आटपाडी (जि. सांगली) येथे दर शनिवारी शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. ड्रोनच्या साहाय्याने त्याचे घेतलेले छायाचित्र.
आटपाडी (जि. सांगली) येथे दर शनिवारी शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. ड्रोनच्या साहाय्याने त्याचे घेतलेले छायाचित्र.  
यशोगाथा

चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी बाजाराला...

Abhijeet Dake

आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी देशी शेळ्या व माडग्याळी मेंढ्यांचा बाजार भरणारा बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. चाळीस वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या या बाजारात पाच ते सात हजार जनावरांची आवक होते. उलाढालही साधारण सव्वा कोटी रुपयांच्या घरात होते.    

सांगली जिल्ह्यातील कायम अवर्षणग्रस्त भाग कोणते असे विचारले तर आटपाडी तालुक्याचे नाव त्यात प्रकर्षाने येते. तालुक्‍यात आता टेंभू योजनेचं पाणी आलं आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. डाळिंब शेतीसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. उसाचे क्षेत्रही वाढताना दिसते आहे. मात्र टेंभूचं पाणी वेळेत मिळत नाही. यामुळे शेती पिकवण्याचं मोठं आव्हान आजही तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पेलावं लागतं. शेळीपालनातही अोळख तालुक्‍याची आणखी एक विशेष अोळख देशी शेळीपालनासाठी आहे. तालुक्‍यात घरटी शेळी पाहायला मिळते. यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. हेच महत्त्व लक्षात घेऊन आटपाडीला शेळ्यांचा आठवडी बाजारही भरतो. त्याची सर्वत्र चांगली अोळख आहे. बाजाराचे महत्त्व, इतिहास सन १९७२ मध्ये आटपाडी बाजार समितीची स्थापना झाली. त्याअाधी आठवडी बाजार भरायचाच. पण त्याचा विस्तार मर्यादित होता. बाजार समितीच्या स्थापनेनंतर मात्र शेळ्या-मेंढ्यांच्या बाजाराला व्यापक रूप आले. तसं पाहिल तर आजमितीस या बाजारास ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. वाढताहेत शेळीपालन फार्म्स तालुक्‍यात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात चार-सहा शेळ्या असतात. आता शेळ्यांना मागणीही वाढू लागली आहे. आटपाडीच्याच बाजारातून त्यासाठी खरेदी होते. आर्थिक महत्त्व लक्षात घेता शेजारील तालुक्‍यांतील शेतकरीही बंदिस्त देशी शेळीपालनाचे फार्म्स उभे करण्यासाठी पुढे येत आहेत. शेळ्यांना का वाढली मागणी? -दुष्काळी भाग असल्याने शेळ्या-मेंढ्या माळरानात संचार करतात. मुक्तपणे विविध पाला चरतात. या वृत्तीतून शेळी काटक होते. आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे हव्या त्या प्रकारचे शेळीचे वजन मिळते. -मुख्यत्वे पैदाशीसाठी देशी बोकडांना मागणी राहते. आठवडी बाजाराचे स्वरूप

  • दर शनिवारी भरतो
  • शेळ्या-मेंढ्यांबरोबर धान्य, देशी कोंबड्या, वैरण, देशी अंडी यांचीही उलाढाल या ठिकाणाहून येतात शेळ्या, माडग्याळी मेंढ्या
  • आटपाडी
  • कवठेमहांकाळ
  • सांगोला (सोलापूर)
  • मंगळवेढा (सोलापूर)
  • माण (जि. सातारा)
  • खरेदीसाठी येथून येतात ग्राहक

  • गोवा
  • कर्नाटक
  • कोल्हापूर
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सातारा
  • सिंधुदुर्ग
  • बाजार स्वरूप
  • आवक- ५००० ते ७०००
  • देशी शेळ्या आणि बोकड - ७० टक्के
  • माडग्याळी मेंढ्या - ३० टक्के
  • दर (प्रति नग)
  • शेळी- ५ हजार ते ११ हजार रु.
  • बोकड- ३ हजार ते ८ हजार रु.
  • माडग्याळी मेंढी- ७ हजार ते १० हजार रु.
  • आठवड्याची उलाढाल- ९० लाख ते सव्वा कोटी रुपांपर्यंत
  • खरेदी विक्रीवर बाजार समितीचे नियंत्रण
  • रोखीने होतात व्यवहार
  • दुष्काळी पट्ट्यात चाराटंचाई असल्याने बहुतांश शेळीपालकांना उदरनिर्वाहासाठी तालुका सोडून बाहेर जावे लागते. पावसाळा सुरू होण्याअाधी ते घरी परततात. मग बाजार हळूहळू फुलू लागतो. दिवाळी दरम्यान तो भरगच्च असतो.
  • या सुविधांची शेतकऱ्यांनी केली मागणी

  • स्वच्छ पिण्याचे पाणी
  • स्वच्छतागृह
  • बाजार ओढापात्राच्या परिसरात भरतो. हा परिसर स्वच्छ हवा.
  • प्रतिक्रिया वडिलांच्या काळापासून शेळीपालन करतो. आजमितीस २०० मेंढ्या आणि ५० शेळ्या आहेत. गेल्या वीस वर्षापासून आटपाडी बाजाराचा मोठा आधार आहे. येथे मागणीही अधिक आणि दरही अपेक्षित मिळतो.

    -यशवंत मारुती हजारे बेरी चिंचोली, ता. सांगोला, जि. सोलापूर.   हा बाजार नक्कीच दोन पैसे जादा देणारा आहे. देशी शेळीला इथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दरात सुमारे ५ ते १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. माझ्याकडे ५० शेळ्या आहेत. वर्षाला संगोपनासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येतो. शेळ्या दिवसभर चरण्यासाठी बाहेरच असतात. त्यामुळे आजारी पडत नाहीत. -जालिंदर सूर्यवंशी खानजोडवाडी, ता. आटपाडी.   माझी शेती नाही. उदरनिर्वाहाचे साधन व उद्योग म्हणून १० ते १२ देशी शेळ्यांचे संगोपन केले आहे. मुलांचे त्यावरच शिक्षण होते. -अरुणा वाघमारे दिघंजी, ता. आटपाडी, जि. सांगली   प्रत्येक बाजारात पाच ते सात हजार जनावरांची आवक होत सव्वा कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातून तालुक्‍यात बाहेरून चलन येते. हा बाजार धान्यासह अनेक गोष्टींसाठीही प्रसिद्ध आहे. शशिकांत जाधव -सचिव, आटपाडी बाजार समिती संपर्क- ९४२१११५६२८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

    Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

    Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

    SCROLL FOR NEXT