डॉ. पंकज हासे, डॉ. मंजूषा पाटीलRabies Information: रेबीज हा विषाणूजन्य प्राणघातक आजार आहे. जिवंत प्राण्यात आजाराचे निश्चित निदान होत नाही. हा आजार झुनोटिक म्हणजेच माणसाकडून प्राण्यांना आणि प्राण्यांकडून माणसांना होत असल्याने मानवी आरोग्यास याचा धोका संभवतो. हे लक्षात घेता रेबीज आजाराविषयी असणाऱ्या शंकांबाबतची शास्त्रीय माहिती लेखातून घेऊ. .रेबीज म्हणजे काय?रेबीज आजारामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थावर परिणाम होतो. यामुळे मेंदूला सूज येऊन माणूस मरू शकतो. ऱ्हाबडो व्हायरस कुटुंबातील हा विषाणू आहे. विषाणू अत्यंत संवेदनक्षम असून, वातावरणात तसेच शरीराबाहेर हा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. रेबीज हा रोग प्रामुख्याने रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यामुळे होतो. काही वेळा कातडीवरील जखमांना आजारी जनावराची लाळ लागल्याने देखील होतो. रेबीज आजाराने बाधित मृत जनावराचे मांस वटवाघूळ व इतर प्राणी खाल्ल्यामुळे त्यांना याची लागण होऊ शकते. रेबीजबाधित कुत्रा, मांजर, माकड आजार पसरविण्यास कारणीभूत ठरतात. या शिवाय लांडगा, कोल्हा, वटवाघूळ व मुंगूस रेबीज आजार पसरवतात..रेबीज कसा पसरतो?हा आजार लाळ किंवा जखमेद्वारे पसरतो. रेबीज झालेल्या कुत्र्याने चावल्यामुळे किंवा त्याने जखमेवर चाटल्याने होतो. हा आजार हवेतून पसरत नाही. माणसांमध्ये कुत्र्यामुळे पसरतो. पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या नंतर मज्जातंतूंद्वारे मध्यवर्ती मज्जासंस्थेत प्रवेश करतात. या ठिकाणी वाढ होण्यासाठी त्याला साधारण दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीस अधिशयन काळ असे म्हणतात..या कालावधीत रोगी कुठलीच लक्षणे दाखवत नाहीत. एकदा लक्षणे दिसायला लागली, की मृत्यू अटळ समजावा. या काळात हा विषाणू वेगाने वाढतो, मेंदूत पसरतो. सुरुवातीच्या काळात म्हणजे ‘प्रोड्रॉमल’ अवस्थेत काही लक्षणे दिसतात. मज्जातंतूंद्वारे विषाणू पृष्ठमज्जारज्जू व मेंदू या केंद्रीय मज्जा संस्थेच्या प्रमुख इंद्रियांपर्यंत पोहोचतात. केंद्रस्थानी पोहोचल्यानंतर हे विषाणू तेथील पेशींचा दाह निर्माण करतात.रेबीज आजाराची लक्षणे आपल्या शरीरावर स्पष्ट दिसायला लागले तर त्यावर इलाज शक्य नाही, पण लगेच उपाय केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजार साधारणतः १० दिवस ते २ ते ३ वर्षांपर्यंत दिसून येतो. हे अनेक कारणांवर अवलंबून असते, जसे की शरीराच्या कोणत्या भागावर श्वानदंश झाला आहे?श्वान दंशाची जागा जितकी मेंदूच्या जवळ असेल तितका लवकर परिणाम होतो. एकदा का या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसू लागले, तर ५ ते ७ दिवसांमध्ये माणसाचा मृत्यू होऊ शकतो..Rabies Disease : रेबीज आजाराचे नियंत्रण.आजाराची लक्षणे काय आहेत?सुरुवातीला याची लक्षणे स्पष्ट न दिसणारी अशी असतात. सुरुवातीस आजारी व्यक्तीस ताप, उलट्या आणि वेदना होतात. नंतर रेबीज हा एकतर ‘भयानक रेबीज’ आणि ‘शांतता रेबीज’चे रूप धारण करतो. भयानक रेबीजमध्ये प्राणी अस्वस्थ होतात, विचित्र वागतात, तोंडातून लाळ गळते, मागच्या पायांमध्ये लकवा होतो. शांतता रेबीजमध्ये शरीरावर नियंत्रण न राहणे, अंधारामध्ये लपून राहणे अशी लक्षणे दिसतात. पण दोन्ही प्रकारामंध्येआवाजामध्ये आणि गिळण्यामध्ये त्रास दिसू लागतो. शेवटच्या टप्प्यात श्वास घेण्यास अडथळा येऊन तो मरणापर्यंत पोहोचतो..रेबीज आजार कसा समजतो?आजाराचे विशेषतज्ज्ञ आणि प्रयोगशाळेतून माहिती मिळू शकते. निदानावरून पशुवैद्यक श्वानाचा स्वभाव, जोपासना, त्याचा मालक आणि दुसऱ्या श्वानाबाबतची वागणूक (पाळीव श्वान) या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतात.तत्सम लक्षणे दिसली, तर त्या श्वानाला रेबीज आहे का कसे ओळखावे?श्वानामध्ये जर सर्व लक्षणे दिसत असली, तर रेबीजची शक्यता असू शकते. बऱ्याच वेळा दुसऱ्या आजारामध्ये ही लक्षणे होऊ शकतात. जसे बाहेरचा पदार्थ तोंडामध्ये अडकणे किंवा विष पिणे यामुळे लाळ गळते. कुत्र्याला राग येणे ही सामान्य गोष्ट आहे. कारण काही लोक फक्त मौज मजेसाठी कुत्र्यांना चावण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे आजाराचे निदान करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा..रस्त्यावरील सर्व श्वानांना रेबीज होऊ शकतो का?नाही. सर्व श्वानांमध्ये रेबीजची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यांना लस दिली जात नाही. जर कोणताही अनोळखी श्वान चावला तर कमीत कमी ५ लसी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये श्वानावर १४ दिवसांपर्यंत लक्ष ठेवले पाहिजे, कारण श्वानामधील विषाणूमुळे त्यांचा १० ते १२ दिवसांपर्यंत मृत्यू होऊ शकतो. अशा वेळी जर श्वानामध्ये कोणतेही लक्षण आढळले नाही, तर त्याला रेबीज आजार नाही, हे स्पष्ट होते.पाळीव श्वान, मांजरांना रेबीज होतो का? उपाययोजना काय?पाळीव श्वानांना रोगप्रतिबंधक लस दिली गेली नाही, तर ते धोकादायक ठरू शकतात. निष्कर्ष आणि अनुमानानुसार, माणसांना रेबीजमुळे होणाऱ्या ५० टक्के मृत्यूचे कारण पाळीव श्वान आहेत. त्यामुळे पाळीव श्वानांना प्रतिवर्षी रोगप्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक आहे. पाळीव मांजरांना सुद्धा प्रति वर्षी रोगप्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. त्यांना कधीही बाहेर सोडून फिरण्यास देऊ नये..रेबीज लक्षणे दिसत असलेला प्राणि चावला तर काय करावे?उपचारास उशीर करू नका, शक्य तेवढ्या लवकर जखम झालेली जागा १० मिनिटांपर्यंत साबण आणि पाण्याने स्वच्छ धुतली पाहिजे, पाण्याने धुतल्यामुळे ९४.४ टक्के जंतू नष्ट होतात.जखम असलेल्या जागेवर कार्बोलिक ॲसिड युक्त साबणाने स्वच्छ धुवावे. डॉक्टरांना भेटून ०, ३, ७, १४, २८ आणि गरज असल्यास ९० व्या दिवशी रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी.जर श्वानाचा ७ ते १० दिवसांमध्ये मृत्यू झाला, तर त्यानंतर मेंदूच्या उतीला काढून त्याचे निदान केले जाते. लक्षात ठेवा, सामान्य माणूस रेबीजच्या लक्षणांना ओळखू शकत नाही आणि त्याच्या मतानुसार चालणे म्हणजे मृत्यू ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे गरज पडल्यावर लगेच तज्ज्ञांकडून माहिती घ्यावी..रेबीज झालेला श्वान पाण्याला घाबरतो का?नाही. प्रत्यक्षात रेबीज झालेल्या श्वानाला पेशींमध्ये वेदना होत असतात आणि त्याला जबड्याचा लकवा होतो. त्यामुळे तोंड बंद होत नाही आणि त्यामुळे लाळ किंवा पाणी गिळता येत नाही. त्यामुळे पाण्यापासून असा प्राणी दूर जातो.ज्या प्राण्यांमध्ये आजाराची लक्षणे दिसत नाही ते सुद्धा हा आजार पसरवू शकतात का?हे स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. कारण रेबीज आजाराचा अधिशयन काळ (इनक्युबेशन पिरीयड) हा मोठा आहे (काही दिवस ते २ ते ३ वर्षे). हा एक असा काळ आहे, की ज्यामध्ये श्वान लक्षणे दाखवत नाही परंतु आजार संक्रमित करू शकतो. तसेच शांत प्रकारातल्या रेबीजमध्ये श्वान लक्षण दाखवत नाही, परंतु आजार पसरवतात..श्वान पिलांना जन्मजात रेबीज होतो का? किंवा त्यांच्या आईच्या दुधातून प्रसार होतो का?पिलांना जन्मजात रेबीज होत नाही. परंतु त्यांच्या आईच्या दुधामध्ये विषाणू असू शकतो. जर त्यांच्या आईला रेबीज झाला असेल, तर तिच्या चाटण्यामुळे किंवा चावण्यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते.रेबीज झालेल्या प्राण्याने चावा घेतला तर रेबीज होईल का?माणसामध्ये रेबीजची शक्यता दुसऱ्या प्राण्यांच्या तुलनेत कमी असते. आकड्यांनुसार रेबीजमुळे दूषित झालेला श्वान चावल्याने आणि प्रथमोपचार उशिरा घेतल्या कारणाने केवळ १५ ते २० टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे..World Rabies Day: जागरूकतेतूनच रेबीज पासून बचाव शक्य.रेबीज झालेला कुत्रा आढळला, तर काय करावे?नगरपालिकेतील श्वान स्कॉडशी संपर्क करावा. श्वान पकडून त्याचे निरीक्षण करावे. चुकूनही श्वानाला स्पर्श करणे किंवा त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करू नये.रेबीजग्रस्त श्वान कसा ओळखावा?अ) कृद्ध प्रकार फ्युरियस फॉर्म)ब) मूक / शांत प्रकार (डंब फॉर्म)यापैकी दोन्ही प्रकारात काही लक्षणे सारखी असली तरी पहिल्या प्रकारामध्ये श्वान अधिक आक्रमक असतो. इकडून तिकडे दूरवर धावतो. धावण्यास अडवले नाही तर कित्येक मैल धावत सुटतात.खालच्या जबड्याचा अर्धांगवायू झाल्याने सतत जीभ बाहेर व लाळ गळणे ही लक्षणे दिसतात..मागील भागात अर्धांगवायू झाल्याने पाय लुळे होतात.चर्वण स्नायू व कंठ शिथिल झाल्याने निष्क्रिय बनतात, त्यामुळे कुत्रा तहानेने व्याकूळ झाला तरी पाणी पिऊ शकत नाही. याचा मानसिक परिणाम होऊन पाणी बघितले, की श्वान घाबरल्या सारखा करतो आणि दूर पळतो.डोळे लालभडक होऊन बुबुळे विस्तारलेली दिसतात. कोणत्याही एका वस्तूकडे एकटक पाहत राहतो.वारंवार लघवी करतो. सततच्या शर्करायुक्त लघवीमुळे शरीरातील पाणी व शक्ती कमी होते. क्वचित प्रसंगी लघवी पिण्याचा प्रयत्न करतात.मालकास न ओळखणे, त्यांच्या अंगावर भुंकणे तसेच घरातील व्यक्तींच्या आवाजाला प्रतिसाद न देणे.सुरुवातीस श्वान सतत भुंकतो, परंतु नंतर जबडा लुळा झाल्याने भुंकण्याच्या आवाजामध्ये बदल दिसून येतो..अस्वस्थता, थरथरणे, रागीट होणे, दिसेल ती वस्तू, व्यक्ती, जनावरास चावा घेणे अशी लक्षणे दिसतात.कोणतीही वस्तू (दगड, हाडे, लाकूड, काठी, कारपेट) चाटणे, खाण्याचा प्रयत्न करणे किंवा डोके, पाय आपटणे अशी वेडसरपणाची लक्षणे दिसतात.जर श्वानाला कोंडण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक आक्रमक होतो. घरापासून दूर पळतो.श्वानाला रेबीज होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?श्वानास रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेणे अधिक फायदेशीर ठरते. श्वान १२ आठवड्यांचा होताच त्याला पहिला १ मिलि डोस टोचून घ्यावा. त्यानंतर एक महिन्याने बूस्टर डोस द्यावा. त्यापुढील डोस दर एक वर्षांनी द्यावा.लसीकरण केल्यानंतर शरीरात प्रतिकार क्षमता निर्माण होण्यास २१ दिवस लागतात. तोपर्यंत श्वानाला बाहेर सोडू नये..परिसरात रेबीज झालेला श्वान आढळून आल्यास किंवा तशी लक्षणे दिसल्यास नगरपालिकेमध्ये अथवा संबंधित विभागाला माहिती देऊन त्याचा बंदोबस्त करण्यास सांगावे.पाळीव श्वानाचा रस्त्यावरील भटक्या श्वानांच्याबरोबरचा संपर्क टाळावा.बेवारस भटक्या श्वानांचे कुत्र्यांचे खच्चीकरण केल्यास प्रार्दुभाव बऱ्याच प्रमाणात कमी होईल.बऱ्याच देशांमध्ये रेबीज होऊ नये म्हणून सर्वच श्वानांना अँटिरेबीजची लस दिली जाते. भारतात सध्या मास व्हॅक्सिनेशनची पद्धत अवलंबिली जात नसली तरी भविष्यात त्याची गरज भासणार आहे.रेबीजमुळे मृत झालेल्या श्वानामध्ये हे विषाणू २४ तासांपेक्षा जास्त काळ जिवंत राहतात. त्यामुळे अशा श्वानांची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.- डॉ. पंकज हासे ९८९०२४८४९४(सहायक प्राध्यापक, पशू औषध वैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)