Fisheries
Fisheries  Agrowon
यशोगाथा

मत्स्यपालन व्यवसायाचा आराखडा महत्त्वाचा...

Mahesh Gaikwad

किरण वाघमारे

प्रथमत: ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यसंवर्धन/मत्स्यबीज (Fish Seed) निर्मिती करणार आहोत त्याचे प्रशिक्षण मत्स्य व्यवसाय (Fisheries Business) विभाग/ मत्स्य केंद्रीय संस्था/ मत्स्य महाविद्यालयातील (Fisheries College) तज्ज्ञांकडून घ्यावे. संबंधित तंत्रज्ञानाव्दारे मत्स्यसंवर्धन करीत असलेल्या मत्स्यपालकांच्या प्रकल्पास भेटी द्याव्यात. त्यांचे अनुभव जाणून घ्यावेत.

१) मत्स्यपालन प्रकल्प स्थापित करण्याअगोदर आपल्याला एक मत्स्य उत्पादन घेण्याकरिता येणाऱ्या अंदाजित खर्चाचे अर्थकारण तयार करावे. त्यानुसार आपले एक वर्षाचे कॅलेंडर तयार करावे.

२) प्रकल्प सुरू करण्यापासून ते उत्पादन घेईपर्यंतच्या प्रत्येक महिन्यात करावयाच्या कामांचे नियोजन करावे.

३) प्रशिक्षणात शिकविण्यात आलेल्या किंवा प्रकल्पास भेटी देऊन कळलेल्या तांत्रिक बाबींचे वेळोवेळी अनुकरण करावे.

४) मत्स्यबीज प्रमाणीकरण झालेल्या खात्रीशीर मत्स्यबीज निर्मिती / मत्स्यसंवर्धन केंद्रातूनच करावे.

५) परराज्यांतून मत्स्यबीज खरेदी करताना आवश्यक खबरदारी द्यावी.

६) नियमानुसार मत्स्यबीज प्रजाती संवर्धनासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची परवानगी घ्यावी.

७) शासनाने बंदी घातलेल्या मत्स्यबीज /मासळीचे संवर्धन करू नये.

८) मत्स्यखाद्य व्यवस्थापनाचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखावे.

९) फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे.

१०) पूर्णपणे खात्रीझाल्याशिवाय मत्स्यबीज खरेदी करू नये. बाजारात ज्या मासळीची मागणी आहे किंवा मासे काढणीस तयार झाल्यावर सहजगत्या बाजार आणि दर भेटेल याची दक्षता घ्यावी.

११) सोशल मीडिया इत्यादी माध्यमातून मत्स्यपालनाबाबत पाहण्यात येणाऱ्या व्हिडिओची सत्यता पडताळूनच विश्‍वास ठेवावा. सोशल मीडियावर खूप मोठे चित्र दाखवले जाते, मात्र प्रकल्पाची सत्यता आणि व्हिडिओच्या सत्यतेत खूप मोठी तफावत असते.

१२) मत्स्यपालनातील सर्व बाबींचा अभ्यास झाल्यावरच मत्स्यपालन व्यवसाय सुरू करावा.

१३) मत्स्यपालनात नियोजन फार महत्त्वाचे आहे. आवश्यक मेहनत, योग्य तांत्रिक अभ्यास/व्यवस्थापन व नियोजनावर मत्स्यपालन प्रकल्पाचे यश अवलंबून असते.

१४) पूर्ण खात्री पटल्याशिवाय मत्स्यसंवर्धनाबाबत कोणाच्याही सांगण्यावरून बळी पडू नये.

१५) माशांमध्ये रोग आढळल्यास आपणांस खात्रीशीर उपचार माहिती असल्यास उपचार करावेत. किंवा मत्स्य व्यवसाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषध उपचार करावेत.

१६) वेगवेगळ्या ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलानुसार नियोजन अपेक्षित करावे.

१७) शक्यतो आपल्या मत्स्यपालन प्रकल्पाचा विमा काढून घ्यावा.

१८) मासळी उत्पादनानंतर बाजारात भाव मिळत नसल्यास मासळी विक्री कशी करावी याचे पर्यायी मार्ग तयार ठेवावेत. उदा. जिवंत मासळी विक्री/ मत्स्य फिलेट/ मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ.

१९) या व्यवसायात स्थानिक आणि बाहेरील मासळी बाजाराचा अभ्यास आवश्यक आहे.

२०) प्रकल्प/तलावाचे मत्स्यबीज संचयनाचे प्रमाण क्षेत्रफळ लक्षात घेऊन करावे.

२१) ठरावीक मत्स्यबीजांसाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणातच खाद्य द्यावे.

२२) पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी ठराविक अंतराने जंतूनाशक द्रव, विषाणू रोधक, व बुरशी नाशकाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक उपयोग करावा.

२३) दर महिन्याला पाण्याची गुणवत्ता व मासळी यांची तपासणी करावी.

२४) दररोज माशांच्या वाढीवर, हालचालींवर नजर ठेवावी. सर्व नोंदी लिहून ठेवाव्यात. दैनंदिन नोंदी ठेवल्यास मरतुक टाळता येते.

२५) भौतिक, रासायनिक, जैविक बाबी तपासणीच्या नोंदी ठेवाव्यात. सदर नोंदी असल्यास तज्ज्ञांना कळविण्यास सोपे होते. योग्य मार्गदर्शन मिळते. तसेच भविष्यात स्वत:साठी संदर्भ म्हणून नोंदींचा योग्य तो वापर करता येऊ शकतो.

-----------------------------------

संपर्क ः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(सहा. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT