एकरी १२० टन उत्पादन घेतलेला खोडवा ऊस  
यशोगाथा

खोडवा उसाचे तब्बल १२० टन उत्पादन

सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन ‘होय आम्ही शेतकरी’ या ‘व्हॉट्सॲप ग्रुपमधील महत्त्वाच्या सदस्यांपैकी कबाडे मुख्य सदस्य आहेत. शेतीतील सर्व नोंदी ते ठेवतात. मोबाईललाच त्यांनी आधुनिक नोंदवही बनवली आहे.

श्यामराव गावडे

सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश अप्पासाहेब कबाडे प्रयोगशील ऊस उत्पादक आहेत. लागवड उसाच्या एकरी १०० टन उत्पादनात त्यांनी कायम सातत्य ठेवले आहे. बियाणास तुटलेल्या उसाचा खोडवा ठेऊन त्याचे एकरी ---टन उत्पादन घेतले आहे. काटेकोर व्यवस्थापनाद्वारे खोडवा ऊसशेतीही आदर्शही त्यांनी शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे.   सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात कारंदवाडी गावचे शिवार लागते, कृष्णा नदीच्या पाण्याने समृध्द झालेला परिसर व निचऱ्याची जमीन यामुळे ऊस व भाजीपाला पिकांवर अधिक भर दिला जातो. कबाडे यांची ऊस शेती सुरेश कबाडे यांची कारंदवाडी गावात ३० एकर जमीन आहे. वडील अप्पासाहेब यांच्या काळात उसाचे एकरी ४० ते ५० टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळायचे. काटेकोर व्यवस्थापन व सुधारित तंत्राचा अवलंब यातून एकरी उत्पादन त्यांनी १०० ते १२० टनांपर्यंत नेले. उसावर ऊस घेतल्याने काही वेळा उत्पादन घटायचे. उपाय म्हणून केळी व हळदीद्वारे पीक फेरपालट सुरू केली. त्याचा बेवड चांगलाच फायदेशीर ठरला. कबाडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये १)दर्जेदार बेण्यासाठी आग्रही. स्वतःच्या शेतासाठीचे बेणे आपल्याच बेणेमळ्यात तयार करतात. उतिसंवर्धित (टिश्‍यू कल्चर) रोपांचा वापर. एकस्तरीय, द्विस्तरीय व त्रिस्तरीय पद्धतीने बेणे मळा विकसित करतात. २) खोडव्याचे व्यवस्थापन- बियाण्यासाठी तुटलेल्या खोडवा व्यवस्थापनासाठी गळितास तुटलेल्या खोडव्यापेक्षा चार महिने जादा मिळतात. त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला आहे. ३)खोडवा ऊसशेतीत बुडखे तासले जातात. बुरशीनाशकाची फवारणी होते. ४)उर्वरित पाला सरीत दाबून बैलाच्या नांगरीने बगला मारल्या जातात. ५)डीएपी, युरिया, पोटॅश व दाणेदार कीटकनाशक तसेच झिंक, मॅंगेनिज, मॅग्नेशियम, सिलिकाॅन, बोरॉन, सल्फर आदींचा जरुरीप्रमाणे वापर ६)पाचट काढून एक आड एक सरीत टाकले जाते. ७)पीएसबी, ॲझोटोबॅक्‍टर आदी जिवाणू खतांची ५० दिवसांनी, ६५ व ८० दिवसांनी आळवणी ८)चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर मशागत व लागवडीचा टप्पा हळद, केळी आदी पिके निघाल्यानंतर अवशेष रोटावेटरद्वारे जमिनीत गाडले जातात. पंधरा मेच्या दरम्यान सऱ्या सोडल्या जातात. हिरवळीच्या खतांसाठी ताग, धैंचा विस्कटला जातो.   खोडवा प्रयोग

  • रोपे २०१५ आॅगस्टमध्ये भरली.
  • सप्टेंबरमध्ये रोप (उतिसंवर्धित) लागवड केली
  • लागवडीचे अंतर- पाच बाय दोन फूट
  • बेणे मळ्यासाठी जून २०१६ मध्ये ऊस तुटला.
  • त्यानंतर खोडवा ठेवला. तो डिसेंबर २०१७ च्या सुमारास निघाला.
  • उत्पादन क्षेत्र- सव्वा चार एकर (दोन प्लाॅटसमध्ये विभागणी) -अडीच एकर- त्यात एकूण उत्पादन- २६० टन (एकरी १०४ टन) तर ७० गुंठे क्षेत्रात २१० टन. (एकरी १२० टन). खोडवा उसात आलेला खर्च- एकरी- सुमारे ४५ हजार रुपये. व्यवस्थापनातील मुख्य बाबी

  • दर्जेदार बेण्याची विक्री आठ हजार रुपये प्रतिगुंठा दराने केली जाते. त्यातून उत्पन्न वाढते.
  • हळदीचे एकरी ३० क्विंटलपर्यंत तर केळीचे ४० ते ४५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. केळीत वरंबा न ठेवण्याची पद्धत
  • पट्टा पद्धतीत जोड ओळ उथळ तर पट्टा खोल हा वेगळा प्रयोग
  • सर्व खते मातीआड केली जातात. सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतात मिसळून दिली जातात.
  • को ८६०३२ वाणाला प्राधान्य.
  • सुमारे बारा वर्षांपासून पाचट न पेटवता कुट्टी म्हणून वापर
  • एक डोळा किंवा रोप लागण.
  • महाराष्ट्र, कर्नाटकसह मध्य प्रदेश, गुजरातमधील शेतकऱ्यांची कबाडे यांच्या ऊस शेतीस भेट
  • सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन ‘होय आम्ही शेतकरी’ या ‘व्हॉट्सॲप ग्रुपमधील महत्त्वाच्या सदस्यांपैकी कबाडे मुख्य सदस्य -सुमारे तीन लाख शेतकरी या ग्रुपला ‘कनेक्‍ट’. डॉ. अंकुश चोरमुले, अमोल पाटील व अन्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन. वडील अप्पासाहेब कबाडे, पत्नी सौ. पद्मजा यांची मोलाची मदत. शेतीतील सर्व नोंदी ठेवतात. मोबाईललाच आधुनिक नोंदवही बनवली आहे. अन्य उत्पादनाची आकडेवारी

  • गेल्या वर्षी खोडवा उत्पादन- एकरी ८३ टनांपर्यंत.
  • लागवड ऊस- २०१३-१४- ११ एकर- ११२५ टन
  • २०१४-१५- चार एकर- ३० गुंठे- ५०२ टन
  • २०१५-१६- चार एकर- ४०६ टन
  • २०१६-१७- तीन एकर - ३०२ टन
  • संपर्क- सुरेश कबाडे - ९४०३७२५९९९

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

    Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

    Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

    APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

    Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

    SCROLL FOR NEXT