संतोष पवार यांचा गीर गायींचा गोठा
संतोष पवार यांचा गीर गायींचा गोठा  
यशोगाथा

देशी गायींच्या दुग्ध व्यवसायाला ऑरगॅनिक हॉटेलची जोड

Suryakant Netke

धोंड पारगाव (जि. नगर) येथील संतोष पवार यांनी ५० गीर गायींचे संगोपन करून दररोज सुमारे १२५ लिटर देशी दुधासाठी ग्राहक पेठ तयार केली आहे. मधुबन ऑरगॅनिक हॉटेल ही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना सुरू करून सेंद्रिय शेती व बाजारपेठेलाही गती देण्याचा प्रयत्न केला आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड हा सीमेवरील शेवटचा तालुका. येथील बहुतांश गावांना सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. धोंडपारगाव हे त्यातीलच गाव. येथील संतोष मोहनराव पवार यांनी ॲग्री व इलेक्ट्रिकल पदवीकेचे शिक्षण घेतले. वडिलोपार्जित चाळीस एकर शेती. मात्र अवर्षणाचे कायम संकट. शिक्षणानंतर त्यांनी नोकरीचा शोध घेतला. परंतू मनासारखी नोकरी मिळत नसल्याने विविध कंपन्यांत इलेक्‍ट्रिकलची कामे घ्यायला सुरुवात केली. त्यात चांगला जम बसला. नगर, पुणे, औरंगाबादला कामे सुरू असताना ते धोंड पारगावाहून नगर शहरात रहायला आले. भाडेतत्त्वावर शेती व्यवसाय चांगला चाललेला असतानाही शेती-मातीची ओढ सतावत होती. त्यातूनच देशी गीर गायींचे संगोपन सुरू केले. नगर शहराजवळील नगर-औरंगाबाद रस्त्यानजीक बुऱ्हाणनगरच्या हद्दीत सहा वर्षांपूर्वी दहा एकर आणि त्यानंतर पुन्हा पंधरा एकर अशी पंचवीस एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली. त्यात टोमॅटो, वांगी, कारले, दोडके, गवार, भेंडी, काकडी, पालक आदींचे सुमारे ८० ते ९० टक्के सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली. गोमूत्र, शेणखताची गरज भासली. मात्र ते उपलब्ध झाले नाही. मग देशी गोपालन व्यवसायाला चालना मिळाली. गुजरातहून सहा देशी गीर गायी आणल्या. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली. ५० गायींचे गोकूळ सध्या १८ मोठ्या तर लहान जनावरे मिळून ५० पर्यंत गायींचे गोकूळ आहे. दिवसाला १०० ते १२५ लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. तीन किलोमीटर परिसरात सुमारे ११० ग्राहकांना देशी दुधाची होम डिलिव्हरी देण्यात येते. त्यासाठी ७० रुपये प्रति लिटर दर ठेवला आहे. धोंड पारगाव या मूळ गावातही वडिलांनी सुरू केलेला १२ संकरित (एचएफ) गायींचा दुग्ध व्यवसायही सुरू आहे. याद्वारे पंचवीस लोकांना काम उपलब्ध झाले आहे. सेंद्रिय चाऱ्यास प्राधान्य भाडेतत्त्वावरील शेतीत साधारण पंधरा एकरांवर चारा उत्पादन घेतले जाते. देशी दुधाला दर्जा राहावा यासाठी सेंद्रिय चारा उत्पादनाला अधिक प्राधान्य दिले जाते. शेणखत व गोमूत्राव्यतिरिक्त अन्य कोणतेही खत वापरले जात नाही. ऑरगॅनिक हॉटेल सेंद्रिय शेती व त्याची बाजारपेठ यांना चालना देण्यासाठी नगर- औरंगाबाद रस्त्यावर पाच एकर जागा भाडेतत्त्वावर घेत अलीकडेच ‘मधुबन ऑरगॅनिक हॉटेल' सुरुरू केले आहे. देशी दूध, तूप येथे उपलब्ध केले आहे. सध्या येथे उपलब्ध असलेले जेवण संपूर्णपणे सेंद्रिय नाही, तरीही ६० टक्क्यांपर्यंत सेंद्रिय शेतमालाचा वापर केला जातो. येत्या काळात हा माल अधिकाधिक उपलब्ध होईल, असे संतोष सांगतात. ग्राहकांचा या संकल्पनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल परिसरात ग्राहकांना बसण्यासाठी कमी खर्चात बांबूची घरे तयार केली आहेत. भविष्यात येथे निसर्ग पर्यटन केंद्रही उभारायचे आहे. यंदा दोन एकरांवर केवळ शेणखत व गोमूत्राच्या वापरातून सेंद्रिय पद्धतीने गव्हाचे पीक घेतले आहे. येथे साधारण चाळीस लोकांना रोजगार मिळाला आहे. माती- पाणी तपासणी केंद्र संतोष यांनी नगर औद्योगिक वसाहतीत शासकीय परवान्यासह माती, पाणी, पान-देठ तपासणी केंद्र सुरू केले आहे. माफक व सरकारी दरात ही सेवा शेतकऱ्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येथे सहा जण कार्यरत आहेत. जामखेडला शेतकरी मार्केट संतोष केवळ प्रयोगशील शेतकरीच नाहीत तर सामाजिक कार्यकर्तेही आहेत. प्रहार संघटनेत शेतकरी संघटनेचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत. प्रहारच्या वारकरी संघाचे राज्याध्यक्ष अजय महाराज बारस्कर हे त्यांना मार्गदर्शन करतात. साधारण दहा वर्षांपूर्वी जामखेड भागात खते, बियाणेची कायम टंचाई असायची. त्यामुळे संतोष यांनी २००९ मध्ये जामखेड येथे खते, बियाण्यासह शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूंची विक्री करण्यासाठी शेतकरी मार्केट सुरू केले. आजही ते नियमीत सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य ठिकाणापेक्षा निश्‍चित फायदा होत आहे. शेतकरी गटाची स्थापना संतोष यांनी धोंड पारगावात वर्षभरापूर्वी शेतकरी गट स्थापन केले आहेत. त्यातील साधारण शंभर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एका देशी गीर गायीचे संगोपन आणि एक एकरावर सेंद्रिय शेती असे नियोजन केले जाणार आहे. नगर येथील गीर गायींच्या गोठ्यानजीक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सेंद्रिय शेती उत्पादनाबाबत मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे. नगर- औरंगाबाद रस्त्यावर सेंद्रिय शेतमाल, भाजीपाला खरेदी आणि विक्री केंद्र सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गीर गायींच्या संख्येतही अजून टप्प्याटप्प्याने वाढ करून गोमूत्र, शेणापासून विविध उत्पादने सुरू करण्याचेही नियोजन आहे.   प्रतिक्रिया माझ्या वडिलांचा अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसाय होता. ग्राहकांना निर्भेळ दूध देण्याच्या हेतूने मी गीर गायींचे संगोपन सुरू केले आहे. ऑरगॅनिक हॉटेलच्या माध्यमातून या व्यवसायाला चालना मिळणार आहे.

संपर्क- संतोष पवार- ७७२२०२५१३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT