Humani Worm : हळद पिकात हुमणी अळीचा उपद्रव

Turmeric Farming : या वर्षी लागवड असलेल्या हळद पिकात वाढीच्या प्राथमिक अवस्थेतच हुमणी अळीचा उद्रेक वाढू लागला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो आहे.
Humani Pest
Humani PestAgrowon
Published on
Updated on

Washim News : या वर्षी लागवड असलेल्या हळद पिकात वाढीच्या प्राथमिक अवस्थेतच हुमणी अळीचा उद्रेक वाढू लागला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो आहे. शिवाय हळदीचे कंद कुरतडल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या किडीच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक व्यवस्थापनाची गरज असल्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.

मागील वर्षी हळदीला उच्चांकी भाव मिळाल्यामुळे तसेच दर टिकून असल्यामुळे या वर्षी खरीप हंगामात हळदीच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षी तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाची ओळख तयार झाली आहे.

Humani Pest
Humani Pest Kolhapur : पाऊस आला धावून, हुमणी गेली वाहून; ऊस पिकाला चांगलीच उभारी

या वर्षी परराज्यातील बेणे आणून शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. परंतु मागील काही दिवसांपासून हळदीच्या कंदावर हुमणी अळीचे आक्रमण झाले आहे. अळी जमिनीत राहून पिकाचे कंद कुरतडून खाते. झाडे पिवळी पडून पाने गुंडाळली जातात. नंतर वाळून जातात. या अळीचा प्रादुर्भाव एका रेषेत दिसून येतो.

Humani Pest
Turmeric Farming : वेळेवर करा हळद पिकात भरणी

प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळलेली दिसतात. ही कीड लागल्याचे उशिरा लक्षात येते. त्यामुळे व्यवस्थापन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार उत्पादनामध्ये ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता निर्माण होते. सद्यःस्थितीत तालुक्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतामध्ये आंतरमशागत, निंदणी, कोळपणी करावी. जैविक कीडनाशकांचा वापर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने करून हुमणीचे नियंत्रण करावे.
मगनदास तावरे, तालुका कृषी अधिकारी, रिसोड, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com