seed production in shednet
seed production in shednet 
यशोगाथा

विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला बीजोत्पादनाला पसंती

Gopal Hage

विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने बाजारपेठेचा अंदाज घेत शेतकरी भाजीपाला बीजोत्पादन,कडधान्ये त्याचबरोबरीने केळी, सीताफळ, लिंबू या पिकांच्या लागवडीकडे वळू लागले आहेत .

देशभरात विदर्भ आणि कापूस अशी ओळख आहे. मात्र, मजुरांची टंचाई, नवीन तंत्रज्ञानाचा अभाव, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, सातत्याने दरामध्ये होणारे चढउतार यामुळे कापूस लागवड क्षेत्रावर परिणाम होत आहे. कापसाच्या  बीटीसारख्या जाती लागवडीखाली आल्या, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. आता बीटी कापसाचे ओलिताच्या क्षेत्रातील सरासरी उत्पादन ८ ते १२ क्विंटल दरम्यान येते. हेच पूर्वी सरासरी १५ क्विंटलपर्यंत मिळत होते. दुसरीकडे कापसाचा उत्पादन खर्च वाढतच चालला. तुलनेने कापसाचा दर तितकासा वाढलेला नाही. सोयाबीनसारखे कमी खर्च आणि कमी मेहनतीचे पीक शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय म्हणून मिळाले आहे. कापसाच्या तुलनेत सोयाबीनमध्ये यांत्रिकीकरणाची साधने पुरेशी उपलब्ध आहेत. पेरणीपासून ते मळणीपर्यंत यांत्रिकीकरण वाढले आहे. यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी आहे.

कडधान्याची आंतरपिके  मागील काही वर्षांत डाळवर्गीय पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. प्रामुख्याने विचार केला तर तूर, मूग, उडीद या पिकांचे जे क्षेत्र मध्यंतरी खूपच कमी झाले होते. आता आंतरपीक म्हणून का असेना, शेतकरी पुन्हा या पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून तुरीचे दर बऱ्यापैकी मिळत असल्याने प्रत्येक शेतकरी या पिकाच्या लागवडीकडे वळत आहे. वन्य प्राण्यांचा त्रास, कमी दर यामुळे काही वर्षे नामशेष झाल्‍यासारखे वाटणारे ज्वारीचे पिकही पुन्हा दिसू लागले आहे. प्रामुख्याने शेतकरी रब्बी ज्वारीच्या लागवडीकडे वळले आहेत. 

सीताफळ, लिंबू, केळीला पसंती  संत्रा पिकासाठी ओळख असलेल्या विदर्भात गेल्या सहा, सात वर्षांपूर्वी डाळिंब लागवडीला चालना मिळाली. प्रामुख्याने बुलडाणा, वाशीम जिल्ह्यामध्ये डाळिंब शेती बाळसे धरू लागली. मात्र, या दरातील अनिश्‍चितता पाहता बहुतांश शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड मर्यादित केली. अलिकडे संत्रा, लिंबू लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. अकोला, वाशीम जिल्ह्यात संत्रा लागवड वाढत आहे. अकोला जिल्ह्यात केळी लागवडीला गती मिळाली आहे. गेली दोन-तीन वर्षे दुष्काळी झळा झेलूनही शेतकरी केळी पीक चांगल्या प्रकारे जोपासत आहेत.  विदर्भात चांगल्या प्रकारे सीताफळ रुजले आहे. कमी खर्चात, कमी पाण्यात येणारे पीक म्हणून सीताफळाकडे बघितले जाते. प्रयोगशील शेतकरी सीताफळ प्रक्रिया उद्योगाकडे वळले आहेत. याचबरोबरीने बाजारपेठेचा कल लक्षात घेऊन कलिंगड, खरबूज लागवड शेतकरी करू लागले आहेत. 

बुलडाणा, वाशीममध्ये बीजोत्पादन क्लस्टर बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुके बीजोत्पादनात देशात ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. कमी क्षेत्रातील ही संरक्षित शेती चांगला पैसा देत असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर या तालुक्यांमध्ये अनेक शेतकरी शेडनेटमध्ये बीजोत्पादन घेत आहेत. देऊळगावराजा तालुक्यातील छोटी-छोटी गावे बीजोत्पादनातून चांगला पैसा मिळवू लागली आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बियाणे कंपन्यांचे बीजोत्पादन या भागात घेतले जाते.

असा आहे कल

  • वाशीम, बुलडाणा हळद लागवडीचे वाढते क्षेत्र
  • डाळवर्गीय पिके, ज्वारी लागवडीकडे पुन्हा एकदा वाढता कल
  • गव्हाचे क्षेत्र घटले, हरभऱ्यावर जोर कायम
  •  बाजारपेठेनुसार हंगामी पिके, भाजीपाला लागवडीवर भर
  • बुलडाणा, वाशीममध्ये बीजोत्पादनाला चालना
  • संत्रा, लिंबू, केळी, पेरू, सीताफळाला पसंती.
  • पूर्व विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT