Nashik News : तालुक्यातील निवाणे, देवबावाडी येथील पानंद रस्ता प्रशासन व शेतकऱ्यांच्या सहकार्याने रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. येथील रस्ताकामात काही शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केल्याने अडचणी निर्माण झाली होती. .याप्रकरणी तहसीलदार रोहिदास वारुळे व ग्रामस्थांच्या आपसी समझोत्याने केल्याने शेतकऱ्यांच्या मदतीने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे..मौजे निवाणे येथे देवबावाडी येथील कळवण ते निवाणे डांबरी रस्त्यापासून ते पाटचारी पर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामात काही शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केला होता..Farm Road Drive : सेवा पंधरवाड्यात ‘पाणंद’साठी विशेष मोहीम . त्यानुसार राजेंद्र आहेर यांनी पुढाकार घेत तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे १८ ऑगस्टला मौजे निवाने येथील देववाडी पाण्याचा जुना नाला मोकळा करून पानंद रस्ता करून मिळावा असा विनंती अर्ज केला होता..Farm Road: गावशिवार रस्त्यांचे होणार सीमांकन.त्यानुसार तहसीलदार वारुळे यांच्या सूचनेनुसार शुक्रवार (ता.१२) मंडळ अधिकारी नवीबेज मनीषा शिंदे व ग्राममहसूल अधिकारी अविनाश पवार, उमेश गोपनारायण, राजेंद्र गरुड, आंबादास दळवी, महसूल सेवक शरद आहिरे, कारभारी राऊत यांनी समक्ष रस्त्याची दूरवस्था बघून ज्या शेतकऱ्यांनी रस्ता काँक्रेट होण्यासाठी अडथळा निर्माण केला होता. त्या शेतकऱ्यांमध्ये समजोता करुन अडथळा दूर केल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे..निवाणेचे उपसरपंच दिनकर आहेर, निवाणे सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन व ग्रामस्थ, विकास सोसायटीचे अध्यक्ष, संचालक आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. निवाणे येथील जुना पाण्याचा नाला पाणंद रस्त्यासाठी मोकळा झाला. नाला शासनाच्या पाणंद रस्ता योजनेत झाल्यास सर्व शेतकरी वर्गासाठी एक वरदान राहील.- राजेंद्र आहेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.