भोसा, जि. बुलडाणा येथील केशवराव खुरद यांनी जोपासलेली संत्रा बाग
भोसा, जि. बुलडाणा येथील केशवराव खुरद यांनी जोपासलेली संत्रा बाग  
यशोगाथा

जमिनीचा पोत टिकवण्याकडे कल

Chandrakant Jadhav

शेतकरी ः केशवराव शालिग्राम खुरद गाव ः भोसा,   ता. मेहकर, जि. बुलडाणा पीक ः संत्रा

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील भोसा शिवारात केशवराव शालिग्राम खुरद काळाची गरज अोळखून शेतीचे व्यवस्थापन सांभाळत अाहेत. जमिनीचा पोत टिकवून उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल असतो. जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ते करतात. खरीप, रब्बीत घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक पिकांचे व्यवस्थापनही फळबागांप्रमाणे काटेकोर करण्यावर त्यांचा भर असतो. भोसा गाव शिवारात त्यांची ५० एकर शेती आहे. प्रामुख्याने फळशेतीवर त्यांचा जोर अाहे. सात एकरांत १५ वर्षांपूर्वी लागवड झालेला संत्रा असून, त्यातून दर वर्षी बहार व्यवस्थापन केले जाते. दहा एकरांत नवी लागवड केली अाहे. संत्र्यांची सुमारे ७००, तर डाळिंबांची १४०० झाडे आहेत. मूग पाच ते सहा एकर, उडीद १० एकर असतो. तर, उर्वरित सोयाबीन क्षेत्र असते. संत्रा बागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन (ठळक बाबी)

  • भोसा शिवारातील जमीन लालसर व काहीशी मुरमाड स्वरूपाची अाहे. संत्रा बागेसाठी ही जमीन चांगली समजली जाते. बागेचे खत व्यवस्थापन करण्यापूर्वी खुरद माती परीक्षण महत्त्वाचे समजतात. या जमिनीत गंधक व फॉस्फरस कमी अाढळून येतो. तो भरून काढण्यासाठी सुपर फॉस्फेटचा वापर ते करतात.
  • प्रतिझाडाला शेणखतासोबत किमान पाचशे ग्रॅम सुपर फॉस्फेट दिले जाते.
  • संत्रा बागेला मृग नक्षत्रापूर्वी १० किलो शेणखत, तसेच त्यात चारशे ग्रॅम सुपरफॉस्फेट मिसळून बेसल डोस वर्षातून एकदा दिला जातो.
  • मृगात पाऊस आल्यावर १० ते १५ जूनपर्यंत (वातावरणाचा अंदाज घेत) डीएपी किंवा १०:२६:२६ याचा डोस देतो. यासोबत मिक्स मायक्रोन्यूट्रंट एकरी २० किलो दिले जाते. एका झाडाला सुमारे १०० ग्रॅम एवढी ही मात्रा असते.
  • झाडाची फूट झाल्यानंतर कॅल्शियम अाणि बोरॉनची फवारणी केली जाते. सोबत ०:५२:३४ खताचा वापर केला जातो.
  • फळे १०० ग्रॅम वजनाची होतात तेव्हा १०:२६:२६ हे खत २०० ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणे दिले जाते. सोबत सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापरही आवश्यकतेनुसार केला जातो.
  • फळांची योग्य वाढ व रंग येण्याच्या दृष्टीने ०:०:५० या खताचा वापर होतो. फवारणीद्वारे पाच ग्रॅम, तर ठिबकद्वारे एकरी चार किलो अाठवड्यातून एकदा त्याचा वापर होतो.
  • फेब्रुवारी महिन्यात फळाला चांगला रंग मिळतो.
  • फेब्रुवारी ते पाच मार्च या काळात काढणी होते. परिसरातील व्यापारी थेट येऊन खरेदी करतात.
  • वर्षातून एकदाच व तोही मृग बहार घेतला जातो.
  • मागील वर्षी तीन एकरांतील एका बागेने समाधानकारक उत्पादन दिले नाही. साधारण चार लाख ५१ हजार रुपयांना ती व्यापाऱ्यांना देण्यात आली.
  • संपर्क : केशवराव खुरद, ९७६४९१९२४६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT