपासून उत्पादनाद्वारे निश्चितच परतावा मिळतो..Desi Poultry Farming : देशी कोंबडीपालनातून उद्योजकता विकास.अंड्यावरील कोंबडीला शरीरात एक अंडे तयार करण्यासाठी २५ ते २६ तास लागतात. त्यासाठी संतुलित आहार खाद्यातून देण्याची गरज आहे. कोंबड्यांची ७० टक्के उत्पादन क्षमता ही त्यांच्या जनुकीय शक्तीवर आणि ३० टक्के उत्पादन क्षमता ही वातावरण, आहारावर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रतीचा पोषक आहार देणे महत्त्वाचे आहे..कोंबड्यांची पचन संस्था ही साधी असते, त्यांना दाताऐवजी चोच असते. त्यामुळे त्या खाद्य टिपतात आणि गिळतात. खाद्याचे पोटात पचन होत असते, त्यामुळे त्यांना भरडलेले किंवा चुरा केलेले खाद्य दिल्यास ते पचनास सोपे जाते. फीड रूपांतरण प्रमाण म्हणजेच एफसीआर देखील चांगला मिळतो..Poultry Farming: परसात कुक्कुटपालन करताना काय काळजी घ्यावी?.खाद्यातून द्यावयाचे घटक आणि स्रोत :ऊर्जा स्रोत (कार्बोहायड्रेट्स) : खाद्यातील हा अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात जास्त लागणारा घटक आहे. कोंबड्यांच्या वाढीचा दर हा खाद्य रूपांतरण क्षमता, अंडी उत्पादन, आरोग्यावर थेट परिणाम करतो.- ऊर्जा घटक हा कोंबडीच्या शरीरातील सर्व प्रक्रियांसाठी इंधन म्हणून काम करतो. उदा. मका, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, जवस तसेच इतर भरड धान्य.- मका हा सर्वात जास्त वापरला जाणारा फायदेशीर ऊर्जा स्रोत आहे..प्रथिन स्रोत (प्रोटिन्स)- कोंबड्यांच्या पचनासाठी परिणामी वजन वाढीसाठी, अंड्यांच्या गुणवत्तेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी प्रथिन हा महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी देखील प्रथिने गरजेची आहेत.उदा. तेल विरहित सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, सूर्यफूल पेंड, सरकी पेंड, तीळ पेंड तसेच मांस पावडर, रक्त पावडर, माशांचा चुरा (फिश मिल)..Poultry Farming Success : कष्ट करण्याची जिद्द हवी, नोकरीपेक्षा शेतीच बरी .चरबी स्रोत/ स्निग्ध पदार्थ (फॅट्स)- हा खाद्यातील महत्त्वाचा घटक असून याद्वारे शरीराला एकाग्र (स्थिर) असा ऊर्जा स्रोत मिळतो.- खाद्य घटकांचे सहज पचन करून पोषक तत्त्वांचे शरीरात शोषण करण्याचे काम चरबीस्त्रोताद्वारे होते.उदा. वनस्पतिजन्य चरबी स्रोत ः सोयातेल, पामतेल, शेंगदाणा तेल. प्राणीजन्य चरबी स्रोत ः जनावरांची चरबी..खनिज मिश्रण आणि जीवनसत्वे - यांचा खाद्यात अंतर्भाव अत्यंत कमी प्रमाणात असला तरी त्यांचे महत्त्व कोंबड्यांच्या आहारात आहे.- रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, शरीराची सामान्य वाढ व विकास करणे, हाडांची ताकद वाढवणे, चयापचय प्रक्रिया व अंड्याची गुणवत्ता चांगली ठेवण्याचे काम करतात.- उदा. विविध कंपन्यांचे तयार खनिज मिश्रण, जीवनसत्त्वे मिश्रण उपलब्ध आहे, त्याचा थेट खाद्यात प्रमाणात उपयोग करावा..Poultry Farming Success : पोल्ट्री व्यवसायाने दूर केली गरिबी.खाद्यातील पूरक घटक - खाद्यातील इतर घटकांची गुणवत्ता, पाचकता तसेच खाद्याची साठवण क्षमता व खाद्य वापर सुधारण्यासाठी हे घटक वापरले जातात. उदा. प्रोबायोटिक्स, प्री-बायोटिक्स, टॉक्सिन बाईंडर एंजाइम्स- काही रोगांचा प्रतिबंध करण्यास देखील खाद्य पूरक घटक वापरले जातात. उदा. कोक्सिडिओस्टेट, टॉक्सिन बाईंडर..खाद्यातील कॅल्शिअमचे महत्त्व - अंड्यावरील कोंबड्यांच्या आहारात खनिज मिश्रणातील कॅल्शिअमचे खूप महत्त्वाचे कार्य आहे. ते योग्य प्रमाणात जाणे देखील महत्त्वाचे आहे.- साधारणतः तीन टक्यांपर्यंत कॅल्शिअम अंड्यावरील कोंबड्यांना आवश्यक असते. हाडांचे बळकटीकरण करणे तसेच अंड्यावरील कवच तयार करण्यासाठी कॅल्शिअमची आवश्यकता असते. या क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नुसते कॅल्शिअम खाद्यात असून उपयोग नाही त्याचबरोबर फॉस्फरस व जीवनसत्त्व ड- ३ हे घटक देखील खूप गरजेचे आहेत..Desi Poultry Farming : गावरान कुक्कुटपालनातून गवसले आर्थिक स्थैर्य .- कॅल्शिअमचे शरीरात शोषण, त्याचा हाडांवर थर होण्यासाठी किंवा अंड्यावर कवच तयार होण्यासाठी फॉस्फरस, जीवनसत्त्व ड-३ हे घटक आवश्यक आहेत. बऱ्याचदा हे घटक खाद्यातून प्रमाणात न गेल्याने पाय, पंख फ्रॅक्चर होणे तसेच अंड्यांचे पातळ, कमकुवत किंवा मऊ कवच येत असल्याचे दिसते. त्यासाठी कॅल्शिअम आहारातून योग्य प्रमाणात जाण्यासाठी खाद्यात चुनखडी पावडर, शिंपले पूड, मार्बल तुकडे किंवा उच्च प्रतीच्या खनिज मिश्रणांचा वापर करावा..देशी कोंबड्यांना आवश्यक पोषण मूल्य/घटकघटक---चिक (०-८ आठवडे)---ग्रोवर(९-२० आठवडे)---लेयर१(२१-५१आठवडे)---लेयर२ (५२-७२ आठवडे)ऊर्जा (ME/Kcal)---२८००---२६००---२६००---२५५०प्रथिने(टक्के)---२०---१६---१६.५---१६.Poultry Farming : बदक, कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातींचे संगोपन.पाण्याचे प्रमाण टक्के---११---११---११---११फॅट्स (टक्के)---३---२.५---२--- २क्रूड फायबर (टक्के)---७---९--- ९---९कॅल्शिअम (टक्के)--- १---१---३.५---३.५.खाद्यावरील खर्चात बचत करण्यासाठी उपायएकूण उत्पादन खर्चाच्या ६० ते ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो, खाद्य वापरताना वाढ, वजन, उत्पादन व आरोग्य यांच्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.पिल्लांना ० ते ८ आठवड्यांपर्यंत तयार केलेले संतुलित खाद्य पावडर स्वरूपात द्यावे. पिल्लांना प्रथिनांची गरज जास्त असते, त्याप्रमाणे खाद्यात प्रथिनयुक्त घटक असावेत..Poultry Farming: पोल्ट्री व्यवसायात केंद्राच्या नियमांची अंमलबजावणी करा .आठ आठवड्यानंतर वयाच्या कोंबड्यांच्या खाद्याच्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने परंतु त्यांच्या आरोग्यावर व उत्पादनावर कोणताही परिणाम न होता २५ ते ३० टक्यांपर्यंत लसूण घास, दशरथ घास, पालेभाज्या, टोमॅटो इत्यादींचा बारीक तुकडे करून वापर करावा.अझोलाचा आपल्या प्रक्षेत्रावर वाफा तयार करून त्याचा खाद्यात ठरावीक प्रमाणात वापर करावा. अझोला हे प्रथिनयुक्त खाद्य आहे..शेवग्याचा पाला खाद्यात देता येतो. शेवगा पाल्याची पावडर करून दिल्यास त्यातून कोंबड्यांना जीवनसत्त्व, खनिजे मिळण्यास मदत होते.खाद्य बाहेरून विकत आणण्यापेक्षा स्वतः ग्राइंडर व मिक्सर या यंत्रांचा वापर करून आपण खाद्य तयार करू शकतो. त्यामध्ये ५ टक्के, १०टक्के खाद्य प्रीमिक्स नामांकित कंपन्यांचे वापरावे, म्हणजे आपले खाद्य संतुलित तयार होईल..Poultry Farming: कुक्कुटपालन शेडमधील वातावरण थंड राखण्यावर भर.मंद गतीने वाढणाऱ्या व शुद्ध देशी गावरान कोंबड्यांचे खाद्य रूपांतरण प्रमाण तेवढे चांगले नसते, त्या ऐवजी सुधारित जातीच्या देशी कोंबड्यांचे हे प्रमाण चांगले असल्याने कमी खाद्यात त्यांची वाढ लवकर होऊन खाद्याच्या खर्चात बचत करता येते.संगोपनामध्ये अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर केल्यास कोंबड्या मोकळ्या जागेत आपले खाद्य शोधून खातात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात खाद्याची बचत होते..खाद्य व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबीकोंबड्यांना आहार वय, उत्पादन आणि ऋतुमानानुसार वेगवेगळा द्यावा.खाद्य चांगल्या प्रतीचे असावे. काळपट, बुरशीजन्य, खराब किंवा वास येत असलेले व पावसाने भिजलेले खाद्य कोंबड्यांना देऊ नये.खाद्याची भांडी पाऊणपट भरावीत, म्हणजे खाद्य वाया जाणार नाही. भांड्याची उंची ही कोंबडीच्या पाठीच्या उंची समान एवढी ठेवावी. किमान ४० ते ५० कोंबड्यामागे एक खाद्याचे भांडे असावे..उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, रात्री खाद्य देताना शेडमध्ये पुरेसा उजेड असावा.अंड्यावरील कोंबड्यांना गरजेपेक्षा जास्त खाद्य देऊ नये. शरीरात चरबीचे प्रमाण वाढवून अंडी उत्पादन क्षमता कमी होऊ शकते.खाल्लेल्या खाद्याच्या दुप्पट कोंबडी पाणी पीत असते. उन्हाळ्यात हे प्रमाण तिप्पट असते. त्यामुळे त्या प्रमाणात पाण्याची २४ तास उपलब्धता ठेवावी.संपर्क : डॉ. अतुल पाटणे, ८३०८७८९९४८(सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, अकोले, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.