डॉ. परमेश्वर परिहार, डॉ. नाना सोनावणे Cattle Health Management: तर कोणताही घरगुती उपचार करत वेळ न दवडता तातडीने नोंदणीकृत पशुवैद्यकाला बोलवून रक्तस्मियर, आवश्यकतेनुसार पीसीआर आणि इतर रक्त तपासण्यांच्या मदतीने अचूक निदान करावे. .सध्या पावसाळा संपत आला असून हिवाळ्याची चाहूल लागत आहे. हवेतील अति-दमटपणा आणि दिवसाचे वाढते तापमान यांमुळे सध्या गोठ्यांमध्ये बाह्य परजीवींचा, विशेषतः गोचीड, उवा आणि पिसवांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गोचीड फक्त जनावरांचे रक्त शोषून घेत नाहीत, तर ते त्यांच्या रक्तामध्ये बबेसिया आणि थायलेरिया हे घातक प्रोटोझोआ सोडतात. या परजीवीमुळे जनावरांना ‘गोचीड ताप’ हा जीवघेणा आजार होतो. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावण्याची शक्यता ९० टक्क्यांपर्यंत असते..Cotton Thrips Infestation: कपाशीवर वाढतोय थ्रिप्सचा प्रादुर्भाव.आजार ओळखण्याची लक्षणेगोचीड चावल्यानंतर साधारणपणे १ ते ३ आठवड्यांत जनावरांमध्ये विविध आजाराची लक्षणे दिसू लागतात.तीव्र ताप : जनावराच्या शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरेनहाइटपर्यंत वाढते. जनावर प्रचंड थरथरते व चारा,पाणी सोडते.लाल लघवी : रक्तातील तांबड्या पेशी फुटल्यामुळे जनावराची लघवी चहा किंवा कॉफीसारख्या गडद लाल ते काळ्या रंगाची होते..तीव्र ॲनिमिया (रक्ताची कमतरता) : जनावराच्या डोळ्यांची आणि पोटाची आतील त्वचा पांढरी किंवा पिवळी पडते.दूध उत्पादनात घट : दुभत्या जनावरांचे दूध अचानक कमालीचे कमी होते.पावसाळा संपताना आणि हिवाळा सुरू होताना गोठ्यात एखादे जनावर सुस्त दिसले किंवा त्याची लघवी किंचित बदललेली आढळली, तर कोणताही घरगुती उपचार करत वेळ न दवडता तातडीने नोंदणीकृत पशुवैद्यकाला बोलवून रक्तस्मियर, आवश्यकतेनुसार पीसीआर आणि इतर रक्त तपासण्यांच्या मदतीने.Cucumber Thrips Palmi: काकडी पिकावरील थ्रिप्स पाल्मीची ओळख.अचूक निदान करावे. कारण प्रत्येक ताप, अशक्तपणा किंवा लघवीतील बदल हा गोचीड तापामुळेच होतो असे नाही.अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने अँटिप्रोटोझोअल औषधांचा वापर केल्यास प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आवश्यक तपासण्यांद्वारे निदान झाल्यानंतरच योग्य औषध आणि योग्य मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावी. गोचीड तापामध्ये सुरुवातीच्या १२ ते २४ तासांत केलेले उपचार जनावराचा जीव वाचवू शकतात..उपाययोजनागोचीड ताप हा आजार जनावरांच्या शरीरातील तांबड्या पेशींचा थेट वेगाने नाश करतो. यामुळे दूध उत्पादन तर घटतेच, पण जनावराचा जीव जाण्याचाही धोका असतो.गोचिडांचे जीवनचक्र पूर्णपणे तोडण्यासाठी जनावराच्या अंगावर आणि गोठ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने सलग दोन ते तीन वेळा शिफारशीत गोचिडनाशकाची फवारणी करणे अनिवार्य आहे. एकाच फवारणीने फक्त जनावराच्या अंगावरील गोचीड मरतात, परंतु गोठ्यातील अंडी नष्ट होत नाहीत..पशुवैद्यक यांनी सुचविल्याप्रमाणे, बऱ्याचदा पशुपालक एकाच प्रकारचे गोचीडनाशक वर्षानुवर्षे वापरतात, ज्यामुळे गोचिडांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणूनच दर ६ ते १२ महिन्यांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधाचा मूळ रासायनिक घटक बदलून घ्यावा.गोचीड तापामुळे जनावरांमध्ये तीव्र रक्ताल्पता होते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने मूळ उपचारासोबत जनावरांना लोह आणि यकृत टॉनिक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून जनावराची शारीरिक क्षमता लवकर पूर्वपदावर येईल..परजीवींचे नियंत्रणगोठ्यातील जमिनीला किंवा भिंतींना असणाऱ्या सर्व भेगा, चिरा सिमेंटने पूर्णपणे बुजवून घ्याव्यात. गोठ्यात कुठेही ओलावा व शेण साचणार नाही याची काळजी घ्या, कारण दमट वातावरणात परजीवी वेगाने वाढतात.महिनातून एकदा गोठा रिकामा करून, भिंतींच्या आणि गव्हाणीच्या कोपऱ्यांवर ‘ब्लो-लॅम्प’ किंवा गॅस मशालीच्या साह्याने जाळ मारावा. यामुळे गोठ्याच्या भेगांमध्ये लपलेली कोट्यवधी अंडी जागेवरच जळून खाक होतात. हा सर्वांत स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे..जनावराच्या अंगावर गोचिडनाशक फवारताना नेहमी केसांच्या विरुद्ध देशाने (खालून वरच्या दिशेने) लावावे, जेणेकरून ते थेट त्वचेपर्यंत पोहोचेल. गोचिडनाशक लावण्यापूर्वी जनावराच्या तोंडाला मुसके बांधावे, जेणेकरून ते स्वतःला चाटणार नाही.ज्या दिवशी जनावरांच्या अंगावर गोचीडनाशक लावाल, त्याच दिवशी पूर्ण गोठ्यात आणि गोठ्याबाहेरील ५ ते १० मीटर परिसरातही गोचिडनाशकाची फवारणी करणे अनिवार्य आहे. अन्यथा, जमिनीवर पडलेले गोचीड पुन्हा जनावरांच्या अंगावर चढतात.- डॉ. परमेश्वर परिहार, ९०२८१६३५९४ (भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पश्चिम विभागीय संदर्भीय पशुरोग निदान प्रयोगशाळा / रोग अन्वेषण विभाग, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.