लातूर शहरापासून नजीक असलेल्या कोळपा येथे फिरोज मणियार हा युवक शास्त्रोक्त व बंदिस्त शेळीपालन करीत आहे. सुमारे पाच ते सहा वर्षांच्या या अनुभवसिद्ध व्यवसायातून वर्षाला सुमारे एक हजार शेळ्यांची विक्री करणे या युवकाला शक्य झाले आहे. ज्या शेळ्यांच्या जातींना मागणी अाहे अशांच्याच संगोपनावर भर देत बाजारपेठ हस्तगत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. लातूर शहरापासून काही किलोमीटरवर असलेल्या कोळपा येथे मणियार कुटुंबाची सुमारे २१ एकर शेती आहे. या शेतात पूर्वी हंगामी पिके घेतली जायची. मात्र पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी जोड व्यवसाय करावा असे या कुटुंबाला वाटत होते. कुक्कुटपालन, शेळी, दुग्ध आदी व्यवसायांवर चर्चा होऊन अखेर शेळीपालन करायचे नक्की झाले. कुटुंबाचा बांगड्या विक्री व कपड्यांच्या होलसेल विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कुटुंबातील फिरोज व्यवसाय सांभाळून शेतीही पाहतात. व्यवसायाची सुरवात शेळीपालनाला सुरवात करण्यापूर्वी फिरोज यांनी राज्यातील काही ठिकाणांना भेटी दिल्या. व्यवसायाचे अर्थकारण समजावून घेतले. हा व्यवसाय यशस्वी व अयशस्वी होण्याची कारणेही जाणून घेतली. शेळीपालन आपण करू शकतो हे लक्षात आल्यानंतर डिसेंबर २०११ मध्ये काही उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन सुरू केले. नवखा अनुभव व काही तांत्रिक कारणांमुळे यातील काही शेळ्या दगावल्या. पण फिरोज खचले नाहीत. व्यवसाय बंद न करता झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा सल्ला वडिलांनी दिला. सिरोही, आफ्रिकन बोअरने दिली उभारी अभ्यासांती अजून दणकट व सक्षम तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या शेळ्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानातून सुमारे २०० सिरोही शेळ्या आणल्या. त्याचबरोबर आफ्रिकन बोअर जातीच्या पाच मादी व एक नर फलटण येथील एका प्रसिद्ध संस्थेतून खरेदी केल्या. खरेदी करताना शेळ्यांचे वय सुमारे अडीच महिन्यांचे होते. शेळीपालन व्यवस्थापन
खुराकाचे काटेकोर नियोजन
विक्री व्यवस्थापन
विक्री वजनावर (प्रति किलो)
लेंडी खतातून उत्पन्न शेळी विक्रीव्यतिरिक्त लेंडीखताच्या विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. सुरवातीच्या काळात लेंडीखताचा वापर ते आपल्या शेतीसाठीच करायचे. परंतु त्यात वाढ झाल्याने उत्पन्नाचा नवा मार्ग मिळाला. गेल्या वर्षी तीन हजार तर या वर्षी साडेचार हजार बॅग्ज एवढ्या लेंडीखताची विक्री साध्य झाली. प्रति २० किलो खताची बॅगेचा ४०० रुपये दर आहे. शेळी संगोपनगृहात लेंड्या जमा करून त्या वर्षभर खड्ड्यात कुजवल्या जातात. त्यानंतर ग्राईडिंग मशिनमधून पावडर तयार करून ती बॅगेत भरली जाते. पाण्याचा पुनर्वापर ‘गोट फार्म’मध्ये प्रवेश केला की एरवी शेळ्यांचा व त्यांच्या मलमूत्राचा विशिष्ट पसरलेला गंध येतो. तो कमी करण्यासाठी व शेळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिरोज फार्मच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतात. शेळ्यांसाठीचा प्लॅटफॉर्म पाण्याने नियमित स्वच्छ केला जातो. हे पाणी हौदात जमा होईल अशी व्यवस्था केली आहे. कुटारखाना
शेळीची वैशिष्ट्ये सिरोही प्रामुख्याने राजस्थानात आढळते. दूध व मांसासाठी सांभाळली जाते. दणकट, काटक असून रंगाने बदामी किंवा करड्या ठिपक्याची. एक वर्षे वयाच्या मादीचे वजन ३० ते ४० किलो तर नराचे वजन ४० ते ५० किलोपर्यंत. शेळीची उंची सरासरी ६० ते ७० सेंमी. बोअर शेळी मूळ दक्षिण आफ्रिकेतील. जगभर प्रसार. शरीराने धिप्पाड व काटक, वजनदार, दिसायला आकर्षक, चांगली दूध उत्पादनक्षमता. यामुळे अधिक लोकप्रिय. कोणत्याही प्रतिकूल हवामानात टिकण्याची क्षमता. त्यामुळे तिचा झपाट्याने प्रसार होतो. रंग पांढरा, डोक्यावर, मानेवर तांबडा, चॉकलेटी रंग, आखुड केस. एक वर्ष वयाच्या मादीचे वजन ४० ते ५० किलो तर नराचे वजन ७० किलोपर्यंत असते. संपर्क- फिरोज मणियार- ९१७५८६०७८६ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.