डॉ. अतुल पाटणेPoultry Farming Tips: सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींपासून अंडी आणि मासांचे चांगले उत्पादन मिळते. उत्तम प्रतिकारशक्ती असल्याने आजारांना कमी बळी पडतात. प्रतिकूल वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता आहे. बाजारपेठेत मांस आणि अंड्याला चांगली मागणी असल्याने शेतीपूरक उद्योगासाठी या जाती फायदेशीर आहेत..व्यावसायिक ब्रॉयलर व लेयर कोंबड्यांच्या जाती जरी मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असल्या तरी देशी कोंबड्यांचे पालन करणारा विशिष्ट वर्ग पशुपालकांमध्ये आहे. शुद्ध देशी कोंबड्यांची मर्यादित उत्पादन क्षमता व व्यावसायिक कुक्कुटपालनाकरता अशा कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात व वेळेतउपलब्धता नाही..त्यामुळे बरेच कुक्कुट व्यावसायिक सुधारित देशी कोंबड्यांच्या नवनवीन जातींचे संगोपन करून व्यवसाय करत आहेत. वाढत्या लोकसंख्येची आहाराची गरज आणि देशी कोंबडीचे मांस, अंड्याला विशिष्ट चव असल्याने देशी कुक्कुटपालनाला चालना मिळाली आहे. देशी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करत असताना यासाठी सुधारित कोंबड्यांच्या जातींचे संगोपन आवश्यक ठरते..सुधारित देशी कोंबडीची निवड फायदेशीरशुद्ध देशी/गावरान कोंबडीच्या तुलनेत अधिक उत्पादन क्षमता.सुधारित देशी कोंबड्यांची उत्तम प्रतिकारशक्ती असल्याने आजारांना कमी बळी पडतात.व्यावसायिक संकरित ब्रॉयलर व लेयर कोंबड्यापेक्षा मरतुकीचे प्रमाण खूप कमी.प्रतिकूल वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता.शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यात सक्षम.व्यवसाय करण्याच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात पिल्लांची उपलब्धता.सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती नामांकित व शासकीय संस्थेत विकसित झालेल्या आहेत.कोणत्याही संगोपन पद्धतीमध्ये चांगले उत्पादन.विदेशी किंवा व्यावसायिक संकरित ब्रॉयलर व लेयर कोंबड्यांच्या तुलनेत मांस व अंड्याला चांगली चव..Poultry Farming : दुर्गम आदिवासींना मिळाले पोल्ट्री व्यवसायाचे बळ.सुधारित देशी कोंबड्यांच्या जातीवनराजविकसित करणारी संस्था : कुक्कुट संशोधन संचालनालय, हैदराबादवर्णन : आकर्षक बहुरंगी पिसारा व शेपटी, तपकिरी रंग, तुरा व कानपुळ्या लाल, पाय पिवळसर.उद्देश : दुहेरी उत्पादन (अंडी व मांस)वजन : ३ महिन्यांमध्ये १.५ किलोअंडी देण्यास सुरुवात : ६ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : ११०-१२०वैशिष्ट्ये : शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता असल्याने परसातील कुक्कुटपालनास योग्य..गिरिराजविकसित करणारी संस्था : कर्नाटक पशुवैद्यकीय विद्यापीठ, बंगळूरवर्णन : आकर्षक बहुरंगी पिसारा, लालसर व तांबडा रंग, तुरा व कानपुळ्या लाल.उद्देश : दुहेरी उत्पादन (अंडी व मांस)वजन : ३ महिन्यांत १.५ ते १.६ किलोअंडी देण्यास सुरुवात : ६ महिन्यांनंतरअंडी उबविण्याची क्षमता : ८५ टक्केवार्षिक अंडी उत्पादन : १३० ते १५०वैशिष्ट्ये : परसातील कुक्कुटपालनात यशस्वी, प्रतिकूल वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता..ग्रामप्रियाविकसित करणारी संस्था : कुक्कुट संशोधन संचनालय, हैदराबादवर्णन : सोनेरी व तपकिरी रंग, तुरा व कानपुळ्या लाल, पाय राखाडी व पिवळसर, मध्यम शरीर.उद्देश : दुहेरी उत्पादन (अंडी व मांस)वजन : ३ महिन्यांमध्ये १.५ किलोअंडी देण्यास सुरुवात : ५.५ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : १८०-२००वैशिष्ट्ये : सर्वाधिक अंडी उत्पादन, अतिशय कमी मरतुकीचे प्रमाण (२.५ टक्के)..Poultry Farming: देशी कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन.श्रीनिधीविकसित करणारी संस्था : कुक्कुट संशोधन संचनालय, हैदराबादवर्णन : मानेवर सोनेरी व तपकिरी रंगाचे पिसे, शरीर तांबडे व काळसर, तुरा व कानपुळ्या लाल, पाय पिवळसर, मध्यम शरीर.उद्देश : दुहेरी उत्पादन (अंडी व मांस)वजन : ३ महिन्यामध्ये १.५ ते १.८ किलोअंडी देण्यास सुरुवात : ५.५ ते ६ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : १५० ते १८०वैशिष्ट्ये : मांसासाठी चविष्ट, ड्रेसिंग उत्पन्नाचे सर्वाधिक प्रमाण (७० टक्के)..कावेरीविकसित करणारी संस्था : केंद्रीय पोल्ट्री विकास संघटना, बंगळूरवर्णन : तांबड्या, लाल, काळसर व पिवळसर रंगाच्या कोंबड्या. तुरा व कानपुळ्या लाल, पाय पिवळसर, मध्यम शरीर.उद्देश : अंडी उत्पादनवजन : ३ महिन्यांमध्ये १.५ किलोअंडी देण्यास सुरुवात : ५.५ ते ६ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : १८०वैशिष्ट्ये : अंड्यासाठी प्रसिद्ध, गावरान कोंबड्यांच्या तुलनेत कमी खाद्यात जास्त अंडी देण्याची क्षमता..सातपुडा देशीवर्णन : विविध रंगांची पिसे, आखूड व पिवळसर पाय, तपकिरी डोळे, मध्यम शरीरउद्देश : दुहेरी उत्पादन (अंडी व मांस)वजन : ३ महिन्यांमध्ये १.५ ते १.६ किलोअंडी देण्यास सुरुवात : ५.५ ते ६ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : १६०-१८०वैशिष्ट्ये : मांस, अंड्याला गावरान कोंबडी सारखी चव..सोनालीविदेशी कोंबडी आरआयआर आणि बांगलादेशमधील फायओमी या कोंबड्यांच्या संकरातून दुहेरी उत्पादनासाठी उपयुक्त असलेली सुधारित जात.वर्णन : तांबडा, राखाडी, पांढरा व काळसर असा बहुरंगी पिसारा. तुरा व कानपुळ्या लाल, पाय पिवळसरउद्देश : अंडी, मांस उत्पादनासाठीवजन : ३ महिन्यांमध्ये १.५ ते १.८ किलोअंडी देण्यास सुरुवात : ५.५ ते ६ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : १८०-१९०वैशिष्ट्ये : उष्ण वातावरणातही मांस व अंडी उत्पादनात सातत्य..Broiler Poultry Farming: पोल्ट्रीमध्ये काटेकोर आहार, आरोग्य व्यवस्थापनावर भर .डी.पी. क्रॉसवर्णन : तांबडा व तपकिरी पिसारा. तुरा व कानपुळ्या लाल, पाय पिवळसरउद्देश : अंडी व मांस उत्पादनवजन : २.५ महिन्यांमध्ये २ किलोपर्यंतअंडी देण्यास सुरुवात : ५.५ ते ६ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : १३०-१५०वैशिष्ट्ये : जलद गतीने वाढ, कमी खाद्याची गरज..मूळ भारतीय देशी कोंबड्याच्या जातीअस्सील/फायटर कोंबडीमूळस्थान : आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडवर्णन : लालसर व तपकिरी रंग, सोनेरी रंगानी मिश्रीत, उंच शरीर, तुरा व कानपुळ्या लाल, पाय लांब व राखाडीउद्देश : अंडी व मांस उत्पादनवजन : ५ ते ६ महिन्यांमध्ये १ किलोअंडी देण्यास सुरुवात : ६ ते ६.५ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : ७०-९०वैशिष्ट्ये : नर कोंबड्यांची स्पर्धेसाठी मागणी. मांसाला विशिष्ट चव..कडकनाथमूळस्थान : मध्य प्रदेशवर्णन : पूर्ण काळा रंग, अंडे तपकिरी रंग, पाय, तुरा व कानपुळ्या काळ्याउद्देश : मांस. वजन : ५ महिन्यांमध्ये १-१.२ किलोअंडी देण्यास सुरुवात : ६-६.५ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : ५०-६०वैशिष्ट्ये : मांसाला विशिष्ट चव..बसरामूळस्थान : धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा (महाराष्ट्र), सुरत जिल्हा (गुजरात)वर्णन : पांढरा व राखाडी मध्यम आकाराची कोंबडीउद्देश : मांस उत्पादनवजन : ५ ते ६ महिन्यांमध्ये १ किलोअंडी देण्यास सुरुवात : ६.५ ते ७ महिन्यांनंतरवार्षिक अंडी उत्पादन : ५०-६०वैशिष्ट्ये : मांस अतिशय रुचकर..आपल्या वातावरणात चांगले उत्पादन देणाऱ्या विदेशी कोंबड्यांच्या जातीरोड आइसलॅंड रेडही अंडी व मांसासाठी संगोपनास उपयुक्त जात. विशेषतः रोगप्रतिकारशक्ती, वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे प्रसिद्ध आहे.वर्णन : तांबूस काळ्या किंवा तपकिरी भूऱ्या रंगाची छटा. बऱ्याचदा माद्यांमधे शेपटी आणि पंख पांढरे असतात, डोक्यावर एकेरी किंवा गुलाब पुष्पाप्रमाणे लाल भडक तुरा. सर्वांत जास्त अंडी देणारी जात.वार्षिक अंडी उत्पादन : २४०-२६०वजन : ३-३.५ महिन्यांमध्ये १.५-२ किलोवैशिष्ट्ये : अतिशय उष्ण आणि थंड वातावरणात टिकून राहते. तपकिरी रंगाची अंडी..ब्लॅक ऑस्ट्रेलॉर्पवर्णन : संपूर्ण काळसर पिसारा.वार्षिक अंडी उत्पादन : १२०-१४०वजन : ३ महिन्यांमध्ये १.५ किलोवैशिष्ट्ये : ऑस्ट्रेलियातील कोंबडीची जात असली तरी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे वाढते. अंडी उत्पादन आणि मांसासाठी फायदेशीर.- डॉ. अतुल पाटणे, ८३०८७८९९४८(सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), अकोले, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.