डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन यंत्रणा 
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन यंत्रणा  
यशोगाथा

डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन यंत्रणा 

विकास जाधव

सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी सुमारे २२ एकरांत ‘नेटबीट’ या कृत्रीम बुद्धिमतेचा वापर केलेली सिंचन प्रणाली सुमारे चार महिन्यांपूर्वीच आपल्या २२ एकरांत बसवली आहे. उसासह आले, हळदीची शेती या यंत्रणेच्या कक्षेत त्यांनी आणली आहे. या यंत्रणेमुळे पाणी, वेळ, श्रम, पैसे या घटकांमध्ये बचत करणे त्यांना भविष्यात शक्य होणार आहे.  अलीकडील काळात शेतीत मजूरबळ, पाणी या मुख्य समस्या तयार झाल्या आहेत. अनेक वेळा पाण्याचा अतिरिक्त वापरही केला जात आहे. परिणामी जमिनीची प्रत कमी होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्‍यातील कवठे येथील राहुल आणि अतुल या डेरे या बंधूंनी पाणी व्यवस्थापनावर अधिक भर देत शेती सुकर केली आहे.  स्वयंचलित व सबसरफेस ठिबक यंत्रणा  अतुल यांनी २००८ पासून वडिलांसोबत शेती सुरू केली. राहुल हे जिल्हा बँकेत नोकरी सांभाळत तर अतुल पूर्ण वेळ शेती करतात. कुटुंबाची २५ एकर शेती असली तरी वहिवाटीत अवघी ८ ते १० एकर जमीन आहे. या जमिनीचा त्यांनी पूर्णपणे विकास साधला आहे. पंधरा एकर ऊस, तीन एकर हळद व एक एकर आले असे नियोजन आहे. को ८६०३२ वाणाची जोड ओळ पद्धतीने लागवड आहे. आठ फुटांचा पट्टा असून ड्रीप ॲटोमेश न व सबसरफेस पद्धतीची यंत्रणा आहे. त्याद्वारे पाणी नियोजन व एकूण व्यवस्थापनातून सुरू उसाच्या उत्पादनात एकरी १५ ते २० टनांनी वाढ झाली आहे. एकरी ७० ते७५ टन उत्पादन मिळते.  नव्या तंत्रज्ञानाचा वापर  डेरे बंधूंना २०१८ मध्ये इस्त्राइल येथे ॲग्रिटके प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळाली. तेथे नेटबीट ही कृत्रीम बुद्धीचा वापर करणारी अत्याधुनिक सिंचन प्रणाली पाहण्यात आली. त्याची सखोल माहिती घेऊन ती शेतात बसविण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली कार्यरत केली. ही यंत्रणा फायदेशीर ठरत असल्याचे अतुल सांगतात. या यंत्रणेतील  ‘रिअल टाइम डेट’ आणि क्लाऊ स्रोतांमधून माहिती विश्लेषित करता येते. त्यादृष्टीने सिंचन सक्रिय करणारी ही देखरेख प्रणाली आहे.  या यंत्रणेचे भविष्यात मिळणारे फायदे 

  • शेतात सेन्सर बसवल्यानंतर माती, पिके व पाण्याच्या परिस्थितीबद्दल ‘डेटा’ उलब्ध होऊन तो संकलित केला जातो. 
  • तापमान, पाऊस या संदर्भातील सर्व माहितीही उपलब्ध होते. 
  • मनुष्यबळ कमी होण्याबरोबरच खते व पाणी व्यवस्थापन करता येते 
  • सर्व यंत्रणा मोबाईलद्वारे वापरता येत असल्याने आपण कोठेही असलो तरी वापर शक्य होतो. 
  • या यंत्रणेद्वारे हवामानाचे अंदाज आधीच मिळत असल्याने पिकांना पाणी केव्हा द्यावे याचा निर्णय घेता येतो. आर्द्रता, तापमान यांचीही माहिती अशीच मिळते. किडी व रोगाचे अंदाज आल्याने वेळेत फवारणी करता येते. यातून किडी- रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. 
  • जमिनीला पाणी आवश्यक आहे का नाही याचेही मेसेज मिळतात. त्यामुळे जमिनीचा पोत खराब न होण्याबरोबरच पाण्याची बचत होते. 
  • पाण्याचा अनावश्यक वापर कमी झाल्याने ऊस, आले, हळदीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. 
  • नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यावर भर  सध्या डेरे बंधू प्रचलित सूक्ष्म सिंचनाद्वारे आले पिकाचे एकरी ३० गाड्या (५०० किलो प्रतिगाडी) तर हळदीचे एकरी ३० ते ३५ क्विंटल (सुकवलेले) उत्पादन घेतात. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यावर त्यांचा भर असतो. नेटबीट यंत्रणेसाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च केला आहे. इस्त्रायल येथील प्रदर्शनात ११० देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. आई हिरबाई व वडील मधुकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते.    संपर्क- राहुल डेरे- ९९७०५४१९४७  अतुल डेरे- ९९७५८०१९४६   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT