Purebred Cow Breeding: जातिवंत गाई, म्हशींचे प्रजनन व्यवस्थापन
Dairy Farming: गाई, म्हशी योग्य वयात गाभण राहून निरोगी वासराला जन्म देणे आणि दोन-तीन महिन्यांत पुन्हा माजावर येणे, ही त्यांची चांगली प्रजनन क्षमता दर्शवते. दोन वेतातील अंतर हे १२ ते १३ महिन्यांचे असावे. यशस्वी दुग्ध व्यवसायाचे रहस्य हेच आहे की गाईने दर वर्षी एका वासराला जन्म द्यावा.