वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी दहा वर्षांपासून भेंडीची शेती करतात. वर्षांतील दोन हंगामात ही भेंडी पिकवून त्यापासून चांगले उत्पन्न ते घेतात. त्यात कमी कालावधीची विविध पालेभाज्यांची आंतरपिके घेत भेंडीचा उत्पादन खर्च ते कमी करतात. वाशीम येथील व्यापाऱ्यांना दररोज मापारी यांच्या भेंडीची प्रतीक्षा असते. यावरून त्यांच्या भेंडीची गुणवत्ता आणि लोकप्रियता लक्षात येते. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील सोमठाणा हे सुमारे एक हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाचे अर्थकारण जवळपास शेतीवर अवलंबून आहे. हंगामी स्वरूपाची सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी भाजीपाला पिके घेतात. मालेगाव, वाशीम या बाजारपेठा त्यांना हक्काच्या आहेत. वर्षभर भेंडीशेतीचे नियोजन
उत्पादन
आंतरपिके भरून काढतात उत्पादन खर्च भेंडीत पहिल्या ४५ दिवसांपर्यंत कोथिंबीर, चूका, शेपू, मेथी अशा कमी कालावधीच्या पालेभाज्यांचे आंतरपीक घेतले जाते. भेंडी वरंब्यावर असते. एका एकरांत साधारण पाच किलो शेपू, पाच किलो कोथिंबीर तसेच मधल्या भागात मुळा, बीट असे प्रकारही असतात. ही पिके भेंडीचा ५० टक्के खर्च कमी करतात. काही वेळा कोथिंबिरीला किलोला २०० रुपये कमाल दरही घेतला आहे. भेंडी सुरू होण्यापूर्वीच त्याद्वारे उत्पन्न हाती येते. भेंडीत कष्टही फार भेंडीची दररोज पहाटे तोडणी करावी लागते. गावापासून वाशीम बाजारपेठ १५ किलोमीटरवर आहे. वाहतुकीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून बसण्यापेक्षा स्वतःचीच पिकअप व्हॅन विश्वनाथ यांनी घेतली आहे. तोडणीनंतर माल लोड करणे, स्वतः गाडी चालवून तो वाहून नेणे, बाजारपेठेत अनलोड करणे असे दररोजचे कष्ट असतात. मापारी यांच्या भेंडीची प्रतीक्षा गुणवत्तापूर्ण व ताजी भेंडी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मापारी यांच्या भेंडची ओळख तयार झाली आहे. आपल्या भेंडीची व्यापारी किमान अर्धा तास वाट पाहात बसलेले असतात. आपल्या भेंडीला अन्य भेंडीपेक्षा किलोमागे पाच ते दहा रुपये दर जास्त मिळतो, असे विश्वनाथ यांनी सांगितले. सर्वाधिक दर केव्हा? वर्षात मे, जून, जुलै या महिन्यांमध्ये भेंडीला चांगले दर मिळत असल्याचा विश्वनाथ यांचा अनुभव आहे. हिवाळ्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीतही माल अधिक निघत नसल्यानेही या काळात भेंडीचा दर वधारलेला राहतो. भेंडीला वर्षभरात कधीच फार पडलेले दर मिळत नाहीत असे ते म्हणाले. विशेष नियोजनातील बाबी
शेडनेटचे नियोजन भाजीपाला शेतीचा मोठा अनुभव गाठीशी आल्याने आता संरक्षित शेतीचा विचार सुरू आहे. गावाजवळ असलेल्या शेतापैकी अर्ध्या एकरात शेडनेट उभारून भाजीपाला पिके घेण्याचे नियोजन आहे.
संपर्क- विश्वनाथ मापारी- ८६९८६०३०१२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.