Vegetable Production
Vegetable Production Agrowon
यशोगाथा

Vegetable : बारमाही भाजीपाला उत्पादन पद्धतीतून उंचावले अर्थकारण

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

परभणी शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवर परभणी ते ताडकळस राज्य रस्त्यावर मिरखेल गाव आहे. जिल्ह्यातील प्रमुख भाजीपाला उत्पादक (Vegetable Producer Village) गाव म्हणून त्याची ओळख होते. परभणी बाजारपेठ जवळ असल्यामुळे गावातील अनेक लहान, मध्यम शेतकरी वर्षातील बाराही महिने विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन (Vegetable Production) घेतात. याच गावातील विठ्ठल नामदेवराव धामणे (Vithhal Dhamane) १७ वर्षांपासून शेती करीत आहेत. त्यांची शिवारात आठ एकर खोल काळी माती असलेली भारी प्रकारची जमीन आहे. सिंचनासाठी (Irrigation) बोअरची व्यवस्था आहे. खरीप (Kharif Crop), रब्बी पिके ते घेतातच. शिवाय अनेक वर्षांपासून दोन एकरांवर बारमाही भाजीपाला उत्पादन (Perennial Vegetables Production) घेण्याची पद्धत त्यांनी अवलंबिली आहे. घरची शेती गावापासून दोन किलोमीटरवर आहे. मात्र तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात भाजीपाल्याची वाहतूक करण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यामुळे तीन वर्षांपासून गावापासून जवळ तसेच सिंचनाची सुविधा (Irrigation Facility) असलेली दोन एकर जमीन भाडेतत्त्वावर करार करून कसण्यास घेतली आहे. यंदा प्रति एकरी २० हजार रुपये या प्रमाणे करार केला आहे.

...असे होते भाजीपाला उत्पादन

धामणे यांना भाजीपाला उत्पादन ते विक्रीचा दीर्घ अनुभव तयार झाला आहे. त्यामुळे वर्षभर विविध सण, समारंभ व ऋतू व त्यानुसार कोणत्या शेतीमालाला केव्हा किती मागणी असते याचा अंदाज त्यांना पुरेपूर आला आहे. त्यादृष्टीने वांगी, टोमॅटो, दोडकी, कारली, दुधी भोपळा, चवळी, भेंडी, फ्लॉवर, अळू असे विविध प्रकार त्यांच्या शेतात हंगामनिहाय दिसतात. एक एकर पासून ते पाच ते दहा गुंठे क्षेत्र याप्रकारे हंगामनिहाय लागवडीची विभागणी असते. प्रातिनिधिक सांगायचे, तर पावसाळ्यात टोमॅटो, चवळी, भेंडी आदींची लागवड होते. रब्बीच्या आसपास किंवा गुढीपाडव्याच्या दरम्यान दोडक्याची लागवड होते.

दोडक्याचा प्लॉट सुरू झाल्यानंतर तो तीन महिने सुरू असतो. तर वांगे सुमारे सहा महिने शेतात असते. वांग्याची दरवर्षी दिवाळीनंतर लागवड होते. सुमारे सहा फूट अंतरावर सरी पाडून ठिबक संचाच्या नळ्या अंथरल्या जातात. वेलवर्गीय पिकांसाठी बांबू आणि तारांचा मांडव तयार करण्यात येतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी गंध सापळ्यांचा वापर होतो. शेताच्या बांधावर विविध प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र झळांपासून काही प्रमाणात संरक्षण होते.

स्वच्छता, प्रतवारी व विक्री

बाजारात विक्रीसाठी पाठविण्याच्या आदल्या दिवशी काढणी केली जाते. शेतातच प्रतवारी केली जाते. पाण्यामध्ये धुऊन स्वच्छ करण्यात येतो. पॅकिंगसाठी तागाच्या पिशव्यांचा वापर केल्याने सुरक्षितपणे वाहतूक होते. भाजीपाल्याचा दर्जा टिकून राहतो. परिणामी, बाजारपेठेत चांगले दर मिळतात.

गावातील भाजीपाला उत्पादक दररोज विविध वाहनांद्वारे परभणी येथे आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात. त्यांच्यासोबत धामणे देखील आपला भाजीपाला घेऊन येत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत परभणी येथील वसमत रस्त्यावरील भाजीपाला बाजारात दररोज सकाळी स्वतः विठ्ठल विक्री करीत असत. त्या वेळी दररोज हजार ते दीड हजार

रुपयांचे उत्पन्न मिळत असे. परंतु २०२१ मध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग, त्यामुळे थेट भाजीपाला विक्री बंद करावी लागली. लॉकडाउनमुळे बाजार बंद राहू लागले. त्यामुळे गेल्या वर्षीपासून थेट ग्राहकांना विक्री बंद केली आहे. प्रातिनिधिक उदाहरण सांगायचे तर सध्या एक दिवसाआड दोन क्विंटल वांगी, तर एक क्विंटल दोडके काढणी होते. साहजिकच माल भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असल्याने थेट विक्री करणेही अवघड होऊन जाते. त्यामुळे परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केट सोपे पडते.

ताज्या उत्पन्नाची हमी

उन्हाळ्यामध्ये लग्नसमारंभ अधिक असतात. त्यामुळे वांग्याला जास्त मागणी असते. परंतु आवक कमी असते. त्यामुळे दरात तेजी असते. त्यामुळे अधिक फायदा होतो. यंदा उन्हाळ्यात वांग्यांना प्रति किलो ४० ते ६५ रुपये दर मिळाले. सध्या वांग्याला सरासरी २० ते २५ रुपये तर दोडक्याला प्रति किलो ५० ते ६० रुपयेपर्यंत दर मिळत आहेत. दररोज ४०० रुपये वाहन भाडेशुल्क पडते.

वर्षभराचा विचार केल्यास दोन एकर भाजीपाला पिकांतून सुमारे पाच लाख, किंबहुना त्याहून अधिक उत्पन्न पदरात पडते. वर्षभर विविध हंगाम सुरू असल्याने ताजा पैसा हाती येत राहतो. कुटुंबाला मोठा आर्थिक आधार देण्यामध्ये भाजीपाला पिकांनी मोठा हातभार लावला आहे.

कुटुंब राबतेय शेतात

विठ्ठल यांचे पत्नी सिंधूबाई, मुलगा देवराव, गोविंद असे चार सदस्यांचे कुटुंब आहे. सर्व जण शेतात राबतात. दोन मुलींची लग्ने झाली आहेत. मुले शिक्षण घेत आहेत. गरजेनुसार बारमाही चार मजूर तैनात केले जातात. त्यामुळे मजूरबळ व उत्पादन खर्चात मोठी बचत होत आहे. घरच्या आठ एकरांत सोयाबीन, हरभरा आदी पिके असतात.

विठ्ठल धामणे, ९९२२८७००६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT