हिरवाईने बहरलेला वांग्याचा प्लॉट
हिरवाईने बहरलेला वांग्याचा प्लॉट  
यशोगाथा

वर्षातील दोन हंगामांतून बारमाही भाजीपाला शेती

Vinod Ingole

बोथली (पांजरा) (जि. वर्धा) येथील कुरवाडे कुटुंबाने वर्षाचे किमान दोन हंगाम पकडून त्यात बारमाही भाजीपाला शेतीची पद्धत फुलवली आहे. चवळी, ढेमसे, टोमॅटो, वांगी आदी पिकांची लागवड, त्यातून ताजे उत्पन्न, थेट विक्रीवर भर, कापूस, सोयाबीन आदी प्रचलित पिकांव्यतिरिक्त व्यावसायिक पिकांची निवड  अशी विविध गुणवैशिष्ट्ये जपत त्यांनी प्रगतिशील शेतीची कास धरली आहे. अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी कमी कालावधीची पिके घेत वर्षात अधिकाधिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कापूस, सोयाबीन या प्रचलित पिकांमध्ये विविध समस्याही जाणवतात. सर्व विचार केला, तर प्राप्त परिस्थितीत भाजीपाला पिकांचा पर्याय योग्य ठरू शकतो. वर्धा जिल्हा तसा कापूस, सोयाबीन आदी प्रचलित पिकांसाठी अोळखला जातो. याच जिल्ह्यातील बोथली (पांजरा) येथे शेती असलेले संजय कुरवाडे यांनी मात्र अलीकडेच भाजीपाला शेतीची वाट पकडली. त्यातही बारमाही पीकपद्धती रुजविण्याचा प्रयत्न केला. संजय चंद्रपूर येथे राहतात. शेताच्या ठिकाणापासून हे शहर तब्बल १८० किलोमीटरवर आहे. मात्र पंधरा दिवसांतून किमान दोन वेळा शेताकडे येऊन तेथे दोन दिवस मुक्काम करायचा, तसेच अन्य वेळी फोनद्वारे शेतीवर देखरेख ठेवण्याचे काम संजय करतात. शेतात पूर्णवेळ संजय यांचे वडील श्यामराव राबतात. ग्रामपंचायतीत नोकरीस असलेले बंधूही शेतीत मदत करतात. कुरवाडे यांची शेती पद्धती :

  • एकूण क्षेत्र- सुमारे ११ ते १२ एकर
  • ओलीत (बागायती)- साडेतीन एकर
  • पिके- एक एकर- कपाशी
  • अडीच ते तीन एकर- भाजीपाला
  • आठ वेगवेगळे सर्व्हे क्रमांक आहेत. त्यासोबतच जमिनीच्या क्षेत्रातून नाला गेला आहे. जंगलाचा परिसरदेखील या ठिकाणी असल्याने वन्यप्राण्यांकडूनही पिकांचे नुकसान होते. परिणामी, दहा एकर जमीन पडीक आहे.
  • सिंचन : संजय यांचे काका देवराव यांच्या शेतात धडक सिंचन योजनेतून विहीर खोदली आहे. या शेतापासून संजय यांचे शेत सुमारे ९५० फुटांवर आहे. त्या क्षेत्रापर्यंत पाइपलाइन टाकत सिंचनाची सोय केली आहे. अद्याप ठिबक सिंचन केलेले नाही. मात्र येत्या काळात त्याचे नियोजन आहे.   विक्री पद्धती : गावापासून सुमारे १५ ते २० किलोमीटरवरअसलेली पुलगाव आणि आर्वी ही तालुक्‍याची ठिकाणे आहेत. येथे व्यापाऱ्यांना विक्री होतेच. शिवाय आठवडी बाजारात थेट विक्री करण्याची मेहनतदेखील कुरवाडे घेतात. रोहणा, पिंपळखुटा, आर्वी येथे असे असे बाजार भरतात. संजय यांची आई लक्ष्मीबाई आठवड्यातील या बाजारांच्या दिवसांचे नियोजन करतात. त्या वेळापत्रकानुसार विक्रीची जबाबदारी सांभाळतात. वडील श्यामराव यांचाही त्यांना अनेक वेळा मदत होते. संजय यांच्या चुलतभावाची प्रवासी वाहतुकीसाठी ऑटो आहे. त्याचा वापर भाजीपाला वाहतुकीसाठी केला जातो.  थेट विक्रीमुळे प्रति किलो किमान १० ते १५ रुपये दर जास्तीचा मिळून उत्पन्नात वाढ होते.

    साधारण मिळणारे दर (प्रति किलो)

  • चवळी    ४५ रु.
  • ढेमसे    १५ ते २० रु.
  • गवार    ६० ते ६५ रु.   
  • वांगी    २० रु.
  • आंतरपीक म्हणूनही भाजीपाला : तुरीत मूग, उडीद यांचीही लागवड केली होती. मूग, उडीद सुमारे ६५ दिवसांत निघाले. दोन्ही पिकांपासून सुमारे अडीच क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. अपेक्षित दर नसल्याने यंदा दोन्ही मालाची विक्री केलेली नाही. मूग, उडीद काढणीनंतर रिकाम्या झालेल्या जागेत तुरीच्या शिवारातच वांगी, टोमॅटो आदींची लागवड केली आहे.    सुधारित पीक पद्धतीतून काय साधले? कपाशी किंवा प्रचलित पिकांच्या तुलनेत भाजीपाला पिके उत्पन्नाचा वर्षभर स्रोत राहतात. त्याचा वापर दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी होतो. त्यामुळेच ही पिके ‘एटीएम’प्रमाणेच असल्याचे संजय सांगतात. भाजीपाला पिके म्हटले सतत काढणीचे काम राहते. कुरवाडे यांनी आपल्या शेतीत चार मजुरांना वर्षभर काम दिले आहे. त्याचबरोबर संजय यांचे आई-वडील मोठा हातभार लावतात. त्यामुळे मजुरांवरील खर्चाचा भार काहीसा हलका होतो.  बारमाही लागवड :

  • वर्षभर उत्पन्न मिळत राहील यादृष्टीने वर्षभर पिके घेण्याचे कौशल्य.
  • एक पीक पुन्हा दुसऱ्या हंगामात घेताना जागा बदलली जाते.
  • जून व आॅक्टोबर- अशी दोन हंगामांत टोमॅटो लागवड. म्हणजे एका काढणीनंतर पुन्हा वर्षातील दुसऱ्या टप्प्यात उत्पादन मिळणे सुरू राहते.  
  • चवळी- साधारण १२० दिवसांत पीक येते. वर्षातील चार हंगामांत पीक घेतले जाते.गवार- जून तसेच सप्टेंबरमध्ये पुन्हा लागवड -ढेमसे- सुमारे ७० दिवसांचे पीक. मे व डिसेंबर अशी दोन टप्प्यांत लागवड
  • वर्षभरातील अधिक काळ विक्रीस उपलब्ध ठेवण्याची त्यातून सोय
  • बाजारपेठेत ज्या मालाला मागणी आहे त्यांचीच निवड. मागील हंगामात कोबीसारखे पीक घेतले होते. मात्र त्यातून अपेक्षित काहीच लाभ झाला नाही.
  • संपर्क :  संजय कुरवाडे, ९५२७३६६९५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    SCROLL FOR NEXT