डॉ. सौरभ कदम, डॉ. संजय भालेराव, डॉ. प्रसाद मिंडपशुखाद्यातील वेगवेगळे घटकांची माहिती आणि जनावरांना वजनानुसार लागणारे घटक किती गरजेचे आहेत ते भारतीय मानक संस्थेद्वारे ठरवले जाते. या सर्व गोष्टींच्या आधारावर संतुलित आहार निर्मिती करता येते. वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याकडील पशुखाद्याचे विश्लेषण करून त्यातील विविध घटकांची सविस्तर माहिती मिळवू शकतो. या माहितीच्या आधारे जनावरांचे वजन आणि त्यांना लागणाऱ्या कोरड्या घटकांच्या आधारावर संतुलित आहार तयार करता येतो. .चाऱ्याचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारल्यास जनावरांच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ होऊ शकते. पशुपालन व्यवसाय हा आहार, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, धोरण, आर्थिक पाठबळ आणि पशुप्रजननावर अवलंबून आहे. यामध्ये पशू आहारासाठी सुमारे ७० ते ७५ टक्के एवढा खर्च येतो. त्याचा दर्जा सुधारला तर उत्पन्न वाढते. ही गरज जाणून घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये दूध आणि खाद्य उत्पादकता निर्देशांक तयार करण्यात आला. या निर्देशांकाने २० राज्यांचे मूल्यांकन चार मुख्य घटकांद्वारे एकत्रित करण्यात आले..यामध्ये दूध उत्पादन आणि उत्पादकता, पशुवैद्यकीय आरोग्यसेवांपर्यंत पोहोच आर्थिक तरतूद, धोरणात्मक पाठबळ आणि दुग्धविकास सुविधा यांचा समावेश आहे. हे घटक लक्षात घेता महाराष्ट्रात कोरडा चारा आणि स्वच्छ पाण्याची कमतरता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्याकडील जनावरांमध्ये दूध उत्पादन कमी आहे. महाराष्ट्रात जनावरांच्या तुलनेत पशुवैद्यकांचे प्रमाण खूप कमी आहे. महाराष्ट्र हे राज्य देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्य आहे. राज्यातील सुमारे ६५ टक्के लोक हे पाळीव जनावरांवर अवलंबून आहेत. राज्यात दर्जेदार चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे..Animal Health : बुरशीजन्य चाऱ्यामुळे होतो गर्भपात .संतुलित आहाराचे नियोजनजनावरांना त्यांच्या पोषण गरजेनुसार योग्य प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील असा आहार द्यावा. खाद्याचा अपव्यय टाळावा. खाद्य साठवताना आणि जनावरांना खाऊ घालताना योग्य पद्धती वापरून अपव्यय कमी करावा.जनावरांची उत्पादन क्षमता आणि आरोग्याच्या गरजेनुसार खाद्याचे योग्य मिश्रण तयार करावे. यासाठी टोटल मिक्स्ड रेशन तयार करावे. सर्व पोषण घटक एकत्र करून एकसंध मिश्रण तयार करावे. हे मिश्रण जनावरांना संतुलित पोषण पुरवते..जनावरांच्या आहारात अपारंपरिक खाद्य स्रोतांचा समावेश करावा. उदा. अझोला, केळीचे खोड, सोयाबीन/मोहरीचे काड, हायड्रोपोनिक पद्धतीने उत्पादित चारा यातून खाद्याची उपलब्धता वाढवता येते. यासाठी खाद्याच्या पोषण घटकांची माहिती असावी. योग्य खाद्य संरचना तयार करण्यासाठी त्यातील प्रथिने, कर्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्यालाच आहार विश्लेषण किंवा पशुखाद्य विश्लेषण म्हणतात..पशुखाद्य विश्लेषणपशू आहार विश्लेषण म्हणजे उपलब्ध पशुखाद्याचे पोषणमूल्य तपासणे. यामुळे त्यातील पोषक घटकांची कमतरता किंवा जास्तीचे घटक लक्षात येतात. ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते कारण यामुळे जनावरांना आवश्यक पोषणतत्त्वांचे योग्य प्रमाण देण्यास मदत होते. त्यातून आपल्याला प्रथिनांचे प्रमाण (सीपी टक्के), ऊर्जेचे मूल्य (टीडीएन टक्के), कॅल्शिअम, फॉस्फरस यांचे प्रमाण, तंतुमय घटकांचे प्रमाण (एडीएफ, एनडीएफ) माहिती मिळते..मांस, दूध किंवा इतर उत्पादनांसाठी पशूंना योग्य पोषण मिळाल्यास आरोग्य सुधारते, वाढीचा दर अधिक चांगला होतो, दूध उत्पादनात वाढ होते, प्रजनन कार्यक्षमता सुधारते, तंदुरुस्ती आणि कार्यक्षमता वाढते.आहारात काय आहे हे अचूकपणे माहीत असल्यामुळे पूरक आहाराची गरज ओळखता येते, आहारात योग्य बदल करता येतात आणि निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि परिणामकारक होतात. परिणामी पशू अधिक निरोगी, उत्पादक आणि कार्यक्षम बनतात..पशुखाद्य विश्लेषण पद्धतीपारंपरिक पद्धतीप्रॉक्सिमेट विश्लेषण करताना पोषण घटकांचे मूलभूत विश्लेषण केले जाते. यामध्ये प्रथिने, चरबी, राख, आर्द्रता इत्यादी तपासले जाते. ही पद्धत चाऱ्यातील वेगवेगळे घटकांचे प्रमाण सांगते. कोरडे पदार्थ म्हणजे खाद्यातील पाण्याशिवाय उरलेला भाग. एकूण प्रथिने पशूंच्या वाढीसाठी आवश्यक प्रथिनांचे प्रमाण, एकूण तंतू पचनासाठी उपयुक्त असलेले वनस्पतिजन्य तंतू. इतर अर्क /चरबी घटक, खाद्यातील चरबी व तेलाचे प्रमाण, राख, खनिज पदार्थांचे एकूण प्रमाण, नायट्रोजनमुक्त अर्कद्रव्य, ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स (शर्करा, स्टार्च).Robot in Livestock Management: आता 'रोबोट' करणार गोठ्यातील कामे.व्हॅन सोएस्ट पद्धततंतुमय घटकांचे प्रकार (ADF, NDF) ओळखण्यासाठी वापरली जाते. जे चाराखाण्याचे प्रमाण आणि चारा पचण्याचे प्रमाण ठरवते.प्रगत पद्धतीएनआयआरएस, एचपीएलसी, जीसी, एनएमआर, एएएस या अत्याधुनिक उपकरणांद्वारे अचूक पोषण विश्लेषण करतात. या उपकरणांच्याद्वारे जीवनसत्त्वे, खनिजे, अमिनो आम्ल, फॅटी अॅसिड्स तपासणी होते..स्पेक्ट्रोस्कोपी एनआयआरस्पेक्ट्रोस्कोपी हे एक अत्याधुनिक विश्लेषण तंत्र आहे जे विविध प्रकारच्या चाऱ्यांमधील रासायनिक घटक अचूकपणे तपासण्यासाठी वापरले जाते. गवत सायलेज, धान्य, कुरणातील चारा यातून प्रथिने, ऊर्जा तंतुमय घटक (एडीएफ, एनडीएफ), खनिजे (कॅल्शिअम, फॉस्फरस), ओलावा, लिग्निन, स्टार्च इत्यादी घटकांचे विश्लेषण करता येते..फायदेजलद आणि अचूक विश्लेषण.प्रयोगशाळेतील खर्च व वेळ वाचतो. नियमित तपासणीसाठी उपयुक्त. आहार नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते.एचपीएलसीद्वारे अमिनो आम्ल विश्लेषण प्रथिन पचनक्षमता हे पशुखाद्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे तंत्र प्रगत अमिनो आम्ल प्रोफाइलिंगसाठी वापरले जाते, ज्यामुळे प्रथिनांच्या स्रोताची गुणवत्ता स्पष्ट होते. याचा वापर मुख्य अमिनो आम्लांचे प्रमाण आणि पशुखाद्याची जैव उपलब्धता मोजण्यासाठी केला जातो..गॅस क्रोमॅटोग्राफी (जीसी)चरबी आम्ल विश्लेषणासाठी प्रगत तंत्र आहे. गॅस क्रोमॅटोग्राफीद्वारे पशुखाद्यातील चरबी आम्लांचे अचूक विश्लेषण करता येते. विशेषतः शेवाळ आधारित घटकांमध्ये, जे पारंपरिक आहारापेक्षा वेगळ्या रचनेचे असतात. शेवाळापासून तयार केलेल्या खाद्यघटकांचे विश्लेषण (स्पिरुलिना प्रथिन पूरक, अल्गी ऑईल चरबी पूरक) करता येते..न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीही एक अत्यंत विश्वासार्ह, नाशविहीन आणि परिमाणात्मक विश्लेषण पद्धत आहे. ही पद्धती पशुखाद्याचे सखोल मूल्यांकन करते. याद्वारे पोषणतत्त्वांची अचूक रचना, दूषित घटक,आंबवणी प्रक्रिया तसेच खाद्यपदार्थांची खरी ओळख तपासता येते.- डॉ. सौरभ कदम ७२१८७३९१११डॉ. संजय भालेराव ९०९६३२४०४५(पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.