आले पिकासमवेत विक्रम साळुंखे
आले पिकासमवेत विक्रम साळुंखे 
यशोगाथा

सेंद्रिय खतांचा वापर वाढवला

विकास जाधव

शेतकरी ः विक्रम काशिनाथ साळुंखे गाव ः नागठाणे,    जि. सातारा पीक ः अाले

सातारा जिल्ह्यातील नागठाणे हे आले पिकासाठी प्रसिद्ध असलेले गाव. येथील विक्रम काशिनाथ साळुंखे हा तरुण शेतकरी. वडिलोपार्जित शेतात आले पीक घेतले जायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्रमने शेती सुरू केली. पारंपरिक आणि आधुनिक शेतीचा मेळ घालण्यास सुरवात केली. कच्चे शेणखत, पाटपाणी, रासायनिक खतांचा जास्त वापर आदीच्या व्यवस्थापनामुळे हुमणी, कंदकुज होऊन आले पिकाचे नुकसान होत होते. हे टाळण्यासाठी तंत्रात बदल व सेंद्रिय खतांचा वापर वाढविला. यामुळे भांडवली खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्याबरोबच जमिनीची सुपीकता वाढवली आहे. असे आहे शेतीचे नियोजन

  • आले लागवडीसाठी निचरा होणाऱ्या हलकी ते मध्यम प्रकारातील जमिनीची निवड केली जाते.
  • लागवड करण्यापूर्वी त्या क्षेत्रात तीन महिने अाधी हिरवळीची खते उदा. ताग, धैंचा घेऊन ते गाडले जातात.
  • यानंतर उभी- आडवी नांगरट करून क्षेत्र तापण्यासाठी ठेवले जाते.
  • एक एकर क्षेत्रासाठी पाच ट्रेलर शेणखत व पाच ट्रेलर कंपोस्ट खत वापरण्यात येते. खते जमिनीत एकरूप होण्यासाठी पुन्हा नांगरट केली जाते.
  • मे किंवा जून महिन्यात (तापमान पाहून) आले पिकाची लागवड केली जाते.
  • ‘बेड’ तयार केल्यानंतर त्यावर निंबोळी पेंड, हुमणी प्रतिरोधक कीटकनाशक यांचा वापर होतो.
  • बियाण्यास जैविक आणि रासायनिक प्रक्रिया केली जाते.
  • त्यानंतर या बेडवर दोन किंवा तीन कुडी लागवड केली जाते.
  • एकरी दोन कुडीने एक टन बियाण्याचा वापर केला जातो.
  • लागवडीनंतर आळवणी दिले जाते.
  • ढगाळ वातावरण, तसेच पावसाळ्यात शेतात पाणी साचले जाऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते.
  • पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.
  • प्रत्येक आठवड्याला जीवामृताच्या स्लरी, तसेच फवारण्या केल्या जातात.
  • रासायनिक खतांचा कमी वापर केला जातो.
  • एकूण व्यवस्थापनातून आले पिकाचे एकरी २० टन, तर खोडवा ठेवल्यास २५ टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी प्रतिटन ४० हजार रुपये दर मिळाला.
  • संपर्क : विक्रम साळुंखे - ९१५८०१९१११  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT