Nagpur News : राज्यात २०१८-१९ नंतर पहिल्यांदाच पशुधन विमा योजनेसाठी केंद्र सरकार सकारात्मक असून तब्बल १३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र राज्य हिस्सा त्यासोबतच निविदा प्रक्रिया रखडल्याने हे काम गेल्या सात महिन्यांत तसूभरही पुढे सरकले नाही. परिणामी योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामासामी यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही..पीकविमा योजनेच्या धर्तीवर राज्यात पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी पशुधन विमा योजना फार पूर्वीपासून राबविली जात आहे. पूर्वी केवळ योजनेतून वितरित होणाऱ्या पशुधनालाच संरक्षण देण्यावर पशुपालकांचा भर होता. त्यापेक्षाही योजनेतून पुरवठा होणाऱ्या पशुधनाचा सक्तीने विमा उतरविला जात होता. .Livestock Insurance : पशुधनालाही हवे विमा सुरक्षा कवच .२०१८-१९ पर्यंत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत होती. कोरोना काळानंतर योजनेच्या अंमलबजावणीला लागलेला ब्रेक आजतागायत कायम आहे. केंद्र, राज्य तसेच लाभार्थी हिस्सा याप्रमाणे ही योजना राबविली जाते. एक ते तीन वर्षे कालावधी करिता संरक्षणाची तरतूद यात आहे..Livestock Insurance : पशुधनाचा एक ते तीन रुपयात विमा उतरवा ; सदाभाऊ खोत यांची मागणी.त्यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र सरकारने नुकतीच १३१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्याने ८७ कोटी ३८ लाख ६६ हजार ६६६ रुपयांचा हिस्सा टाकणे अपेक्षित आहे. त्यासोबतच लाभार्थ्यांद्वारे रुपयांचा विमा हप्ता भरल्यास त्या माध्यमातून ३२ कोटी ७७ लाख जुळतील. यानुसार तब्बल २५१ कोटी १२ लाख ३६ हजार ६६६ रुपयाच्या निधीतून ही योजना राज्यात राबविली जाणार आहे..एका गाईची किंमत ७० हजार रुपये अपेक्षित धरल्यास एका वर्षाकरिता विमा प्रीमीयम ३१५० रुपये ०४५ पैसे इतका राहील त्यात १६०६.५२ केंद्र तर राज्य १०७१.०१ तसेच ४७२.५० पैसे लाभार्थी हिस्सा असणार आहे. त्यानुसार प्रस्तावित निधीतून एक वर्षाकरिता ७९७५६५ गाईंना विमा संरक्षण मिळणे शक्य होईल. .म्हशींचा विचार करता ८० रुपये किंमत गृहित धरल्यास एका वर्षाकरिता ४.५ टक्के प्रमाणे ३६००.०४ विमा हप्ता राहणार आहे. यामध्ये १८३६.०२ केंद्र, १२२४.०१ राज्य तर ५४० रुपये लाभार्थी हिस्सा राहणार आहे. त्यानुसार ६९७८७१ म्हशींना विमा संरक्षण देता येणार आहे.असा आहे विमा हप्ता दर (पशुधनाच्या किंमत प्रमाणात टक्क्यांमध्ये)एक वर्ष ः ४.५दोन वर्ष ः ८तीन वर्ष ः ११.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.