मुर्सिया भागातील पाॅलीहाऊसमधील रंगीत ढोबळी मिरची व संबंधित शेतकरी
मुर्सिया भागातील पाॅलीहाऊसमधील रंगीत ढोबळी मिरची व संबंधित शेतकरी  
यशोगाथा

‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची, ‘प्रिसिजन फार्मिंग’चा नमुना

मंदार मुंडले

स्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी मिरचीच्या एका प्लॉटने ‘प्रिसिजन फार्मिंग’(काटेकोर शेती) प्रत्यय दिला. सुमारे सात हेक्टर क्षेत्रात संबंधित शेतकऱ्याने मल्टिटनेल व पारंपरिक अशा दोन्ही स्ट्रक्चर्समधील पॉलिहाउसेस उभारली आहेत. जाणवलेली ठळक निरीक्षणे

  • संपूर्ण प्लॉटचे पीक संरक्षण व्यवस्थापन जैविक पद्धतीने.
  • पावडरी मिल्ड्यूच्या (भुरी) नियंत्रणासाठी सल्फर बर्नर तंत्राचा वापर नावीन्यपूर्ण. हा थर्मासप्रमाणे त्याच्याच आकाराचा व उंचीचा.
  • खालील भागात इलेक्ट्रिकल कॉइल. त्यावर सल्फर पावडर असलेले उंच भांडे बसवले जाते.
  • ‘हीटिंग’केल्यानंंतर सल्फरचे सल्फर डायऑक्‍साईड वायूत रूपांतर होऊन त्याद्वारे भुरीचे नियंत्रण होते.
  • सल्फर कोळीचेही नियंत्रण करीत असल्याने दुहेरी हेतू साध्य
  • बर्नरच्या वापरामुळे फवारणी, मजूर, त्यावरील खर्च, वेळेतही बचत होत असावी.
  • प्रतिहेक्‍टरी ५० बर्नर्स अशी शिफारस. या बागेत हेक्‍टरी ३० या संख्येने त्यांचा वापर. सुमारे १० दिवसांतून एकदा. (संध्याकाळी)
  • काटेकोर व्यवस्थापन - ठळक बाबी

  • लागवड करतेवेळी ठिबकचा ड्रिपर रोपांजवळ. झाडांची पुरेशी वाढ झाल्यानंतर तो झाडापासून पाच ते सहा इंच लांब खड्ड्यात ठेवतात. बुरशीजन्य रोगांचा पाणी हा मुख्य स्रोत टाळण्याची ही पद्धत स्पेनमध्ये सर्वत्र.
  • मिरचीचे उत्पादन- १२ ते १४ किलो प्रतिचौरस मीटर
  • डिसेंबरला लागवड. हार्वेस्टिंग मार्च-एप्रिलला. सप्टेंबरपर्यंत संपते.
  • ज्यांत फक्त नत्र अाहे (उदा. युरिया) अशी खते देत नाहीत. त्याएेवजी १२-६१-०, पोटॅशियम नायट्रेट आदींचा वापर. मुळात खतांद्वारे नत्र अत्यंत मर्यादित. नैसर्गिकरीत्या उपलब्ध होईल यावर भर.
  • पोटॅशियम नायट्रेट व फॉस्फरस यांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास मिरचीची गुणवत्ता, आकार, चव, टिकवणक्षमता या सर्व बाबी जुळून येतात असा इथला अनुभव.
  • माती, पानदेठ यांचे परीक्षण करूनच खतांची मात्रा
  • मातीचा पीएच ८.५., हेक्‍टरी २५ हजार झाडे.
  • पाणी व्यवस्थापनात टेन्शिओमीटरचा वापर.
  • पाणी देऊन वाफे ओलावून घेणे, त्यानंतर प्लॅस्टिक अंथरणे व त्याखाली होणाऱ्या पाण्याच्या गरम वाफेद्वारे मातीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण या स्पेनमधील सामाईक पद्धतीचा येथेही वापर
  • सूर्यप्रकाश मोजूनच देतात प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या मोजून मापून केली जाते. मिरचीला सूर्यप्रकाश किती देता असा प्रश्न दौऱ्यात सहभागी गणेश मोरे यांनी विचारला. त्यावर पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार ३००० ते ३५०० लक्‍स तीव्रतेचा सूर्यप्रकाश दिला जातो. तो दिवसातले १२ तास मिळतो असे चर्चेतून निष्पन्न झाले. (स्पेनमध्ये दिवस खूप मोठा असतो. भारतात सहा वाजता होणारी संध्याकाळ स्पेनमध्ये रात्री १० वाजता होते.) मोरे यांनी आपल्या मोबाईलमधील ॲपद्वारे सूर्यप्रकाश तत्काळ मोजून पाहिला. तो १८०० ते २००० लक्‍स आढळला. वजनदार मिरची इथल्या प्लाॅटमधील रंगीत मिरची आकाराने मोठी, आकर्षक लाल व वजनदार होती. त्यात पोकळपणा कुठेही नव्हता. प्रत्येक मिरचीचे वजन २०० ते ३०० ग्रॅमपेक्षा कमी नसावे असाच सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पाण्याचे व्यवस्थापन सुधारावे लागेल गणेश मोरे म्हणाले की इथले शेतकरी पीक फार जोमाने वाढू देत नाहीत असे दिसले. अन्यथा फळे लागत नाहीत. ‘फ्रूट सेंटिंग’नंतर नत्राची गरज भासली तरच काही प्रमाणात पोटॅशियम नायट्रेट देतात. पाण्याचा पीएच ८ आहे. मात्र साडेसहा पीएच असलेले पाणी वापरतात. नायट्रिक ॲसिडचा वापर करून पीएच कमी केला जातो. आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत सुधारण्याची गरज आहे. मित्रकीटक ठरले रसायनांनाही भारी कीड नियंत्रणात व्यावसायिक मित्रकीटकांचा वापर हे स्पेनच्या ‘रेसिड्यू फ्री’ शेतीचे खरे रहस्य आहे. मिरचीचा हा प्लॉटही त्याला अपवाद नव्हता. पुढील भागात त्याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी हा रंजक किस्सा पाहूया. या फार्मचे कंसल्टंट म्हणाले, की १९८७-९० च्या दरम्यान या भागात थ्रिप्सचा (फुलकिडे) प्रचंड उद्रेक झाला. आठवड्याला होणारी रासायनिक फवारणी दिवसातून दोन वेळा करण्यापर्यंत वेळ आली. तरीही कीड आटोक्‍यात येईना. रसायनांचा अतिवापर करण्यारा भाग म्हणून आमचे नाव खराब होत होते. अखेर रसायनांचा वापर हे थ्रिप्स कंट्रोलवरचे उत्तर नाही. शाश्‍वत पर्यायच शोधावा लागेल याची जाणीव झाली. त्यातून मिळाला मित्रकीटकांचा पर्याय. ते रसायनांनाही भारी पडले. त्यांनी काम फत्ते करण्यास सुरवात केली. थ्रीप्स, मावा, पांढरी माशीदेखील नियंत्रणात येऊ लागली. आता थ्रिप्सच्या समस्येतून आमची सुटका झाल्याचे सांगताना कंसल्टंटच्या चेहऱ्यावर विजयश्री मिळवण्याचा भाव उमटला होता. ते म्हणाले की जितक्या जास्त प्रमाणात रसायने वापराल तेवढ्या अधिक समस्या तयार होतील. पूर्वी रसायनांचा खूप वापर करायचो, तेव्हा पक्षीही नजरेस पडायचा नाही. आता ते मुक्तपणे विहार करतात हेच आदर्श शेतीचे लक्षण आहे. रस्ते - देशाच्या प्रगतीची वाहिनी

  • रस्ते हीच कोणत्याही देशाच्या प्रगतीची मुख्य वाहिनी असते. स्पेनमध्ये त्याचा प्रत्यय येतो.
  • येथील शहरी तसेच महामार्गही प्रशस्त, चौपदरी, रेखीव.
  • ग्रामीण रस्ते अत्यंत पक्के.
  • प्रत्येक शेतातून प्रशस्त व मजबूत रस्ते. त्यामुळे मालाची वाहतूकही विनाप्रयास करणे शक्य.
  • रस्त्यांच्या वर गरजेनुसार पूल.
  • अत्यंत शिस्तबद्ध वाहतूक, ट्रॅफिकचे नियम मध्यरात्रीदेखील कोणी तोडत नाही.
  • रस्त्यांवर आखलेले मार्किंग्ज, दिशादर्शक फलक ठायी ठायी.
  • ताशी शंभर किलोमीटर वा त्याहून वेगाने वाहनाने वेळेत आपल्या ठिकाणी पोचणे शक्य.
  • एकाही रस्त्यावर टोल नाका किंवा ट्रॅफिक पोलिस नाहीत.
  • बहुतांश जण कारनेच प्रवास करतात. (‘लेफ्ट हॅंड ड्रायव्हिंग’)
  • संपर्क- मंदार मुंडले- ९८८१३०७२९४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT