Tur Farming  Agrowon
यशोगाथा

Tur Farming : अभ्यासातून साधली तुरीची उत्पादकतावाढ

Tur Production : राज्यातील आदर्श तूर उत्पादक म्हणून मांडवगण (जि. अहिल्यानगर) येथील प्रशांत देशमुख यांनी ओळख कमावली आहे. सातत्याने अनेक वर्षांपासून प्रयोग करीत त्यांनी तुरीच्या एकरी उत्पादकतेत यशस्वी वाढ केली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Tur Cultivation Success Story : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड भागातील जिरायती पट्ट्यात तुरीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. या भागातील शेतकरी तुरीच्या आदर्श व्यवस्थापनातून आर्थिक प्रगती साधत आहेत. मांडवगण (जि. अहिल्यानगर) येथील प्रशांत अनिल देशमुख यांची राज्यातील आदर्श तूर उत्पादक अशी ओळख आहे.

सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर २००७ च्या दरम्यान त्यांनी घरच्या शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सन २०१२ मध्ये भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. कमी पाण्यात येणारे पीक व उसालाही पर्याय म्हणून त्यांनी तुरीची निवड केली. त्यानंतर २०१३ पासून ते आजगायत सुमारे ११ वर्षे विविध प्रयोग व तंत्रांच्या वापरातून हे पीक त्यांनी यशस्वी केले आहे.

देशमुख यांचे आदर्श तूर व्यवस्थापन

लागवडीच्या अंतरात बदल, सुधारित वाणांचा वापर व व्यवस्थापनातील बाबी यांच्या आधारे एकरी ८, १२ पासून १६ क्विंटलपर्यंत उत्पादकता देशमुख यांनी आजपर्यंतच्या काळात साध्य केली आहे. उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन वाढ घेण्याचे त्यांचे तंत्र आहे. दरवर्षी सुमारे १० एकरांपर्यंत त्यांचे तुरीचे क्षेत्र असते. व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे सांगायचे तर पूर्वी ते दोन ओळींत दीड फूट व दोन रोपांत सहा इंच या पद्धतीने लागवड करायचे. पाच जून ते तीन जुलै कालावधीपर्यंत ते पेरणी आटोपायचे. पाच जूनच्या पेरणी केलेल्या क्षेत्रात एकरी १६ क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे.

पेरणीच्या तारखा पुढे गेल्यास उत्पादनावर परिणाम होऊन ते घटत जाते असे देशमुख यांचे निरीक्षण आहे. म्हणून अधिक उत्पादनवाढीचे उद्दिष्ट ठेवताना पेरणीची वेळ खूप महत्त्वाचे असल्याचे प्रशांत सांगतात. विविध प्रयोग करताना पूर्वीचेच लागवड अंतर तसेच जोडओळ पद्धतीचा वापर. दोन जोडओळीत बारा फुटांपर्यंत अंतर अशा सुधारणा त्यांनी केल्या आहेत. एकावर्षी जून ते ऑगस्ट पाऊस नसताना गरजेनुसार दररोज १० ते १५ मिनिटे ठिबक सुरू ठेऊन त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन केले. त्या प्रतिकूल स्थितीत एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले.

एकरी झाडांची संख्या अपेक्षित ठेवण्यासाठी दोन वर्षांपासून दोन ओळींत साडेचार फूट आणि दोन झाडांमध्ये ते सहा इंच अंतर ठेवून लागवड करतात. दोन ओळी, रोपांतील अंतर व जोडओळनुसार एकरी झाडांची संख्या सात हजार, आठ हजार, दहा हजार व त्यापुढे अशी वेगवेगळी राहते. तुरीच्या दोन ओळींत अंतर जास्त असल्याने मूग, उडीद, सूर्यफूल आदी कमी कालावधीची पिकेही घेता येतात असे देशमुख सांगतात. तुरीची पेरणी शक्यतो २० मेनंतर व १० जूनच्या आत करावी. या कालावधीतील पेरणीमुळे उत्पादनात वाढ प्रकर्षांने जाणवते. उगवणीनंतर एक ते दीड महिन्यानी जमिनीच्या पोतानुसार व पाऊसमानानुसार विरळणी करावी असेही ते सांगतात.

वाणांची निवड

प्रामुख्याने पांढरी व लाल तूर प्रचलित आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या गोदावरी वाणाचा वापर देशमुख यांनी मागील हंगामात केला आहे. हा वाण बागायती असून, मर व वांझ रोगास प्रतिकारक आहे. याच विद्यापीठाचे बीडीएन ७११ हे वाण हे वाण जिरायतीसाठी अनुकूल असल्याचे देशमुख सांगतात. विद्यापीठाच्या शिफारसीनुसार रासायनिक व जैविक निविष्ठांची बीज प्रक्रिया व अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पेरणीपूर्वी एकरी ३ ते ४ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा दरवर्षी वापर फायदेशीर ठरतो.

यांत्रिकीकरणाचा वापर

अलीकडील काळातील भीषण मजूरटंचाई लक्षात घेता देशमुख यांनी भागीदारीत आधुनिक हार्वेस्टर घेतला आहे. तूर उत्पादकांनाही त्याची सेवा त्यांनी दिली आहे. अलीकडील वर्षांचा विचार केल्यास प्रति क्विंटल सहा हजांरापासून नऊ हजारांपर्यंत दर देशमुख यांना मिळाला आहे.

यंदा (२०२४-२५) हा दर ७५०० रुपये होता. एकरी उत्पादन खर्च १५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत येतो. सन २०१५ मध्ये क्विंटलला १७ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे देशमुख सांगतात. कितीही दुष्काळ असला, पाण्याची स्थिती प्रतिकूल असली तरी खरीप कमी बियाणे, कमी मशागत, कमी पाण्यात व कमी खर्चात तुरीचे पीक घेता येते असे देशमुख सांगतात.

- प्रशांत देशमुख ९९७००२३००७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT