सपना जाधव, रेवती शितोळे, डॉ. समीर ढगेDairy Farming Crisis : दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि हवामानातील अनिश्चितता यांचा थेट परिणाम पशुखाद्य उपलब्धता, पशू आरोग्य आणि उत्पादनक्षमतेवर होत आहे. या शतकाच्या पहिल्या अर्ध्या कालावधीत जागतिक स्तरावर पशुजन्य उत्पादनांची मागणी दुप्पट होण्याची शक्यता आहे. वाढती मानवी लोकसंख्या आणि जीवनशैलीत होणारे बदल हे यामागील प्रमुख कारणे आहेत. .जागतिक कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशुधन क्षेत्राचा सुमारे ४० टक्के वाटा आहे. जगभरात सुमारे १.३ अब्ज लोकांना पशुधन क्षेत्रातून थेट रोजगार मिळतो, तर एक अब्जाहून अधिक गरीब लोकांच्या उपजीविकेचा आधार हे पशुधन क्षेत्र आहे. त्यामुळे जागतिक अन्नसुरक्षा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य यामध्ये पशुधन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु सध्या हवामान बदल हा पशुधन उत्पादन व्यवस्थेसमोरील मोठा धोका म्हणून पुढे येत आहे. हवामान बदलामुळे अनेक प्राणी प्रजाती, परिसंस्था आणि पशुधन उत्पादन प्रणालींच्या शाश्वततेवर गंभीर परिणाम होत आहेत..दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि हवामानातील अनिश्चितता यांचा थेट परिणाम पशुखाद्य उपलब्धता, पशू आरोग्य आणि उत्पादनक्षमतेवर होत आहे. या शतकाच्या पहिल्या अर्ध्या कालावधीत जागतिक स्तरावर पशुजन्य उत्पादनांची मागणी दुप्पट होण्याची शक्यता आहे. वाढती मानवी लोकसंख्या आणि जीवनशैलीत होणारे बदल हे यामागील प्रमुख कारणे आहेत. याच कालावधीत जागतिक हवामानातही मोठे बदल अपेक्षित आहेत, ज्यामुळे पशुधन उत्पादनासमोर अनेक नवी आव्हाने निर्माण होणार आहेत..‘कॉप-३०’मध्ये शेती, पशुधनावर चर्चा१९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मूळ हवामान करारावर स्वाक्षरी केलेली सुमारे २०० देश ‘कॉप-३०’मध्ये सहभागी आहेत. या परिषदेत २०१५ च्या पॅरिस करारातील बाबींचे प्रगती मूल्यमापन, जागतिक तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करणे, नवीन राष्ट्रीय हवामान कृती योजनेचा आढावा आणि हवामान वित्तपुरवठ्यावर ठोस तोडगा काढण्यावर भर असेल..या पार्श्वभूमीवर ‘कॉप-३०’ मध्ये शेती व पशुधन क्षेत्राला हवामान धोरणाच्या केंद्रस्थानी आणण्यात आले, कारण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात पशुधनाचा वाटा सुमारे १४ ते १५ टक्के असून, रवंथ करणाऱ्या जनावरांतून निर्माण होणारा मिथेन (कार्बन डायऑक्साइडपेक्षा सुमारे २८ पट अधिक उष्णताग्राही) आणि शेण-मूत्र व्यवस्थापनातून होणारा नायट्रस ऑक्साइड (कार्बन डायऑक्साइडपेक्षा सुमारे ३०० पट अधिक प्रभावी) तापमानवाढीस मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात..Animal Care: कासदाहाकडे नको दुर्लक्ष.‘कॉप-३०’ मधील चर्चेनुसार, १.५ अंश सेल्सिअस लक्ष्य साध्य करण्यासाठी २०३० पर्यंत कृषी-पशुधन क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनात किमान ३० टक्के घट आवश्यक आहे; मात्र पशुधन उत्पादन कमी करणे व्यवहार्य नसल्याने ‘प्रति युनिट उत्पादनामागील उत्सर्जन कमी करणे’ हा मार्ग अधिक शाश्वत मानला जात आहे. ‘कॉप-३०’ने स्पष्ट केले आहे, की योग्य धोरणे, शास्त्रीय दृष्टिकोन आणि शेतकऱ्यांचा सहभाग असल्यास पशुधन हे हवामान बदलाचे कारण न राहता उपायाचाही भाग बनू शकते, आणि त्यातूनच भारतासह जगाला १.५ अंश सेल्सिअस लक्ष्याकडे वाटचाल करता येईल..जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हे पृथ्वीसमोरील सर्वांत गंभीर पर्यावरणीय धोके मानले जात आहेत. आयपीसीसीनुसार हवामान बदलामुळे दुष्काळ, पूर, पिके व पशुपालनावर विपरीत परिणाम, अन्न उत्पादनात घट आणि मानवी व पशू आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान बदलासाठी जबाबदार असलेले हरितगृह वायू नैसर्गिक तसेच मानवनिर्मित स्रोतांमधून वातावरणात सोडले जातात. मात्र गेल्या काही दशकांत मानवी क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या उत्सर्जनाचा हवामान बदलावर होणारा परिणाम समजून घेणे हे दीर्घ, गुंतागुंतीचे आणि शास्त्रीय संशोधनावर आधारित प्रक्रिया आहे..१९८५ पासून जगभरातील सुमारे २५०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी आयपीसीसी अंतर्गत एकत्र येऊन चर्चा केली असून, मानवनिर्मित हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे जागतिक हवामान बदलाचे प्रमुख कारण असल्यावर त्यांनी एकमत व्यक्त केले आहे. त्यामुळे वाढत्या पशुधन उत्पादनाची गरज पूर्ण करताना पर्यावरणपूरक, शाश्वत आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार पशुपालन प्रणाली विकसित करणे ही काळाची गरज आहे..पृथ्वीच्या वातावरणातील एकूण वायूंमध्ये हरितगृह वायूंचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र प्रमाणाने कमी असूनही हे वायू पृथ्वीचे तापमान, मानव, वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी अनुकूल ठेवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. हरितगृह वायू नसते, तर पृथ्वीवरील सरासरी तापमान इतके कमी झाले असते, की वनस्पती व प्राणी जीवन टिकणे अशक्य झाले असते. त्यामुळे हरितगृह वायू हे परिसंस्थेसाठी आवश्यक आहेत; मात्र त्यांचे अतिरिक्त प्रमाण धोकादायक ठरते..हवामान बदलाचा पशुधन उत्पादनावर होणारा परिणामधान्य व पशुखाद्याची उपलब्धता.कुरण व चाऱ्याच्या पिकांचे उत्पादन व पोषणमूल्य.पशूंचे आरोग्य, वाढ व प्रजनन क्षमता.आजारांचा प्रसार..Animal Health: निकृष्ट मुरघासाचा जनावरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम .हवामान बदलामुळे एखाद्या प्रदेशातील पशुधन प्रजातींच्या लोकसंख्येत घट किंवा वाढ होऊ शकते जी पशुधन प्रजाती स्थानिक हवामानाशी अधिक जुळवून घेतात, त्या बदलत्या हवामानात टिकून राहतात; तर कमी अनुकूल प्रजातींना ताणतणावाचा सामना करावा लागतो किंवा त्या अधिक अनुकूल प्रदेशांकडे स्थलांतर करतात..उष्ण व कोरड्या (अर्धशुष्क/शुष्क) भागांमध्ये उष्णतेशी जुळवून घेतलेले स्थानिक पशुधन हे जास्त उत्पादन देणाऱ्या पण उष्णतेस कमी सहनशील असलेल्या संकरित प्रजातींपेक्षा अधिक उपयुक्त ठरते. उष्णताजन्य ताण हा विशेषतः उच्च उत्पादन देणाऱ्या व स्थानिक हवामानाशी न जुळणाऱ्या मेंढ्या आणि इतर पशूंवर अधिक परिणामकारक ठरतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत मेरिनो मेंढी..या संकरित मेंढीमध्ये सुमारे ७५ टक्के विदेशी जनुकीय वारसा आहे. अविकानगर (अर्धशुष्क उष्णकटिबंधीय प्रदेश) येथे या मेंढ्यांचे उत्पादन, वाढ, प्रजनन व जगण्याची क्षमता समाधानकारक नव्हती. मात्र त्याच मेंढ्यांना मानवनूर (उप-समशीतोष्ण प्रदेश) येथे स्थलांतरित केल्यावर त्यांच्या उत्पादनक्षमतेत, आरोग्यात व प्रजनन कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा दिसून आली. यावरून पशुधनासाठी हवामान अनुरूपता किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते..कठीण व प्रतिकूल हवामान परिस्थितीत उच्च उत्पादन देणाऱ्या पण कमी सहनशील पशुधनाचे पालन करायचे असेल, तर हवामान ताण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते. यामध्ये निवारा व्यवस्थापन, सुधारित आहार, पाणी व्यवस्थापन व अनुकूल प्रजनन धोरणांचा समावेश होतो..भारतामध्ये ७० टक्क्यांहून अधिक पशुधन शुष्क व अर्धशुष्क प्रदेशात आढळते. गेल्या काही दशकांत वारंवार दुष्काळ, अनियमित पर्जन्यमान आणि सरासरी पावसात घट दिसून येत आहे. परिणामी कुरणांची गुणवत्ता घसरत असून एकूण चारा व पशुखाद्य संसाधने सातत्याने कमी होत आहेत..काही भागांमध्ये उच्च पोषणमूल्य असलेले ‘सी’ प्रकारचे गवत हळूहळू कमी पोषणमूल्य असलेल्या ‘सी’ उष्णकटिबंधीय गवतांनी बदलले जात आहे. याचा थेट परिणाम पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर व आरोग्यावर होत आहे. रवंथ करणाऱ्या पशुधनाचा हवामान बदलात असलेला वाटा, विशेषतः आंतरिक मिथेन उत्सर्जन, समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच पशुधनातून होणारे हरितगृह वायू कमी करण्यासाठी उपलब्ध उपशमन उपाययोजनांची ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये भारतीय पशुधन क्षेत्राचा हरितगृह वायू उत्सर्जनातील विशेष वाटा यावर खास भर देण्यात आला आहे.- डॉ. समीर ढगे ९४२३८६३५९६(पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.