डॉ. विकास चत्तर, डॉ. हृषीकेश जगतापLivestock Health: केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने नुकतीच प्राण्यांसाठी रक्त संक्रमण आणि रक्तपेढीसाठी मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जाहीर केली आहे. यामुळे देशभरातील प्राण्यांच्या रक्त संक्रमण पद्धती आणि रक्तपेढ्या यांचे सुनियोजन होऊन त्यांना वैज्ञानिक आणि कायदेशीर आधार या मार्गदर्शक तत्त्वांमुळे मिळणार आहे..भारतात सुमारे ५३७ दशलक्षांहून अधिक पशुधन आणि १२५ दशलक्षांहून अधिक पाळीव प्राणी आहेत, जे देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण उपजीविकेचा महत्त्वाचा भाग आहेत. प्राण्यांमध्ये अपघात, रक्ताची तीव्र कमतरता, शस्त्रक्रियेमुळे होणारा रक्तस्राव, काही संसर्गजन्य आजार आणि रक्त गोठण्याच्या विकारांवर उपचार करण्यासाठी रक्त संक्रमण हा एक महत्त्वाचा आणि जीवनरक्षक उपाय आहे..मात्र आतापर्यंत प्राण्यांसाठी आपत्कालीन परिस्थिती आणि गंभीर आजारांमध्ये रक्त संक्रमण करण्यासाठी रक्तपेढ्यांचा अभाव होता. रक्त संक्रमण पद्धतीबाबत राष्ट्रीय स्तरावर सर्वसमावेशक प्रोटोकॉलचा अभाव होता. ज्यामुळे बहुतेक रक्त संक्रमण आपत्कालीन परिस्थितीत, रुग्णालयात उपलब्ध असलेल्या किंवा मालकाच्या इतर प्राणीदात्यांवर अवलंबून होते. या प्रक्रियेत दात्याची तपासणी, रक्तगट निश्चित करणे किंवा लागणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव होता. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली तयार केली आहे..Animal Care: आरोग्यदायी पशुपालनासाठी पशुखाद्य विश्लेषण.नवी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावलीरक्तदात्याची निवड, रक्त संकलन, प्रक्रिया, रक्त साठवणूक ते संक्रमणाबाबत राष्ट्रीय पातळीवर नियमावली निर्मिती.रक्त संक्रमण प्रोटोकॉलचे मानकीकरण.प्राण्यांसाठी रक्तपेढीची संरचना, त्यासाठी आवश्यक संसाधने, कागदपत्रे आणि कार्यपद्धती.संक्रमण प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर तपासणी आणि सुरक्षिततेची सुनिश्चितता. प्राण्यांसाठी राष्ट्रीय रक्तपेढी नेटवर्कची उभारणी..पशुपालक, पशुवैद्यकांमध्ये जागरूकता आणि प्रशिक्षण.रक्तदान कोणते प्राणी करू शकतात?प्रभावी रक्त संक्रमणासाठी, दाता प्राण्यांना काही विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.प्राणी पूर्णपणे निरोगी असावा, कोणताही औषधोपचार चालू नसावा.रक्तदानादरम्यान शांत आणि हातळण्यासाठी योग्य असावा.लसीकरण आणि जंतनाशक औषधे वेळेवेर दिलेले असावे. मादी गर्भवती किंवा नुकतीच व्यायलेली नसावी..श्वान : १-८ वर्षे वयोगटातील, किमान वजन ५-७ किलो (लहान जाती), १५-२० किलो (मध्यम जाती) आणि २५ किलो (मोठ्या जाती).मांजर : १ ते ५ वर्षे वयोगटातील, किमान वजन ४ किलो, स्थूल नसावी.पशुधन : प्रौढ आणि निरोगी असावे.रक्तदानाचा कालावधी श्वान : दर ४-६ आठवड्यांनी रक्तदान करण्यास पात्र.मांजर : दर ८-१२ आठवड्यांनी रक्तदान करण्यास पात्र.टीप ः दोन सलग रक्तदानामध्ये किमान ३० दिवसांचे अंतर अनिवार्य आहे..Animal Blood Bank: पशुधन, पाळीव प्राण्यांसाठीही रक्तपेढी.रक्तदानपूर्व अनिवार्य तपासणीरक्तदानापूर्वी प्रयोगशाळा तपासणी आणि आरोग्य अहवाल पाहणे बंधनकारक आहे. प्रयोगशाळा तपासणी मध्ये पॅक्ड सेल व्हॉल्यूम (PCV) ३५ टक्के, हिमोग्लोबिन (Hb) १० ग्रॅम/डीएल, प्लेटलेट > २००,०००/µL आणि एकूण प्रथिने सामान्य मर्यादेत असणे आवश्यक आहे.संसर्गजन्य आजाराची तपासणी : दाता प्राण्यांची रक्त संक्रमणातून पसरणाऱ्या संसर्गांसाठी तपासणी आवश्यक आहे. यामध्येश्वानासाठी हेमोप्रोटोजोअन संक्रमण (उदा. बॅबेसिया, एर्लिचिया), मांजरांसाठी FeLV, FIP, हेमोप्लाझ्मा आणि पशुधनासाठी ब्रुसेलोसिस, ट्रीपॅनोसोमियासिस, बबेसिओसिस आणि थायलेरियोसिस यांची तपासणी करणे आवश्यक आहे..रक्तगट निश्चिती, क्रॉस-मॅचिंगमाणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही वेगवेगळे रक्तगट असतात. रक्त संक्रमणापूर्वी देणारा आणि रक्त घेणाऱ्याचे रक्त जुळते का? ते तपासण्यासाठी क्रॉस-मॅचिंग केले जाते.मेजर क्रॉस मॅचरुग्णाचे सीरम + डोनरचे लाल रक्तपेशी (RBCs).रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज डोनरच्या पेशींवर प्रतिक्रिया देतात का हे पाहणे..मायनर क्रॉस मॅचडोनरचे सीरम + रुग्णाच्या RBCs.प्रत्यक्षात याचे महत्त्व कमी, परंतु कधी कधी तपासले जाते.श्वानांमध्ये नैसर्गिक ॲलोअँटिबॉडीजच्या कमतरतेमुळे पहिल्या संक्रमणापूर्वी क्रॉस-मॅचिंग आवश्यक नसले, तरी त्यानंतरच्या संक्रमणांना आवश्यक आहे. परंतु मांजरांसाठी पहिल्या संक्रमणापूर्वी देखील प्रमुख क्रॉस-मॅचिंगची शिफारस केली जाते. यासाठी काही कंपन्यांनी टेस्ट किट देखील उपलब्ध आहेत..प्रत्येक रक्तदानापूर्वी प्राण्याच्या मालकाकडून लिखित संमती घेणे अनिवार्य असणार आहे. रक्तदान हे ऐच्छिक आणि विनामोबदला असावे, जेणेकरून नैतिक मानके कायम राहतील. कायदेशीर पेच निर्माण होणार नाही. प्राण्यांच्या विविध प्रजातीमध्ये रक्त संकलन शास्त्रीय पद्धतीने कसे करावे याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. रक्ताची गुणवत्ता राखण्यासाठी आणि रक्त संक्रमण धोका कमी करण्यासाठी प्रोटोकॉलमध्ये रक्त प्रक्रिया आणि साठवणूक अशा विविध बाबींचा समावेश केला आहे. प्रोटोकॉलमध्ये रक्त संक्रमणाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रक्त संक्रमण ही तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया असल्याने तसेच क्वचित प्रसंगी रिॲक्शन येण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या निरीक्षणाखाली आणि प्रजाती-योग्य प्रोटोकॉलनुसार केले पाहिजे, ज्यामुळे ते सुरक्षित होईल. .रक्तपेढ्यांची स्थापनारक्तपेढीसाठी योग्य पायाभूत सुविधा, तज्ज्ञ कर्मचारी आणि नियामक देखरेख आवश्यक आहे. भविष्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठ, रेफरल पॉलिक्लिनिक्स, मोठे पशुवैद्यकीय निदान केंद्र आणि मल्टिस्पेशालिटी पशू रुग्णालयामध्ये रक्तपेढी स्थापन होऊ शकते. .भविष्यातील दिशामार्गदर्शक तत्त्वांमध्ये राष्ट्रीय पशुवैद्यकीय रक्तपेढी नेटवर्क स्थापित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. फिरत्या रक्त संकलन युनिट्सचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामुळे दुर्गम भागातही सेवा पोहोचवता येतील.प्राण्यांमधील रक्तगट आणि संख्याप्राणी मुख्य रक्तगट रक्त गटाचे प्रकारगाय, म्हैस ११ A, B, C, F, J, L, M, R, S, T, Z.श्वान ९ DEA १.१, DEA १.२, ३, ४, ५, ६, ७, ८, डिएएल ॲन्टीजेन.मांजर ४ A, B, AB, मिक ॲन्टीजेन.घोडा ८ A, C, D, K, P, Q, U, T.शेळी ५ A, B, C, M, J.मेंढी ७ A, B, C,D, M, R, X.- डॉ. विकास चत्तर ९५७९९२१८३२(पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, संगमनेर, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.