मिरचीचे पीक नियमितपणे घेतले जाते. तोडणी केलेली दर्जेदार ढोबळी मिरची.
मिरचीचे पीक नियमितपणे घेतले जाते. तोडणी केलेली दर्जेदार ढोबळी मिरची. 
यशोगाथा

दुष्काळातही अभ्यासपूर्ण भाजीपालाकेंद्रित शेती

Suryakant Netke

बीड जिल्ह्यातील गोमळवाडा येथील भागवत वामन गर्जे या तरुणाने नोकरी सांभाळत अभ्यासपूर्वक शेती करीत भाजीपालाकेंद्रित शेती यशस्वी केली आहे. या भागात सातत्याने पाणीटंचाई असते. मात्र शेततळ्याचा आधार तसेच चांगल्या व्यवस्थापनाच्या आधारे ढोबळी मिरची, काकडी, खरबूज, कांदा, कापूस आदी पिकांची विविधता त्यांनी ठेवली. सुधारित तंत्राचा वापर हे देखील त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणता येते.

नगर जिल्ह्याच्या पूर्वेला आणि सीमेवर असलेल्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार हा दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. सिंदफणा नदी आणि धरण परिसरातील गावांचा अपवाद वगळला तर तालुक्‍यात कायम पाणीटंचाई असते. त्यातही सिंदफणा धरण मागील दहा वर्षांत गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच भरले. धरणाच्या जवळच गोमळवाडा गावशिवार आहे. येथील शेतकरी कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस ही पारंपरिक पिके घेतात.

गर्जेंची जिद्दीची शेती गोमळवाडा गावात भागवत व संतोष हे दोघे गर्जे बंधू. संतोष सोलापूर येथे ‘थर्मल पॉवर’ उद्योगात अभियंता आहेत. भागवत पदवीधर असून गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लिपिक आहेत. शिवारात तीन ठिकाणी त्यांची २१ एकर शेती आहे. शेतीचा भार भागवत स्वतः सांभाळतात.

पीकपद्धती

  • भागवत यांची शेती बहुतांश भाजीपाला पीककेंद्रित आहे. ढोबळी मिरची, खरबूज, काकडी, कांदा यांच्याबरोबर ऊस, कापूस, तूर आदी पिके ते घेतात.
  • मुख्यतः बिगर हंगामात पिके घेण्याची पद्धत. त्यामुळे दर चांगले मिळण्याची शक्यता.
  • उदा. ढोबळी मिरची जून-जुलैमध्ये घेण्याएेवजी मार्चमध्ये लागवड.
  • काकडी- हिवाळ्यात घेणे. थंडीत वाढ चांगली व्हावी असे व्यवस्थापन ठेवणे
  • खरबूज- आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड
  • दहा गुंठ्याचे शेडनेट

  • नोव्हेंबर २०१४ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने दहा गुंठ्यात शेडनेट उभारले. त्यात सुरुवातीला काकडी घेत बारा टन उत्पादन घेतले. त्यास सरासरी २२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. या प्रयोगातून आत्मविश्वास वाढल्यानंतर २०१५ मध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली.
  • त्यानंतर आजपर्यंत ढोबळीची तीन पिके घेतली.
  • सरासरी उत्पादन- १० ते १३ टनांपर्यंत, सरासरी दर किलोला १५, २० ते २५ रु.
  • सहा महिन्यांच्या काळात दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न हे पीक देते. त्यात खर्च ८० हजार रुपयांपर्यंत असतो.
  • काकडीचेही १२ टनांपर्यंत उत्पादन
  • एका वर्षात तीन पिके मागील वर्षी खुल्या ४५ गुंठे क्षेत्रावर सलग तीन पिके घेतली. यात जानेवारीत खरबूज लावले. त्याचे तीन महिन्याच्या काळात २६ टन उत्पादन मिळाले. त्यास २४ रुपये प्रति किलो दर मिळाला. मेमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली. त्याचे ३० टन उत्पादन व २५ ते ३० रूपये दर मिळाला. त्यानंतर आॅक्‍टोबर मध्ये खरबूज घेतले. या वेळी मात्र त्याचे उत्पादन थोडे घटून १८ टनांवर आले. आता पुन्हा नव्याने ९० गुंठ्यावर ढोबळी मिरचीची लागवड केली असून तोडणी सुरू आहे. सुमारे २६ टन मालाची विक्री झाली आहे. सध्या २२ रुपये दर मिळत आहे.

    नगरचे मुख्य मार्केट गोमळवाडापासून बीडचे अंतर ४५ ते ५० किलोमीटर तर नगरचे अंतर ९० किलोमीटर आहे. दोन्ही ठिकाणच्या दरांचा अंदाज घेऊन मालाची विक्री होते. मुख्य मार्केट नगरचेच राहते. सध्या दररोज एक हजार किलो ढोबळीची दहा किलो पॅकिंगमधून नगरला विक्री सुरू  आहे.

    शेततळ्याचा आधार सिंदफणा मध्यम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या गोमळवाडा परिसराला मागील आठ-दहा वर्षे दुष्काळाचा टका सोसावा लागला. त्यामुळे भागवत यांनी २०१५-१६ मध्ये शेततळे घेतले. त्यात एक कोटी लिटर पाणी साठवण होते. दुष्काळात त्याचाच मोठा आधार असल्याने चांगले उत्पादन घेता आले. पावसाळ्यात विहीर व विंधनविहीरीच्या पाण्यावर तळे भरून घेतले जाते.

    ॲग्रोवनमधील यशकथा ठरल्या उपयुक्त भागवत सांगतात, की नोकरीचा वेळ सोडून सकाळी व संध्याकाळी शेतीत अधिक जीव रमतो. पाच वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग करीत आहे. ॲग्रोवनचे इंटरनेटवर दररोज वाचन करतो. त्यातील यशकथा अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन अधिक माहितीही घेतली आहे. राज्यभरातील कृषी प्रदर्शनांनाही ते भेटी देतात. दुष्काळी भागातही उत्तम नियोजनातून यशस्वी शेती करता येते असे ते सांगतात.

    भागवत यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • ढोबळी मिरची, खरबुजासाठी पॉलिमल्चिंग आणि गादीवाफ्याचा वापर.
  • पाण्याचे काटेकोर नियोजन करून उत्पादनावर भर. खतेही ठिबकद्वारे.
  • खुल्या शेतीत मिरचीचे उत्पादन घेतले जाते त्या वेळी किडी-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चहुबाजूंनी हिरव्या कापडाचा नेटसारखा वापर.
  • पट्टा पद्धतीने उसाची दोन एकर क्षेत्रावर लागवड.
  • पाच एकरांत तुरीचे ४० क्विंटल तर पाच एकरांत कापसाचे ५५ क्विंटल उत्पादन.
  • जीवामृत, सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचे प्रमाण कमी
  • उन्हाळ्यात शेततळ्याद्वारे पिके जगवतात.
  • नोकरी सांभाळूनही शेतीत उत्तम लक्ष.
  • एका ठिकाणच्या हलक्‍या जमिनीतही दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न
  • संपर्क : भागवत गर्जे, ९०११३४३५२५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT