शेळ्यांना पावसाळ्याआधी कोणती लस दिली पाहिजे?

पावसाळ्यात वातावरणात अनेक बदल होत असल्याने शेळ्यांना या वातावरणात जुळवून घेण्यासाठी त्यांना तयार करून ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी शेळ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करणे गरजेचं आहे.
Before Monsoon Vaccination Of Goats
Before Monsoon Vaccination Of GoatsAgrowon

गरीबाची गाय अशी ओळख आहे, शेळीची. शेळी झाडांचा पाला, इतर औषधी वनस्पती खाऊन स्वतःचे पोट भरत असते. शेळीचे पालन पोषण करणे जरी जास्त खर्चिक नसले तरी, त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात वातावरणात अनेक बदल होत असल्याने शेळ्यांना या वातावरणात जुळवून घेण्यासाठी त्यांना तयार करून ठेवणे गरजेचं आहे.

पावसाळ्यात शेळ्यांना अनेक प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. रोगाची बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा, शेळ्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे हिताचे ठरते. कारण रोगाची बाधा झाल्यानंतर उपचार केल्यानंतर काही रोगांमध्ये शेळ्यांची उत्पादकता कमी झालेली दिसून येते.

Before Monsoon Vaccination Of Goats
विदेशातील शेळी दिवसाकाठी किती देते दूध ?

शेळ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण न केल्यास गोठ्यातील एखादी शेळीचा, बोकडाचा किंवा करडाचा मृत्यु झाल्यास, शेळीपालकाचे आर्थिक नुकसान होते. असे होऊ नये म्हणून शेळ्यांचे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरण करताना ते निरोगी शेळ्यांचेचं केले पाहिजे.

शेळी तीन महिन्याची असताना तिला आंत्रविषार रोगाविरुद्धचा पहिला लसीचा डोस द्यावा. पहिल्या डोसानंतर दुसरा डोस १५ ते २० दिवसांनी द्यावा.

Before Monsoon Vaccination Of Goats
जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण का करावे?

तीन महिने वय असताना घटसर्प रोगाविरुद्धही लसीकरण करावे लागते. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस ३ ते ४ आठवड्यानंतर करावा. दोन्ही रोगाविरुद्धचे लसीकरण वर्षातून दोन वेळा, सहा महिन्याच्या अंतराने केले पाहिजे. शेळ्यांचे वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास, त्यांची चांगली निरोगी वाढ होण्यास मदत होते. त्यांना कोणत्याही रोगाची बाधा न होता, चांगली वजनवाढ मिळते.

कोणत्याही दोन लसीकरणात कमीत कमी २१ दिवसांचे अंतर ठेवावे. कारण कोणतीही लस दिल्यानंतर तिचा प्रभाव दिसण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो. लसीकरण केल्यानंतर काही वेळेस शेळीला हलका ताप येऊ शकतो. लसीकरण करताना ते तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फतचं करणे गरजेचं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com