Dairy Farming: दुधातील फॅट, एसएनएफवर परिणाम करणारे घटक
Livestock Care: दुधातील फॅटचे प्रमाण गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जाते. यामुळे दूध उत्पादन आणि दुधातील फॅटचे प्रमाण यांचा खूप जवळचा संबंध आहे. जनावरांना चाऱ्यामध्ये जर ऊर्जा आणि तंतुमय पदार्थ जास्त असलेले घटक खायला घातले तर जनावराच्या शरीरात असणाऱ्या उपयोगी सूक्ष्मजिवांची चांगली वाढ होते. ते पुरेशा प्रमाणात फॅट तयार करतात.