Water Conservation Work Agrowon
यशोगाथा

Water Conservation : कोठलीत जलसंधारणातून टंचाईशी लढा

Article by Mukund Pingle : कोठली (ता.नंदुरबार) या अवर्षणप्रवण गावाने दुष्काळ व पाणी टंचाई दूर करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणासह वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम केले.

मुकूंद पिंगळे

Nandurbar News : कोठली (ता.नंदुरबार) या अवर्षणप्रवण गावाने दुष्काळ व पाणी टंचाई दूर करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणासह वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम केले. यामुळे पीकपाण्याने शिवार फुलले आहे. २०१८ मध्ये पाण्याअभावी गावामध्ये प्यायला पाणी नव्हते तसेच दुष्काळामुळे पिके सोडण्याची वेळ आली होती.

अशा स्थितीत सुलवाडे (ता.शहादा) येथील स्वप्नील पाटील यांनी गावाला जलसंचय, जलसंधारण यासंबंधी संकल्पना आणि कामे कशी घेता येतील, याचा मार्ग सुचविला. याला पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन या संस्थांची साथ मिळाली. जल संधारणाच्या उपाययोजनांसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढली. सुरवातीला ग्रामस्थ एकत्र येत नव्हते.

जलसंधारण करूनही काही लाभ होईल की नाही, हा प्रश्न लोकांच्या समोर होता. परंतु गावातील युवकांनी एकत्र येत जलमित्र गट तयार केला. या गटामध्ये दीपक पटेल, सागर पाटील, विलासभाई पाटील, तुषार पाटील, बळिराम पाटील, देवेंद्र पटेल, राहुल पाटील, वैभव पाटील, कैलास पाटील, आशुतोष पाटील आदींनी कामात सक्रियता दाखविली. इतर ग्रामस्थ, वरिष्ठांनीदेखील उपक्रमाला साथ दिली.

जलसंधारण करूनही काही लाभ होईल की नाही, हा प्रश्न लोकांच्या समोर होता. परंतु गावातील युवकांनी एकत्र येत जलमित्र गट तयार केला. या गटामध्ये दीपक पटेल, सागर पाटील, विलासभाई पाटील, तुषार पाटील, बळिराम पाटील, देवेंद्र पटेल, राहुल पाटील, वैभव पाटील, कैलास पाटील, आशुतोष पाटील आदींनी कामात सक्रियता दाखविली. इतर ग्रामस्थ, वरिष्ठांनीदेखील उपक्रमाला साथ दिली.

या उपक्रमाच्या नियोजनासाठी पस्तीस जण एकत्र आले. गावाने ४० लाख रुपये लोकवर्गणी जमा केली. जिल्हा परिषदेतील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी १२ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळवून दिले. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनीही मदत केली. गावातील ग्रामविकास अधिकारी रोहिदास पवार यांनी १० लाख रुपयांची मदत केली.

मुख्य नाल्याचा खोलीकरणासाठी जलसंधारणाच्या भाडेतत्त्वावर यंत्रणा आणण्यात आली. सतत तीन महिने हे काम सुरू होते. लहान नाल्यांचे आवश्यकतेनुसार रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले. रंका नाला व अन्य दोन लहान नाल्यांवर कामे करण्यात आली. गावशिवारात एकूण १५ किलोमीटर एवढ्या अंतरात हे काम झाले.

जल आणि मृद संधारणाच्या उपायांमुळे गावातील सुमारे ८०० एकर क्षेत्राला फायदा झाला आहे. गावात पाणी टंचाई स्थिती कमी झाली आहे. गावकरी काटकसरीने पाण्याचे नियोजन करत आहेत. यंदा पाऊसमान कमी आहे. परंतु गावात पाणी टंचाई नाही. परंतु भविष्यात पाणी टंचाई स्थिती तयार होवू नये यासाठी पुन्हा जल,मृद् संधारणाच्या उपाययोजनांवर गावाने भर दिला आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT