Turmeric Production Agrowon
यशोगाथा

Turmeric Farming: केव्हीकेच्या मार्गदर्शनातून वाढतेय हळद उत्पादन

KVK Washim: वाशीम जिल्ह्यात करडा येथील केव्हीकेच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांनी हळद उत्पादनात मोठी भर घातली आहे. सेंद्रिय व एकात्मिक शेती पद्धतीमुळे एकरी ३० ते ४१ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू लागले आहे.

 गोपाल हागे

Agriculture Success Story: वाशीम जिल्ह्यातील हळद उत्पादक एकात्मिक किंवा सेंद्रिय पद्धतीवर अधिकाधिक भर देऊ लागले आहेत. त्यांना. करडा कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यातून एकरी ३० ते ३४ क्विंटल उत्पादनापर्यंत ते पोहोचले आहेत. मातीची सुपीकताही वाढीस लागल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

भारत हा जगातील हळदीचा सर्वांत मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार म्हणूनही ओळखला जातो. कोविडच्या काळात तर हळदीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले. देशभरात किमान २० राज्यांत हळद उत्पादन घेतले जाते. यात महाराष्ट्र अग्रेसर राज्य मानले जाते. विदर्भाबाबत बोलायचे तर हळद हे वाशीम जिल्ह्याचेही प्रमुख मसालेवर्गीय पीक आहे. जिल्ह्यात २०१२ मध्ये दीड- दोन हजार हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड होती.

बाजारपेठ उपलब्धता, अन्य पिकांच्या तुलनेत मिळणारे अधिक उत्पादन, उत्पन्न पाहता शेतकरी मोठ्या प्रमाणात या पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र आता १८ ते २० हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. दरवर्षी त्यात सातत्याने वाढ आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता रासायनिक अधिक सेंद्रिय अशा एकात्मिक पद्धतीच्या तंत्रावर भर देत आहेत. काही निवडक शेतकरी एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत (सुकविलेल्या) उत्पादन घेतात.

केव्हीकेचा पुढाकार

जिल्ह्यातील हळदीची उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी करडा (वाशीम) कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) आठ वर्षांपूर्वी पुढाकार घेतला. केव्हीकेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनात उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी उत्पादन तंत्रातील बारकाव्यांचा अभ्यास सुरू केला. अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळेला भेट देऊन तेथील सेंद्रिय निविष्ठा, व्यवस्थापन, जिवाणू कल्चर यांचे तंत्र समजून घेतले. या निविष्ठांचा निवडक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये अवलंब केला. या निविष्ठांचा उपयोग होऊ लागल्यानंतर आता शेतकरी या मूळ कल्चरपासून गूळ, देशी गायीच्या दुधाचे ताक आदींचा वापर करून सेंद्रिय निविष्ठा तयार करू लागले आहेत.

...असा झाला तंत्राचा प्रसार

करडा येथील गोविंद देशमुख यांच्या हळद पिकात दोन वर्षे सुधारित तंत्र व्यवस्थापनाचे प्रयोग घेण्यात आले. चार वर्षांपासून देशमुख आपली संपूर्ण पाच एकर शेती याच पद्धतीने करीत आहेत. त्यांचे अनुकरण जिल्ह्यातील शेतकरी करू लागले आहेत. केव्हीकेतर्फे शेतकरी प्रशिक्षण, प्रक्षेत्र भेटी व चर्चासत्रांचे आयोजन सातत्याने केले जाते. सन २०२३ मध्ये ५० शेतकऱ्यांचा अहमदाबाद येथील गीर गोशाळेचा अभ्यास दौरा घडवण्यात आला. सन २०२४ मध्ये रिसोड येथे मार्गदर्शन शिबिर झाले. त्यास राज्यभरातील दोन हजारांवर शेतकरी उपस्थित होते. आता सेंद्रिय पद्धतीवर भर देण्याच्या उद्देशाने मागील दोन वर्षांत १०० ते १२५ शेतकऱ्यांनी देशी गाईचे संगोपन सुरू केले आहे.

केव्हीकेकडून प्रसार केलेले तंत्र

शेतकऱ्यांना पूर्णपणे कुजलेल्या, अर्थात कंपोस्ट केलेल्या शेणखताचाच वापर करण्यास सांगण्यात आले.

पूर्वी चार फूट रुंदी व अधिक उंचीचे म्हणजे माथा अरुंद असलेल्या गादीवाफ्याचा वापर व्हायचा.

त्यावेळी दोन ओळींतील अंतर पाच ते सहा इंच यायचे. त्यामध्ये सेलम जातीचा गड्डा आतून गोल होण्यास अडथळा तयार व्हायचा. आता बेडची उंची कमी करून दोन ओळींतील अंतर दहा इंचापर्यंत केले आहे.

लागवड झाल्या झाल्या ठिबकच्या नळ्या अंथरण्याचे सांगण्यात येते. त्या वेळी जिवाणू कल्चरचा वापर ठिबकमधून करता येतो. पावसाचा दीर्घकाळ खंड असल्यास ठिबकद्वारे त्वरित निविष्ठा देणे शक्य होते.

बेणेप्रक्रियेसाठी तसेच कंदकुजीसाठी ट्रायकोडर्माचा वापर.

अलीकडील काही वर्षात हुमणी अळीचा प्रादुर्भाव या भागात वाढला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी एकरी दोन किलो मेटॅऱ्हायझियम बुरशीचा वापर होतो. कंदकुज रोगसाठीही ट्रायकोडर्माचा वापर

उत्पादन

सेंद्रिय पद्धतीवर भर देत केलेल्या व्यवस्थापन पद्धतीतून शेतकऱ्यांना एकरी ३० ते ३४ क्विंटलपर्यंत (सुकवलेल्या) तर काही ठिकाणी कमाल ४१ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचे केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी सांगितले. करडा (ता. रिसोड) येथील गोविंद देशमुख यांनी सात वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने हळदीची शेती करण्यावर भर दिला आहे. पूर्वी एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. आता ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात. चार वर्षांपासून सोयाबीन, गहू, हरभरा, कपाशी आणि आंबा या पिकांचे व्यवस्थापन देखील ते या पद्धतीनेच करीत आहेत.

देशमुख यांची प्रेरणा घेऊन करडा येथील २५ महिलांनी गोमाता गट तयार केला. गटामध्ये १०० हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. आसेगाव पेन ( ता. रिसोड) येथील योगेश खानझोडे आठ- नऊ वर्षांपासून हळद घेतात. व्यवस्थापनात सुधारणा केल्यानंतर एकरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात. चार फुटी बेड, एकरी ८ ते १० क्विंटल बेणे असा वापर ते करतात. घरी तयार केलेले गांडूळ खत वा कंपोस्ट खत यांचा ते वापर करतात. जमिनीचा पोत सुधारत असल्याचे ते सांगतात.

गोविंद देशमुख ९५५२३२७१९८, योगेश खानझोडे ९८३४७४७८३४, निवृत्ती पाटील ९९२१००८५७५ (उद्यानविद्या तज्ज्ञ, केव्हीके करडा, जि. वाशीम)

- डॉ. चेतनकुमार सावंत ०७८२८९२६७९९, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भा.कृ.सं.प. केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाल, मध्य प्रदेश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Munghantiwar: मुनगंटीवार यांनी विधिमंडळात उपस्थित केलेले शेतीचे प्रश्‍न ठरले लक्षवेधी 

Solar Pump Issues: सोलर पंपाच्या सक्तीने सिंचन अडचणीत

Wild Vegetable Festival: रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; आदिवासी उत्पादनांना ग्राहकांची पसंती

Nanded Rain: नांदेडला पावसामुळे खरिपाला जीवदान

Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद

SCROLL FOR NEXT