प्रशांत शेेडे आपल्या देशी गायीसह  
यशोगाथा

क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श 

जमिनीच्या क्षारतेवर मात करण्याचा प्रयत्न शेंडे यांची संपूर्ण जमीन चोपण असून पाणी क्षारयुक्त आहे. त्यासाठी कंडीनशर वॉटर फिल्टरचा प्रयोग केला आहे. केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली शुगरबीट पिकाचा प्रयोग राबविला. हे पीक जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करते. बीटचा जनावरांसाठी चारा म्हणूनही वापर झाला. यंदाही एक एकरात हे पीक घेण्याचा मानस आहे. जमीन व पाणी परिक्षणातून पीकपध्दतीचा वापर केला आहे. तीस गुंठ्यांत सीताफळ (वाण-सासवड) व त्यात शेवग्याचे (पीकेएम-१) आंतरपीक घेतले आहे. अन्य ३० गुंठ्यांत पेरू बाग (वाण- जी विलास) असून त्यात कांदा, लसूण, हरभरा ही आंतरपिके घेतली आहेत.

डाॅ. मिलींद जोशी

बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत शेंडे यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या मार्गदर्शनातून ऊस पिकात हुमणी नियंत्रण, मधमाशीपालनाचे प्रयोग यशस्वी करून एकरी उत्पादनात वाढ केली आहे. या व्यतिरिक्त हिरवळीच्या खतांचा वापर, जमिनीची क्षारता कमी करणे अशा अनेक प्रयत्नांतून बहुविध पीक पध्दतीचा विकासही साधला आहे.    पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील मळद येथील प्रशांत वामनराव शेंडे म्हणजे सातत्याने नव्या प्रयोगात व्यस्त असलेले शेतकरी म्हणून प्रसिध्द आहेत. सुमारे १८ वर्षांपासून शेतीत कार्यरत आहेत.  शेतीला पशुपालन व रेशीम व्यवसायाची जोडही त्यांनी दिली आहे. त्यांचे बागायती क्षेत्र सुमारे १७.५ एकर आहे. मात्र, क्षारवट जमीन व पाणी ही मोठी समस्या आहे. ऊस, गहू, हरभरा, बेबी कॉर्न, फळबाग, चारा पिके घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. सिंचनासाठी विहीर व कॅनॉलची सुविधा आहे. सन २०१२ पासून ते ठिबक सिंचनाचा वापर करतात. कष्ट, जिद्द, चिकाटी, सतत शिकण्याची वृत्ती व प्रात्यक्षिके करून पाहण्याची आवड यातून त्यांनी आपल्यातील प्रयोगशीलता कायम जिवंत ठेवली आहे.  हुमणीचे नियंत्रण कार्यक्रम  बारामती कृषी विज्ञान केंद्रातर्फे (केव्हीके) शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून हुमणी कीड नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अलीकडील काळात हुमणीने उसात गंभीर समस्या तयार केली आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचे तंत्रज्ञान केव्हीकेतर्फे शेतकऱ्यांना देण्यात आले. नेहमीच नव्या गोष्टींच्या शोधात असलेल्या शेंडे यांनी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरवले.  तंत्रज्ञानाना वापर  सन २०१२ पासून त्यांच्याही उसात हुमणीचा प्रादुर्भाव होता. सलग दोन-तीन वर्षे प्रादुर्भाव एवढा वाढला की एकरी उत्पादन घटू लागले. केव्हीकेच्या आद्य रेखा प्रात्यक्षिकातून त्यांनी आडसाली उसात एकात्मिक नियंत्रण पध्दतीचा वापर सुरू केला. जूनमध्ये भुंगेरे गोळा करणे, प्रकाश सापळ्यांचा वापर, मेटारायझीयम या जैविक मित्र बुरशीचा वापर या बाबींचा समावेश होता. पुढील वर्षी हुमणीचे बऱ्यापैकी नियंत्रण झाल्याचे दिसून आले. आता हुमणीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य झाले आहे. शेंडे यांना दरवर्षी एकरी ४५ ते ५० टन ऊस उत्पादन मिळते. हुमणीमुळे त्यात होणारी ५ ते ८ टक्के घट आता कमी झाली आहे.  यंदा प्रादुर्भाव नाही  कृषी विभागामार्फतही परिसरात नियंत्रणाचे उपाय झाले. मात्र, शेंडे यांच्या शेतात लावलेल्या प्रकाश सापळ्यात हुमणीचे भुंगेरे आढळले नाहीत. हुमणीचे प्रमाण त्या भागात कमी झाल्याचेच ते संकेत असल्याचे स्पष्ट झाले. बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनीही याबाबत शेंडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.  केव्हीकेने राबविलेल्या ठळक बाबी 

  • शेतीशाळा, शिवारफेऱ्या 
  • हुमणी जागरूकता अभियान 
  • जून व जुलैमध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर व भुंगेरे गोळा करणे. 
  • उन्हाळ्यात खोल नांगरट 
  • शेणखतातून मेटारायझीयमचा वापर 
  • सन २०१६ मध्ये सौर ऊर्जेवरील स्वयंचलित कीनियंत्रण सापळ्यांचा वापर 
  • मधमाशीपालनाचा फायदा  शेंडे यांना सूर्यफुलाचे एकरी सहा ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. केव्हीकेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून २०१६ मध्ये मधुसंदेश प्रकल्पांतर्गत दोन एकरांत सहा मधपेट्या ठेवल्या. त्याद्वारे परागीभवन अत्यंत चांगले झाले. फुले भरलेली होती. मात्र त्या काळात पाऊस आल्याने मोठे नुकसान झाले. मात्र त्या वेळी उत्पादन एकरी दोन क्विंटलने वाढून १० क्विंटलपर्यंत पोचले असते असे शेंडे म्हणाले.  मधमाशीपालनासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे.  आत्मा, पुणे यांच्यामार्फत जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट शेतकरी म्हणून सन्मानित केले आहे.  शेती व्यवस्थापन- ठळक बाबी 

  • दरवर्षी धैंचा, ताग आदी हिरवळीची खते ३ ते ४ एकरांत 
  • दहा वर्षांपासून पाचट जाळणे नाही 
  • सोयाबीन (एमएसीएस) व तूर (बीडीएन ७११) यांची ४:२ प्रमाणात लागवड 
  • जमिनीचा सामू अधिक. तरीही चांगले उत्पादन घेतात 
  •  भेंडीचे निर्यातक्षम उत्पादन- अर्ध्या एकरात सहा टनांपर्यंत 
  • जमीन व पाण्याचा सामू तपासणी नियमित 
  • जमिनीतील कर्ब वाढावा यासाठी जीवामृतचा वापर 
  • गांडूळखतनिर्मितीचा बेड. व्हर्मीवॉश साठवून त्याचा वापर 
  • एकता शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पासाठी परावृत्त. सध्या सहाजणांकडे प्रकल्प कार्यान्वित 
  • शेणखताच्या वापरासाठी एका देशी गायीचे संगोपन 
  • कृषी विभागाकडून शेतीमित्र म्हणून शेंडे यांची नियुक्ती. त्याद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी विभागाच्या योजना ते गावागावात जाऊन पटवून देतात 
  • सुमारे ६० गुंठ्यांत व्ही- वन जातीच्या तुतीची लागवड. रामनगर (कर्नाटक) येथील रेशीम कोष मार्केट तसेच त्या परिसरातील उत्कृष्ठ रेशीम उत्पादकांशी चर्चा करून मागील वर्षी व्यवसाय सुरू केला 
  • पहिल्या वर्षी प्रती १०० किलो अंडीपुंजाच्या बॅचमधून ५५ किलो कोषा उत्पादन घेतले. सुमारे ३२५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. जनावरांसाठी खाद्य म्हणूनही तुती पाल्याचा उपयोग झाला.   
  • (लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)
  • संपर्क- प्रशांत शेंडे- ९७६७१३७९२०, ९४०४६८४७२०   

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Rain Forecast: पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज

    Organic Farming Subsidy: सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून मिळणार ६ लाखांपर्यंत अनुदान! जाणून घ्या योजनेची माहिती

    Crop Insurance Protest : पीकविम्याच्या मुद्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन

    Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एक महत्वाचा पुरावा; देवी लसीकरण नोंदीचा वापर करण्याची शिंदे समितीची शिफारस

    Panand Road : सहमतीमुळे देवबावाडी पाणंद रस्ता झाला खुला

    SCROLL FOR NEXT