डॉ. विवेक संगेकर, डॉ. बालाजी अंबोरेDisease Control Management: लम्पी स्कीन आजारामुळे जनावरांची प्रतिकारक्षमता कमी होऊन मोठ्या प्रमाणात न्यूमोनिया वाढत चालला आहे. या आजाराच्या संसर्गामुळे दूध उत्पादन आणि शेतीकामावर विपरीत परिणाम होत आहे. ‘लम्पी’ संक्रमित जनावरांचे पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. जेणेकरून जनावरांची प्रतिकार क्षमता वाढून न्यूमोनिया आजार होणार नाही. .अलीकडच्या काळात लम्पी स्कीन आजाराचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढला आहे. हा विषाणूजन्य आजार असून तो गायवर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येतो. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. या आजारामध्ये त्वचेवर फोड येतात, फोड फुटतात आणि त्यानंतर तिथे जखमा होतात. .पोळीवर आणि पायांवर सूज येते. लम्पी स्कीन आजारामुळे जनावरांची प्रतिकारक्षमता कमी होऊन मोठ्या प्रमाणात न्यूमोनिया वाढत चालला आहे. वयाने लहान आणि वयस्कर जनावरांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. लम्पी स्कीन आजारामुळे जनावरांमध्ये उद्भविणारा न्यूमोनिया या दुय्यम संसर्गामुळे दूध उत्पादन आणि शेतीकामावर विपरीत परिणाम होत आहे..Animal Care : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीत पशुधनाची काळजी.न्यूमोनिया आजारास कारणीभूत घटकथंड, ओलसर हवामान, सतत पडणारा पाऊस.हिवाळ्यात अचानक घटणारे तापमान.बाधित जनावरांची वाहतूक.आजारामुळे उद्भविणारा शारीरिक ताणतणाव.तोंडावाटे औषध देताना लागणारा ठसका.लहान वासरे, वृद्ध जनावरांमध्ये वाढलेला धोका.संकरित गाय, बैलांमध्ये अधिक प्रादुर्भाव.नदीत पोहणी घालणे अथवा पाण्यात नेणे.आजारी जनावरांना धुणे.बाधित जनावरांना शेतकामाला लावणे..प्रमुख कारणेलम्पी त्वचा आजाराचे विषाणू.लम्पी आजारामुळे प्रतिकारक्षमतेत घट.गोठ्यातील जनावरांची दाटीवाटी.आजारपणामुळे वाढणारा ताण, प्रतिकारक्षमतेवर विपरीत परिणाम.संधीसाधू जिवाणूंचा प्रादुर्भाव.सतत पावसात भिजणारी जनावरे.गोठ्यातील शेण व मूत्र व्यवस्थापनाचा अभाव.श्वसननलिकेत उपस्थित जिवाणूंमुळे फुप्फुसांवर होणारा संसर्ग.हिवाळ्यात थंड वातावरणात दीर्घकाळ राहणे.गोठ्यातील ओलसरपणा व दुर्गंधी.गोठ्यात हवा खेळती नसणे..Lumpy Skin Disease: लम्पीमुळे ४७ जनावरे दगावली; अहिल्यानगरमधे लम्पी रोगाचा उद्रेक .आजाराची लक्षणेसुरुवातीला नाकातून सतत पाणी येते, पुढे ते श्लेष्मा व नंतर हिरवट स्रावात रूपांतरित होते.डोळ्यांतून स्राव येतो. श्वास घेण्यास त्रास होतो, त्यासोबत ठसका व सतत खोकला दिसून येतो.थोडे अंतर चालले तरी थकवा जाणवतो.चारा, पाणी कमी प्रमाणात खाणे, रवंथ मंदावते.श्वसनक्रियेत अडथळा आल्याने धाप लागते, तोंडावाटे श्वास घेतला जातो, श्वासोच्छ्वासाची गती वाढते.हृदयाचे ठोके जलद होतात.जनावर सतत बसून राहते, बसताना किंवा उठताना त्रास जाणवतो..निदानलम्पी संक्रमित जनावराच्या नाकातून स्त्राव येतो, थकवा जाणवतो, ठसका लागतो.रक्त तपासणी करावी.क्ष किरणाच्या मदतीने जनावराच्या फुप्फुसांची तपासणी करावी.प्रयोगशाळेत पीसीआर चाचणीद्वारे खात्रीशीर निदान होते..उपचार, प्रतिबंधात्मक उपायनिरोगी जनावरांचे लसीकरण करावे.संक्रमित जनावरांचे विलगीकरण करावे.लम्पीग्रस्त जनावरांना पावसामध्ये भिजू देऊ नये.आजारी जनावरांना थंडीमध्ये उबदार ठिकाणी ठेवावे.संक्रमित जनावरांना तोंडावाटे औषधे देऊ नयेत, कारण औषध चुकून श्वसन नलिकेत जाऊन न्यूमोनिया होऊ शकतो.न्यूमोनिया बाधित जनावरांना नियमित गरम पाण्याची वाफ द्यावी.हिवाळ्यात गोठ्यामध्ये शेकोटी करावी. गोठा स्वच्छ ठेवावा. हवा खेळती ठेवावी.संक्रमित जनावरांचे पशुवैद्यकाच्या सल्याने लवकर उपचार करावेत. जेणेकरून जनावरांची प्रतिकार क्षमता वाढून न्यूमोनिया होणार नाही.- डॉ. विवेक संगेकर ९०७५८८९४९०(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.