डॉ.नितीन गडगिळे, डॉ. राजू शेलार कासदाह म्हणजे कासेला सूज येणे. या आजारामुळे दुधाची गुणवत्ता खालावते.औषधे व पशुवैद्यकीय सेवांचा खर्च वाढतो.कारणे संसर्गजन्य घटक जिवाणू: स्ट्रेप्टोकोकस, स्टॅफायलोकोकस, ई. कोलाईविषाणूजन्य आजार :काऊ पॉक्स, लाळ्या खूरकूत बुरशी : क्रिप्टोकोकस, मायकोप्लाझ्मा.प्रमुख कारणेसड, कासेला इजा होणे, जास्त दूध देणारी गाय, अपूर्ण किंवा अनियमित दूध काढणे, चुकीच्या पद्धतीने दूध काढणे, लोंबती कास व लांब नळीसारखे सड,खडबडीत जमीन,अस्वच्छ वातावरण.प्रसार : संसर्गित पाणी, दूषित आच्छादन, भांडी व दूध काढणाऱ्याच्या हातांद्वारे रोग पसरतो.रोगाची लक्षणेतीव्र प्रकार : ताप येणे,भूक न लागणे,कास सुजलेली, गरम व वेदनादायक असते,दूध पिवळसर किंवा तपकिरी दिसते, दुधात कण किंवा गाठी आढळतात.जुनाट प्रकार : कासेला सूज नसते,कासेचे फायब्रोसिस (कडक) किंवा कासेची झीज होऊ शकते,काळजीपूर्वक तपासणी केल्यास दुधात बदल दिसतात, दूध उत्पादन कमी होते..Animal Health Care: मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका ठरतेय फायदेशीर.निदानकासेची शारीरिक तपासणी : आकार, माप आणि कडकपणा.स्ट्रिप कप चाचणी : काळ्या रंगाच्या चार विभाग असलेल्या कपमध्ये चारही सडातील दूध काढले जाते. दुधात गाठी किंवा कण आढळल्यास दूध असामान्य असल्याचे दर्शवते..कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्टपद्धतसडातून सुरुवातीची धार काढून दूध फेकून द्या. प्रत्येक सडातील दूध सीएमटी पॅडलच्या वेगवेगळ्या कपात घ्यावे. दुधाइतकेच प्रमाणात सीएमटी रसायन मिसळावे. पॅडल १० ते १५ सेकंद हलके फिरवा.हिरवट-निळसर जेलीप्रमाणे गाठ तयार झाल्यास चाचणी सकारात्मक समजली जाते.तयार झालेल्या जेलचे निरीक्षण करावे..Animal Care: आरोग्यदायी पशुपालनासाठी पशुखाद्य विश्लेषण.फायदेजलद, स्वस्त आणि शेतावरच करता येते.सबक्लिनिकल (ओळखता न येणारा,लागण झाल्याच्या सुरुवातीला) कासदाह लवकर ओळखता येतो..उपचारकास पूर्णपणे रिकामी करणे.कासेमध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविक दिवसातून २ वेळा, ३ दिवस देणे.शेवटचे औषध दिल्यानंतर किमान ७२ तास दूध मानवी वापरासाठी वापरू नये.सूज कमी करण्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट किंवा कोमट मिठाच्या पाण्याने कास शेकावी..नियंत्रणआजारी जनावरांना वेगळे ठेवून उपचार करावेत.भाकड काळाच्या सुरुवातीला सर्व गायींच्या सर्व सडांवर उपचार करणे. आधी निरोगी गायींचे दूध काढावे व शेवटी संसर्गित गायींचे दूध काढण्यापूर्वी व नंतर कास व दूध काढणाऱ्याचे हात जंतुनाशक द्रावणाने धुवावेत.गोठ्यातील फरशी वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवावी. प्रसूतीनंतर गायींना मऊ अंथरूण द्यावे. निर्जंतुक नसलेल्या वस्तू सडात घालू नयेत. सडावरील जखमा दुर्लक्षित न करता त्वरित उपचार करावेत.कासदाहासाठी दुधाची नियमित तपासणी करावी. पूर्ण हाताने दूध काढावे. सड, कासेला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी..तपासणीचा निष्कर्षनिगेटिव्ह - सामान्य पातळ/पाणीदारसंशयास्पद - + खूप कमी जेल तयार होणेसौम्य कासदाह - ++ सौम्य जेल तयार होणेमध्यम कासदाह - +++ जेल तयार होणेतीव्र कासदाह - ++++ घट्ट जेल तयार होणे- डॉ. नितीन गडगिळे ७६६६२३३४१२ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ,जि.सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.