Ahilyanagar News : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत (१ एप्रिलपासून) अनेक वेळा अतिवृष्टी, पुराची स्थिती निर्माण झाली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. सहा महिन्यांत जिल्ह्यात १ हजार ५९ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक फटका पाथर्डी, शेवगाव व जामखेड तालुक्यांना बसला आहे. .साधारण पावणे सहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचेही पंचनामे उरकले असून आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात यंदा सहा महिन्यांत सातत्याने आपत्ती येत आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पुराने शेतकऱ्यांची पुरती वाट लावली आहे. एका महिन्यात सुमारे पावणेसहा लाख हेक्टरवर आठ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. .Flood Relief : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना नगर, पुण्याच्या तरुणांची मदत.त्यामुळे यंदाच्या खरिपातील ८० टक्के पिके नष्ट झाली आहेत. जी आहेत, त्यातही पंधरा दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने ती हाती येतील असे वाटत नाही. शेतपिकांच्या नुकसानीसोबत पूर, अतिवृष्टीने जीवित हानीही मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान वादळी पावसाचा तडाखा, अतिवृष्टसह लहान-मोठ्या नद्यांना महापूर आले. जिल्ह्याच्या दक्षिण भागात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील एक हजार २० घरांचे नुकसान झाले. त्याखालोखाल जामखेड तालुक्यातील ९०६ घरांचे नुकसान झाले आहे..याशिवाय अहिल्यानगरला ५२२, अकोल्यात १४२, कर्जतला २०९, कोपरगावला ९२, नेवाशात ५६५, पारनेरला १०१, राहुरीला ३९६, संगमनेरला २२७, शेवगावला ९२१, श्रीगोंदयाला २४९, श्रीरामपूरला ८४, राहात्यात २०३ असे एकूण ५ हजार ६९७ घरांचे नुकसान सहा महिन्यात पुर, पाऊस, घर पडून व वेगवेगळ्या अपत्तीच्या कारणाने २२ लोकांचा मृत्यु झाला आहे. लहान-मोठी एक हजार ५९ जनावरे व १३ हजार ८७९ कोंबड्या दगावल्या आहेत..Maharashtra Flood Relief : अस्मानी संकटात सुलतानी बनवेगिरी.कर्जत, जामखेड, अहिल्यानगर तालुक्यात सीना, शेवगाव तालुक्यात ढोरा, नंदिनी नदीच्या पुराने मोठे नुकसान केले आहे. नदीकाठच्या घरांना मोठा फटका बसला असून जिल्ह्यात सहा महिन्यात तीन हजार १७१ घरांचे अंशत:, तर दोन हजार १७८ घरांचे नुकसान झाले. ३४२ ठिकाणी जनावरांचे गोठे पडले..शेवगाव तालुक्यात सर्वाधिक ४१८ जनावरे दगावली. नगर तालुक्यात २९२ जनावरे मृत्यूमुखी पडली. नगर तालुक्यात २८ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला महापूर आला होता. पिंपळगाव कौडा, कामरगाव, वाळकी, सारोळा कासार आदी गावांमध्ये मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ४०९ कुटुंबाचे कपडे, घरगुती भांड्यांसह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. नगर २६, नेवासे ३४३, तर पाथर्डी तालुक्यातील ४० कुटुंबांचा त्यात समावेश आहे. या कुटुंबांना सरकारच्या वतीने ५ हजारांप्रमाणे मदत करण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.