भाजी काढणीत परिवारातील सर्वांचे कष्ट असतात.
भाजी काढणीत परिवारातील सर्वांचे कष्ट असतात.  
यशोगाथा

पालक, माठ, चाकवताने शेती केली सोपी

Abhijeet Dake

कांदा, मुळा, भाजी  अवघी विठाई माझी  संत सावंता माळी यांच्या अभंगातील या ओळी भाजीपाला शेतीलाच देव मानलेल्या शेतकऱ्याच्या भावना प्रकट करतात. कवलापूर (जि. सांगली) येथील माळी कुटुंबाने अनेक वर्षांपासून किमान १० गुंठ्यांत माठ, पालक, चाकवत आदींच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. वर्षभर किमान सातजणांचे कुटुंब सुरळीत चालू शकेल एवढे उत्पन्न देण्याची या पिकांत क्षमता असल्याचे या शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.   .  सांगली जिल्ह्यात सांगली तासगाव राज्यमार्गावर वसलेले कवलापूर हे गाजरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. भाजीपाला पिकांसाठीही गावाने ओळख तयार केली आहे. ऊस, द्राक्ष हीदेखील गावची पिके आहेत. गावातील (जखीणमळा) येथे राजेंद्र पुंडलिक माळी, महादेव बाळू माळी आदी भाजीपाला उत्पादक राहतात. या कुटुंबाचा मोठा परिवारच आहे. कुटुंबातील वाडवडिलांनी कष्ट करून या भागात सुमारे २५ एकर शेती खरेदी केली. अनेक वर्षांपासून त्यांनी भाजीपाला लागवडीत सातत्य व चिकाटी ठेवली आहे. ती अशा अर्थाने की शेती बदलत गेली. आव्हानं वाढली. तरी प्रत्येक कुटुंब किमान १० गुंठ्यांत भाजीपाला घेताना दिसतो आहे. कुटुंब विस्तारले तरी प्रत्येक घरातील चार पिढ्या भाजीपाल्याच्या शेतीला जोडले गेले आहेत.  भाजीपाला उत्पादकांचे अनुभव  भाजीपाला हाच पर्याय  शेतकऱ्यांच्याच शब्दात सांगायचे तर जखीणमळ्यात पाणी सवळ म्हणजे क्षारयुक्त आहे. यामुळे दुसरे पीक वटत नाही. दावणीला जनावरं असल्याने चाऱ्यासाठी किमान पाच एकरांवर वैरण असते.  यामुळे घरच्या घरीच चारा उपलब्ध होतो. जमिनीची स्थिती पाहाता भाजीपाला हाच मुख्य पर्याय असतो.  घरातील सदस्यांचे कष्ट  भाजीपाला म्हटलं की वेळेत काढणी आली. तरच बाजारपेठेत चांगला दर मिळतो. या कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र घरातील सर्व सदस्य राबून कामे वेळेत करतातच. शिवाय मजुरी खर्चात बचत करतात अस सौ. शोभा माळी सांगतात.  मार्केटचा अभ्यास महत्त्वाचा  ऋषिकेश माळी म्हणाले, की मी शेती विषयातील शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतात राबण्यातून प्रात्यक्षिकाचाही आनंद मिळतो. विक्रीचीही जबाबदारी सांभाळतो. दर सातत्याने बदलत असल्याने सांगली येथील शिवाजी मंडईत दररोज सकाळी जावेच लागते. मंडईत गेल्याने कोणत्या भाजीला किती मागणी आहे, दर काय आहेत याचा पूर्ण अंदाज येतो. त्यानुसार त्या भाजीची निवड केली जाते. म्हणूनच अपेक्षित दर मिळण्यास मदत होते. 

लागवडीचे नियोजन 

  • पावसाळा, हिवाळी हंगाम- पालक, चाकवत 
  • उन्हाळी हंगाम- चाकवत, तांबडा व हिरवा माठ 
  • वाफ्यात लागवड 
  • माठाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिली कापणी ३० दिवसांत येते. त्यानंतर प्रत्येक कापणी १५ दिवसांनी केली जाते. एकूण साधारण चार कापण्या होतात. 
  • पालक, चाकवत या भाज्या ३० दिवसांत काढणीस येतात. त्यानंतर दुसऱ्या वाफ्यांमध्ये पुढील लागवड होते. 
  • हंगाम संपल्यानंतर दोन महिने रानाला विश्रांती दिली जाते 
  • विक्रीचे नियोजन 

  • गरजेनुसार शंभर पेंड्यांचा गठ्ठा तयार केला जातो. 
  • सौद्यासाठी भाजीपाला न ठेवता सांगली शहरातील शिवाजी मंडईत किरकोळ व्यापाऱ्यांस विक्री 
  • काहीवेळा किरकोळ व्यापारी जागेवर खरेदीसाठी येतात. 
  • अन्य जिल्ह्यांतून व्यापाऱ्यांकडून भाडेशुल्क वजा करून होते खरेदी 
  • पाल्याची करतात लागवड 
  • उन्हाळ्यात दररोज सर्व प्रकारचा भाजीपाला ७ हजार ते ८ हजार पेंड्यांंपर्यंत विक्रीसाठी 
  • पालक, चाकवत- २५०० पेंड्या 
  • बाजारपेठ 

  • सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, कऱ्हाड, इस्लामपूर (स्थानिक व तुलनेने जवळची शहरे) 
  • पालक, चाकवत- सांगली- शिवाजी मंडई 
  • दहा गुंठ्यांतील अर्थशास्त्र 

  • टप्प्याटप्प्याने लागवड 
  • मशागतीपासून ते काढणीपर्यंत सुमारे पाच हजार रुपये. 
  • पाच हजार पेंड्यांचे उत्पादन 
  • सरासरी दर- ३०० ते ३५० रुपये प्रतिशेकडा 
  • खर्च जाता ९ ते १० हजार रुपये नफा 
  • प्रतिक्रिया  भाजीपाल्यासाठी एक एकर क्षेत्र ठेवतो. यात टप्प्याटप्प्याने पालक, चाकवत आदींचा समावेश असतो. आमची तिसरी पिढी भाजीपाला शेतीत आहे. अपेक्षित दर न मिळाल्यास नुकसानही सोसले. भाजी मोफत देण्याची वेळ आली. पण लागवड कधीच थांबविली नाही. या शेतीतून सात जणांच्या कुटुंबाचा प्रपंच चालू शकतो इतकी रक्कम निश्‍चित मिळते. दररोज ताजा पैसा हाती येतो. आता शिल्लक रक्कम हाती ठेवत त्यातून जमिनीची खरेदीदेखील शक्य केली आहे.  -राजेंद्र पुंडलिक माळी- ९८२२४४९५६९    
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

    Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

    Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

    Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

    Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

    SCROLL FOR NEXT