डॉ. विवेक संगेकर, डॉ.बालाजी अंबोरेVeterinary Guidance: दैनंदिन पशू आहारात सतत वाढ्यांचा जास्त प्रमाणात समावेश झाल्याने जनावरांच्या पचनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे आरोग्य खालावते तसेच दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. हे लक्षात घेऊन योग्य प्रमाणात जनावरांना उसाचे वाढे द्यावे. .अलीकडच्या काळात जनावरांच्या आहारामध्ये ऊस वाढ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतेक ऊस उत्पादक भागांत फेब्रुवारी ते एप्रिल या उन्हाळ्यातील कोरड्या महिन्यांमध्ये पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याचा एकमेव स्रोत म्हणजे ऊस वाढे असतात. ऊस वाढे हिरवेगार दिसत असले तरी, त्यात जनावरांना आवश्यक असलेले पचण्यास योग्य घटक कमी प्रमाणात असतात. साधारणपणे ऊस काढणीच्या एकूण प्रमाणाच्या जवळपास एक-तृतीयांश एवढे वाढे उपलब्ध होते..पश्चिम महाराष्ट्रात ऊस वाढे प्रामुख्याने जनावरांना हिरव्या चाऱ्याप्रमाणे दिले जातात, तर काही ठिकाणी त्यांना वाळवून कोरड्या चाऱ्याचा पर्याय म्हणूनही वापरले जाते. मात्र, सतत वाढ्यांचा जास्त प्रमाणात आहारात समावेश झाल्याने जनावरांच्या पचनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम होत असून दूध उत्पादनात लक्षणीय घट होत आहे. यामुळे शेतकरी व पशुपालकांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. तज्ञांच्या मते, ऊस वाढ्यांमध्ये प्रथिने आणि खनिजेही कमी प्रमाणात आढळतात. शिवाय त्यांची पाचक क्षमता मर्यादित असल्याने ते मुख्यत्वे तंतुमय चाऱ्याच्या स्वरूपातच उपयोगी ठरतात. तरीसुद्धा, दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी ऊस वाढे हा महत्त्वाचा आधार आहे..Animal Care: भौतिक सुविधांपेक्षा जनावरांच्या आरोग्यावर भर.ऊस वाढ्यांमध्ये आढळणारे घटकपोषक घटकसेंद्रिय पदार्थ (जास्त प्रमाणात)प्रथिने (कमी प्रमाणात)तंतुमय घटक (जास्त प्रमाणात)नायट्रोजन युक्तअर्कचरबी.प्रतिपोषक द्रव्येऑक्सलेट्स (ऑक्सॅलिक आम्ल)कषाय द्रव्ये (टॅनिन्स)सॅपोनिन्ससिलिका.चरबी.खनिजेकॅल्शिअम : कमीफॉस्फरस : अत्यल्पपोटॅशिअम: तुलनेने जास्तसोडियम : कमी प्रमाणातमॅग्नेशिअम: अत्यल्पगंधक : कमी प्रमाणात.Animal Health Management : संसर्गजन्य आजारापासून जनावरांचे संरक्षण.अपचनाची कारणेपचण्यास योग्य घटकांचा अभाव.तंतुमय पदार्थाच्या रचनेमुळे पचन प्रक्रियेस अडथळा.आद्रतेचे जास्त असणार प्रमाण.अचानक आहारामध्ये उसाच्या वाढ्यांचा होणारा समावेश.पोषक-नाशक घटकांचा वाढ्यांमध्ये असणारा समावेशसिलिकाचे जास्त असणारे प्रमाण..अचानक खाद्यामध्ये वाढ्यांचा समावेश केल्याने पोटातील सूक्ष्मजीवांच्या समतोलात बिघाड होणे मुबलक प्रमाणात वाढे उपलब्ध असल्याकारणाने आहारामध्ये वाढ्यांचा भरमसाठ असणारा समावेश.वाढ्यांचे बारीक तुकडे न केल्याने पोटामध्ये विघटनाचा अभाव.ऊर्जा आणि नत्र यामधील समन्वयाचा अभावसूक्ष्मजिवांना आवश्यक असलेले नॉन-प्रोटीन नायट्रोजन (युरियासारखे) आणि प्रथिने यांचा अभाव असल्याने त्यांच्या गरजा असंतुलित होतात.वाढ्यांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशिअम आणि गंधक यांसारख्या आवश्यक खनिजांचा अभाव.वाढे हे निकृष्ट दर्जाचे तंतुमय खाद्य असून त्यामध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण अत्यल्प असते.वाढ्यांमध्ये ऊर्जा व चरबीचे प्रमाणही कमी असते. परिणामी दूध उत्पादनात घट दिसून येते..लक्षणेभूक मंदावते, रवंथ बंद होणे किंवा मंदावते.पचन प्रक्रियेत गॅस जास्त प्रमाणात तयार होऊन डाव्या बाजूला पोट फुगल्यासारखे दिसते.कधी सैल पातळ शेण, तर कधी कोरडे, घट्ट शेण दिसते.दुधाचे प्रमाण कमी होणे. अशक्तपणा व थकवा जाणवतो. जनावर सुस्त आणि उदास दिसते.पोट गच्च होणे, त्यामुळे रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते अथवा बंद होते.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा जाणवणे, त्वचा कोरडी होणे आणि डोळे खोलगट जाणे..आतड्याची हालचाल कमी होऊन, शेण शरीराबाहेर टाकण्यास अडचण येते.जनावरांचे पोट दुखते, पोटावर लाथ मारते, वारंवार शेपटी हलवते, जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करते.गंभीर परिस्थितीत निर्जलीकरण होते, वजन घटणे, तसेच चयापचय बिघाडामुळे जिवाला धोका निर्माण होतो.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन वासरे कोमात जातात. बेशुद्ध अवस्थेत मृत्यू होण्याचा धोका असतो.चारामध्ये काही नैसर्गिक प्रतिपोषक द्रव्ये आढळतात. त्यापैकी ऑक्सॅलिक आम्ल विशेषत्वाने आढळते. हे आम्ल आहारातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअम यांच्याशी संयोग करून अघुलनशील क्षार तयार करते. परिणामी जनावरांच्या रक्तातील खनिजांचे प्रमाण कमी होते आणि मूत्रपिंडामध्ये क्षार साचल्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.लघवीचे प्रमाण कमी होते..निदानजनावरांच्या आहारात उसाच्या वाढ्यांचा अतिप्रमाणात समावेश.आहार भरपूर असूनही दूध उत्पादनात लक्षणीय घट.पोट फुगल्यासारखे होऊन रवंथाची प्रक्रिया मंदावणे किंवा थांबणे.रक्तचाचणीद्वारे निर्जलीकरणाचे स्वरूप स्पष्ट होते.रक्तातील प्रथिने व खनिजे, विशेषतः कॅल्शिअमची कमतरता तपासावी.आतड्यांची हालचाल आणि पचनसंस्था तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड चाचणी..उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायआहारात ऊस वाढ्यांचा समावेश त्वरित थांबवावा.गंभीर स्थितीमध्ये पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ग्लुकोज, नॉर्मल सलाईन किंवा आर.एल. सोल्यूशन देऊन निर्जलीकरण टाळावे.पोटात गॅस जास्त झाल्यास फुगलेपणा कमी करण्यासाठी आवश्यक औषधे फक्त पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत.खनिजे, जीवनसत्त्वांची पूर्तता करणे आवश्यक आहे, विशेषतः कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फॉस्फरसची पूर्तता करावी..रवंथ प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी रवंथ सुधारक औषधे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत.आहारात अचानक बदल करण्याऐवजी हळूहळू बदल करावा.जनावरांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे, जेणेकरून निर्जलीकरण होणार नाही.पचन सुलभ करण्यासाठी आहारात कडबा किंवा इतर तंतुमय चाऱ्याचा समावेश करावा.जनावरांच्या शेणाच्या स्वरूपावर लक्ष ठेवावे. शेण न झाल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.जनावरांना वाढे खाऊ घालण्यापूर्वी कमीत कमी ८ ते १० तास अगोदर वाढ्यावर चुन्याची १० टक्के निवळी फवारावी. डॉ. विवेक संगेकर ९०७५८८९४९०(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता.खंडाळा जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.