उडिदाची अडतदारांकडे सुरू असलेली स्वच्छता.
उडिदाची अडतदारांकडे सुरू असलेली स्वच्छता. 
यशोगाथा

जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले उच्चांकी दरावर

Chandrakant Jadhav

उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या बाजारात पावसाळ्याचे तीन-चार महिने वगळता या शेतमालाला चांगला उठाव असतो. मागील दोन वर्षे हंगाम बऱ्यापैकी राहिला. यंदाचा हंगाम अती पावसामुळे खराब झाला. बाजारात उडिदाची आवक मागील हंगामाच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली. जळगाव व लगतच्या डाळमील व्यावसायिकांकडून चांगला उठाव व कमी आवक यांमुळे दर ४५०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सध्या मिळत आहेत. यंदा नोव्हेंबरच्या सुरवातीला दर नऊ हजार रुपयांपर्यंत पोचले होते. जळगावच्या बाजारात मागील पाच ते सात वर्षांतील उडदाला मिळालेले हे उच्चांकी दर ठरले आहेत. जमिनीची सुपीकता व तुलनेने कमी खर्च या दृष्टीने उडीद हे लाभदायी पीक मानले जाते. खानदेशात दरवर्षी मिळून किमान ६० ते ६५ हजार हेक्‍टरवर उडदाची खरिपात पहिल्या पावसानंतर पेरणी केली जाते. जळगाव जिल्ह्यात सरत्या हंगामात सुमारे २६ हजार हेक्‍टरवर उडदाची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊसमान चांगले होते. परंतु, मळणीची वेळ आली तेव्हा म्हणजेच ऑगस्टच्या अखेरीस व सप्टेंबरच्या पहिल्या दोन-तीन आठवड्यांत अति पाऊस झाला. यात पिकाचे अतोनात नुकसान झाले. पावसाची थोडीफार उसंत मिळाली त्या वेळी शेतकऱ्यांनी धावपळ करून मळणी, वाळवणूक करून घेतली. तरीही उत्पादनात यंदा ६५ ते ७० टक्के घट आल्याने बाजारातील आवकेवर परिणाम झाला आहे. उडीद आवकेचे चित्र बाजारात उडदाची सप्टेंबरच्या अखेरीस काहीशी आवक झाली. सुरुवातीला आर्द्रता अधिक असलेल्या मालाचे क्विंटलला ३५०० रुपयांपर्यंत तर दर्जेदार मालाचे दर ५२०० रुपयांपर्यंत होते. दर कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी विक्रीच्या मागे न लागता घरीच वाळवणूक केली. ऑक्‍टोबरमध्ये मग आवक हळूहळू वाढू लागली. यंदा ऑक्‍टोबरमध्ये प्रतिदिन दोन हजार क्विंटल आवक झाली. पुढे नोव्हेंबरमध्ये ती तीन हजार क्विंटलपर्यंत आवक जळगावच्या बाजारात झाली. डाळमिल उद्योगाकडून मागणी दिवाळीपूर्वी डाळमिल उद्योगाकडून उडदास मोठी मागणी राहिली. कारण, दिवाळीनंतर त्वरित या व्यावसायकांकडून उडीद प्रक्रिया सुरू होते. लगतच्या भागातील पापड उद्योगातून उडीद डाळीची मागणी वाढते. एकट्या जळगाव शहरात सुमारे ३० डाळमिल्स आहेत. त्यांच्याकडून ऑक्‍टोबरमध्ये प्रतिदिन किमान तीन हजार क्विंटल उडदाची मागणी होती. जेवढा व ज्या दर्जाचा माल मिळेल त्याची खरेदी करण्यात येत होती. आवक कमी राहिल्याने दिवाळीपूर्वी दर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. नोव्हेंबरमध्ये आवक काहीशी वाढली. सध्या दर ५००० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. अधिक आर्द्रता व कमी दर्जाच्या मालाचे हेच दर ४००० रुपयांपर्यंत आहेत. येथून होतेय आवक उडदाची आवक जळगाव, जामनेर, धरणगाव, भुसावळ, यावल व औरंगाबादमधील फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, जालना या भागांतून होत आहे. दरवर्षीदेखील याच भागातून आवक होत असते. सर्वाधिक आवक जळगाव तालुक्‍यातून होते. आवक, दर व उलाढाल (प्रतिदिन) सन २०१७- ऑक्‍टोबर- चार हजार क्विंटल नोव्हेंबर- साडेतीन हजार क्विंटल. दर- ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल. २०१८ ऑक्‍टोबर- साडेतीन हजार क्विं. -नोव्हेंबर- चार हजार क्विंटल दर- ४२०० ते ५२०० रू. -नोव्हेंबरमध्ये काही शेतकऱ्यांना ५४०० रुपये दर मिळाला. २०१९ ऑक्‍टोबर- अडीच हजार क्विंटल नोव्हेंबर- तीन हजार क्विंटलपर्यंत -ऑक्‍टोबरमध्ये ३००० रुपये दर. -दर- ऑक्‍टोबरच्या अखेरीस ५००० ते ९००० रुपयांवर. -नोव्हेंबरमध्ये किमान ४००० ते ५००० तर कमाल ७२०० रु. उलाढाल (सुमारे) २०१७- १२८ कोटी रु. २०१८- ११० कोटी रु. २०१९- ७० ते ८० कोटी रू. (अपेक्षित) किफायतशीर पीक उडीद हे कमी पावसात हलक्‍या, काळ्या कसदार जमिनीत येते. पेरणीसाठी बहुसंख्य शेतकरी घरी जतन केलेल्या बियाण्याचा वापर करतात. एकरी सात ते आठ किलो बियाणे लागते. काही शेतकरी रासायनिक खतांचा वावर फार करीत नाहीत. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांत फॉस्फेटवर्गीय खताची गोणी वापरतात. हे सुमारे ७० ते ७५ दिवसांचे पीक आहे. पीक मळणीवर आल्यावर कापणी व शेतात गोळा करून ढीग करण्यासाठी एकरी १४०० रुपये दर यंदा द्यावा लागला. मळणीला प्रतिक्विंटल २५० ते ३०० रुपये दर लागला. मागील वर्षी काळ्या कसदार जमिनीत एकरी चार क्विंटलपर्यंत उत्पादन काही शेतकऱ्यांना मिळाले. यंदा हवामानाचा परिणाम होऊन ते दोन ते अडीच क्विंटलपर्यंत मिळाले. काही शेतकऱ्यांना अतिपावसामुळे ५० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान सोसावे लागले. उडदाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर अनेक शेतकरी पाऊसमान चांगले असले तर कोरडवाहू हरभरा, ज्वारी पेरतात. तर कृत्रिम जलस्रोत उपलब्ध असलेले शेतकरी केळी, मका, गहू, काबुली हरभरा, कांदा आदी पिके घेण्याचे नियोजन करतात. संपर्क- शशिकांत बियाणी-८६६८४१६४९७, ०२५७- २२१०४१५ संचालक, बाजार समिती, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT