यंत्राच्या सहाय्याने झाड हालवून बदाम खाली पाडले जातात. 
यशोगाथा

फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्निया

अनिल पाटील

कोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील खाडी भागांना ‘बे एरिया’ म्हणतात. सिलिकॉन व्हॅलीच्या डोंगर रांगा तसेच नदी खोऱ्याच्या सपाट प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेती आणि फळबागांची लागवड आहे. तसेच, जनावरांना चरण्यासाठी प्रचंड मोठी कुरणे आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा वापर येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केला आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विभागातील डोंगराळ भाग, पठारी प्रदेश तसेच नद्यांच्या खोऱ्यांमध्ये शेती आणि फळबागांचा मोठा विकास झाला आहे. कॅलिफोर्निया हे राज्य हे पॅसिफिक महासागराला लागून आहे. कोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील भागातील खाडी परिसराला ‘बे एरिया’ म्हणतात. सिलिकॉन व्हॅलीच्या डोंगर रांगा तसेच नदी खोऱ्याच्या सपाट प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेती आणि फळबागांची लागवड आहे. तसेच, जनावरांना चरण्यासाठी प्रचंड मोठी कुरणे आणि काही भागांत चारा पिकांची लागवड आहे. 

फळबागेला भेट   आम्ही कॅलिफोर्निया राज्याच्या वेस्टले भागातील प्रयोगशील शेतकरी गुरुप्रताप सिंग बासराई यांची शेती आणि फळबाग पहाण्यासाठी गेलो होते. फार वर्षांपासून त्यांचे कुटुंब व्यवसाय आणि शेतीमध्ये कार्यरत आहे. त्यांची सुमारे ४२२ एकर शेती आहे. हा आकडा आपल्या दृष्टीने मोठा असला तरी मूळच्या अमेरिकी शेतकऱ्यांच्या मानाने हे शेती क्षेत्र फार लहान आहे. अमेरिकी शेतकऱ्यांचे लागवड क्षेत्र हे सरासरी चार हजार एकरापर्यंत असते. मोठे लागवड क्षेत्र आणि मजूरटंचाईमुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे. गुरुप्रताप सिंग बासराई यांच्या शेतीमध्ये प्रामुख्याने बदाम, अक्रोड, पीच, द्राक्ष, कलिंगड, चेरी लागवड पहायला मिळाली. त्यांच्याकडे सध्या १०० एकर बदाम, चेरी ५० एकर, द्राक्ष ३० एकर, टोमॅटो २५ एकर आणि कलिंगडाची २५ एकर आणि उर्वरित क्षेत्रावर इतर पिकांची लागवड आहे. फळबाग पहाण्यासाठी गुरुप्रताप सिंग बासराई यांनी गाडीची सोय केली होती. आम्ही शेतावर गेलो तेव्हा यंत्राच्या सहाय्याने पूर्ण झाड हलवून बदाम पाडण्याचे काम चालू होते. एका शेतावर चेरी झाडांची छाटणी सुरू होती. या बागेत प्रामुख्याने मेक्सिको देशातील मजूर होते. मजुरांच्याकडे फळबागेत काम करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे होती. फळबागेचे मोठे क्षेत्र असल्याने मजुरांच्यासाठी स्वच्छतागृह व विश्रांतीगृहाची ट्रॉली कामाच्या ठिकाणी होती. एका वाहनाला लांबलचक ट्रॉली होती. त्यावर किमान १५ ते २० जण जेवणाला बसू शकतील अशी सोय होती. या ट्रॉलीमधून मजूर एका बागेतून दुसऱ्या बागेत जात होते. प्राथमिक सुविधा आणि स्वच्छतागृहाला अमेरिकी लोकांच्या जीवनात खूप उच्च दर्जाचे स्थान आहे हे येथील फळबागांमध्ये मजुरांना केलेल्या सुविधा पाहून लक्षात आले. 

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर  गुरुप्रताप सिंग यांची शेती पहाताना नीटनेटकेपणा तसेच प्रत्येक शेतीकामासाठी स्वतंत्र यांत्रिक योजना दिसून आली. साधारणपणे ४२२ एकर क्षेत्राला पाणी देण्यासाठी शेतात कालवे होतेच, त्याबरोबरीने कूपनलिकांची सोय करण्यात आली होती. स्वयंचलित यंत्रणेतून पाणी गाळून पिकाला दिले जाते. दर पंधरा मिनिटाला या यंत्रणेतील फ्लिटरची स्वच्छता होते. चर्चेदरम्यान मी त्यांना विचारले, की तुमच्याकडे अचानक कधीही वीजपुरवठा खंडित होतो का? त्यावर ते म्हणाले, कधीही नाही. येथे नियोजनपूर्वकच काम केले जाते. येथील शेतकऱ्यांच्या शेतावरील कामाचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापक असतो. विविध क्षेत्रातील कामे वेळेवर पूर्ण होण्यासाठी शेतावरच व्यवस्थापक तसेच मजुरांना शेतावर रहाण्यासाठी घरे बांधलेली आहेत. गुरुप्रताप सिंग यांनी शेतातील प्रत्येक पिकाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रक्षेत्रावर बदाम लागवड केलेली नवीन एक वर्ष आणि दोन वर्षे वयाची बाग पहायला मिळाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बदाम रोपांची लागवड करण्यात आली होती. बदाम काढणी योग्य झाल्यावर व्हायब्रेटर यंत्राने संपूर्ण झाड हालविले जाते. ही झाडे पंधरा वर्षांची होती. साधारण चाळीस वर्षांपर्यंत या झाडांपासून बदामाचे उत्पादन मिळते, असे सिंग यांनी सांगितले. आम्ही त्यांच्या चेरी, सफरचंद आणि कलिंगड लागवड क्षेत्राला देखील भेट दिली. प्रत्येक पिकाचे लागवडीपासून बाजारपेठेपर्यंतचे नियोजन ठरवलेले होते.

तंत्रज्ञानाने प्रशिक्षित मजूर  गुरूप्रताप सिंग यांच्या चेरी बागेत गेलो असताना तेथे छाटणीचे काम सुरू होते. अमेरिकेत मजुरांची टंचाई असल्याने सिंग यांच्या बागेत चेरी छाटणीसाठी सुमारे दोनशे मजूर मेक्सिको देशातून आले होते. दररोज छाटणीच्या कामाला सुरवात करण्याअगोदर मजुरांना दैनंदिन कामाचे स्वरूप, पद्धत तसेच साधन सामुग्री कशी वापरायची याची माहिती व्यवस्थापक देतो. येथील फळबागेत लहान तसेच मोठ्या कामासाठी अत्याधुनिक यंत्रे तसेच अवजारांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यंत्रे, अवजारे सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या गोदामाची सोय येथील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिसते. या ठिकाणी काळजीपूर्वक यंत्रे आणि अवजारे ठेवलेली दिसत होती. रासायनिक खते तसेच कीडनाशकांसाठी देखील स्वतंत्र गोदामाची सोय होती. शेतकऱ्याच्या परवानगीने खते आणि कीडनाशके वापरली जातात.      येथील शेतकऱ्यांच्याबरोबरीने पीकविम्याबाबत चर्चा केली असता ते म्हणाले, की २ ते ५ टक्क्यांपर्यंत विमा हफ्ता भरावा लागतो. नुकसान झाले तर ७५ टक्के भरपाई सरकारकडून मिळते. अमेरिकेतील शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याकडील शेतीबरोबरीने तुलना होऊ शकत नाही. परंतु, भविष्यात कोणते बदल करावे लागणार आहेत हे मात्र लक्षात आले.

शेतकरी बाजार   मी अमेरिकेतील दौऱ्यामध्ये नाइल्स येथील शेतकरी बाजाराला भेट दिली. परिसरातील शेतकरी स्वतः विविध प्रकारचा शेतमाल येथे विक्रीसाठी घेऊन आले होते. अमेरिकेत सेंद्रिय शेतीमध्ये देखील शेतकरी प्रयोग करत आहेत. ग्राहकांच्याकडून सेंद्रिय उत्पादनांना मागणी वाढत आहे. 

- अनिल पाटील, ९९७०९७८७०० (लेखक सांगे, ता. वाडा, जि. पालघर येथील कृषिभूषण पुरस्कार विजेते शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT