डॉ.एस.बी.पाटुळे , डॉ.एस.एस.रामटेकेपावसाळी हंगामात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. याकाळात चारापिकांची लागवड केली जाते. मुरघास प्रकियाद्वारे हिरव्या चाऱ्याची साठवणूक केली जाते. या चाऱ्याची साठवणूक व्यवस्थित केली नाही तर त्यावर आद्रतेमुळे बुरशीजन्य पदार्थ तसेच जिवाणूंची वाढ होऊन तो चारा पशुधनास हानिकारक ठरू शकतो. बुरशी आणि अफलाटॉक्सिनमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. .पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता व दमटपणामुळे साठवलेल्या चाऱ्यामध्ये बुरशी वाढते. पहिल्या वेळेस गर्भधारणा असलेल्या म्हशी अधिक संवेदनशील असतात. हिसार येथे झालेल्या संशोधनानुसार झालेल्या अफलाटॉक्सिन बी-१ (AFB१) यामुळे अत्याधिक दूषित असलेल्या आहारामुळे म्हशींमध्ये गाभण राहण्याचे प्रमाण कमी झाले, वजन कमी होते, अशक्तपणा व विशेषतः दुसऱ्या त्रैमासिकात गर्भपात वाढल्याचे निदर्शनास आले. संशोधनानुसार, अफलाटॉक्सिन हे एफएसएच, एलएच प्रोजेस्टेरॉन हे प्रजनन हार्मोन्स कमी करते आणि कोर्टिसॉल व इस्ट्राडायोल वाढवते. यामुळे गर्भ टिकून राहण्यासाठी अडथळा निर्माण होतो..Animal Health Management : संसर्गजन्य आजारापासून जनावरांचे संरक्षण.निदानाचे टप्पेइतिहास व निरीक्षणविशिष्ट खाद्यपदार्थ वापरल्यावर शेणाचे परीक्षण कारण विशिष्ट खाद्यपदार्थ वापरल्यास जनावरास हगवण लागते. त्यामुळे रक्तातील विषाचे प्रमाण वाढून गर्भपाताचे प्रमाण वाढणे, वजन घटणे, यकृत कार्य बिघडल्याची लक्षणे दिसतात.चाऱ्याची तपासणीमक्याचे दाणे, शेंगदाणा पेंड , कपाशी पेंड, हरभरा टरफल यांचे नमुने घ्यावेत.रक्त तपासणीवाढलेले यकृत एन्झाइम्स, बिलीरुबिन, प्रथिने कमी, खनिजांची असंतुलितपणा.प्रजनन हार्मोन्स (एफएसएच, एलएच, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्राडायोल, कोर्टिसॉल) तपासावेत.पोस्टमार्टम / शवविच्छेदनयकृतामध्ये कुपोषण, अवयवांत रक्तस्राव..संसर्गजन्य कारणेब्रुसेलोसिस, लेप्टोस्पायरोसिस ही देखील गर्भपाताची प्रमुख कारणे आहेत.प्रतिबंध आणि व्यवस्थापन उपायबुरशीचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होणाऱ्या पिकांच्या जातींची लागवड करावी.योग्य अवस्थेत काढणी करावी,पिकाची कापणी योग्य वेळेत करावी. दाण्यांना इजा होऊ देऊ नका.वेळेवर कीड नियंत्रण करावे.कापणीनंतर पीक पूर्णपणे वाळवावे. शक्य असल्यास सूर्यप्रकाशात किंवा यांत्रिक पद्धतीने वाळवणी करावी..Animal Health: खुरांच्या आरोग्यासाठी जनावरांना द्या संतुलित आहार.साठवणूकचारा कोरड्या, स्वच्छ व हवेशीर जागेत साठवावा.आद्रता किंवा ओलाव्याचे प्रमाण कमी ठेवावे.चाऱ्यामध्ये गळती, गढूळ पाणी शिरू देऊ नये.नियमित स्वच्छता करावी. बुरशी आलेला चारा काढून टाकावा.तूरडाळ भरडा, हरभरा डाळभरडा याची योग्य ठिकाणी साठवणूक करावी.चाऱ्याचे परीक्षण, व्यवस्थापननियमितपणे मका, तेलबियांपासून बनलेले पेंड, पशुखाद्य साठवलेला चाऱ्याची तपासणी करावी.डोळ्यांना दिसणारी बुरशी किंवा खराब झालेला चारा खाद्यात देणे टाळावे.चाऱ्याच्या बॅचेसची नोंद ठेवावी. त्यामुळे हगवण व गर्भपातास कारणीभूत चारा ओळखता येतो..पूरक आहारचाऱ्यात हायड्रेटेड सोडियम कॅल्शिअम अल्युमिनोसिलिकेट, बेंटोनाइट इत्यादी टॉक्सिन बाइंडर्स मिसळावेत.अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे पुरवावीत. यामुळे यकृत कार्यास मदत होते.सीआयआरबी,हिसार येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार पेंटा-सल्फेट मिश्रण (सूक्ष्म खनिजे), टॉक्सिन बाइंडर्स वापरून,खराब चारा थांबवून प्रजनन व आरोग्य सुधारले.बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे टॉक्सिन बाइंडर्स (विषनाशक) उपलब्ध आहेत. एक टन चाऱ्यासाठी १ किलो टॉक्सिन बाइंडर पावडर मिसळावी..उपचार पद्धतीबुरशीजन्य व अफलाटॉक्सिनयुक्त चारा त्वरित थांबवावा.हगवण लागल्यावर चारा व खाद्य तपासणी करावी,तसेच हगवण थांबत नसेल तर तातडीने औषधोपचार करावा.दुय्यम संसर्ग असल्यास उपचार करावेत.यकृतासाठी पोषक आहार, इलेक्ट्रोलाइट्स, आवश्यक औषधे द्यावीत.प्रजनन हार्मोन्स तपासून आवश्यक असल्यास पशुवैद्यकीय उपचार करावा.गर्भपात लक्षणे दिसत असतील तर उपाययोजनासंशयित बुरशीजन्य चारा तात्काळ बंद करावा.सुरक्षित चारा द्यावा, योग्य प्रमाणात चारा द्यावा, मुरघास चाऱ्याची साठवणूक करताना टॉक्सिन बाइंडर्स चाऱ्यात मिळवून नंतर साठवण करावी.सर्व गाभण जनावरांना योग्य व परवडणारे टॉक्सिन बाइंडर्स द्यावेत.उच्च दर्जाचे प्रथिन, जीवनसत्त्वे, यकृतासाठी पूरक आहार द्यावा.पशुवैद्यकीय तपासणी करून हार्मोन पातळी तपासून योग्य उपचार करावेत.पशुवैद्यकाकडून गर्भ तपासणी करून योग्य उपचार करावा.गर्भ तपासणीचे निरीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी नोंद ठेवावी.- डॉ.एस.बी.पाटुळे ९८३४२८८४४८(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.