महाजन बंधूंचे केळीसाठी अत्याधुनिक पॅकहाऊस
महाजन बंधूंचे केळीसाठी अत्याधुनिक पॅकहाऊस 
यशोगाथा

महाजन बंधूंचे केळीसाठी अत्याधुनिक पॅकहाऊस

Chandrakant Jadhav

तांदलवाडी (जि. जळगाव) येथील प्रेमानंद व प्रशांत या महाजन बंधूंनी फिलिपाइन्स देशातील तंत्रावर आधारित केळीसाठी अत्याधुनिक पॅक हाऊस उभारले आहे. एका निर्यातदार कंपनीला त्याद्वारे ग्रेडिंग, पॅकिंग व पुरवठ्याची सेवा देण्यात येत आहे. त्यापोटी क्विंटलमागे निश्‍चित रक्कम महाजन यांना मिळते. दिवसाला ४० टन केळीवर येथे प्रक्रिया होते. निर्यातदार केळीसाठी अन्य शेतकऱ्यांनाही त्याद्वारे अधिक दर मिळू लागले आहेत. तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) या तापी नदीकाठील गावात जवळपास सर्व शेतकरी निर्यातक्षम केळी पिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गावातील प्रेमानंद हरी महाजन व प्रशांत वसंत महाजन यांची प्रत्येकी १५० एकर शेती आहे. दोघेही चुलतबंधू असून, प्रत्येकी एक लाख झाडांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे होत असावे. पॅकहाऊसची उभारणी निर्यातक्षम केळी उत्पादन व उच्च तंत्रज्ञान वापरण्यात महाजन बंधूंचा हातखंडा आहे. आपल्याबरोबर अन्य निर्यातक्षम केळी उत्पादकांच्या हितासाठी त्यांनी काळाची गरज ओळखून २०१६ मध्ये पॅक हाऊस उभारण्याचे ठरवले. जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी मार्गदर्शन व मदत केली. फिलिपाइन्स हा केळी उत्पादनातील जगात आघाडीवरील देश आहे. तेथील तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तशी यंत्रणा देशात बनवून घेण्यास सुरुवात झाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडूतही पॅकहाऊसची पाहणीही केली. सर्व अभ्यासातून फिलिपिन्स धर्तीवरचे अत्याधुनिक पॅक हाऊस उभारण्यात यश आले. राज्यातील अशा प्रकारचे ते एकमेव असावे, असे महाजन बंधूंना वाटते. असे आहे पॅक हाऊस

  • १६ हजार चौरस फूट बांधकाम
  • दीड कोटी रुपये खर्च
  • गावातील राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून सहकार्य
  • राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून ४० टक्के अनुदानाचा प्रस्ताव महाजन यांच्याकडून सादर
  • सध्या एका निर्यातदार कंपनीला त्याचा लाभ देण्यात येतो
  • त्याद्वारे दररोज ४० मे. टन क्लिनिंग, ग्रेडिंग व पॅकिंगची सोय
  • कंपनीसाठी तांदलगाव भागातून केळीपुरवठाही
  • अशी होते प्रक्रिया

  • एक टन वाहतूक क्षमतेच्या मालवाहू वाहनातून केळी पॅकहाऊसमध्ये येते
  • पाण्याच्या मोठ्या हौदात स्वच्छता. हौदानजीक ‘सिलेक्‍टर’द्वारे दर्जेदार फण्या दुसऱ्या हौदात टाकण्यात येतात
  • केळीच्या ग्रेड्‍स- ए, बी, सी, डी,
  • स्वच्छतेनंतर वजन
  • पंख्याच्या हवेत वाळवून लेबलिंग. (आठ लहान आकाराचे पंखे)
  • प्लॅस्टिकच्या पिशवीत केळी भरली जाते. साडेतेरा किलो वजनाच्या बॉक्समध्ये ठेवली जाते
  •  त्यातील हवा काढल्यानंतर बॉक्‍स प्री कूलिंग चेंबरमध्ये ठेवले जातात
  • बॉक्सवर कंपनीचे ब्रॅण्डनेम असते
  • मागणीनुसार २० टन क्षमतेच्या रेफर व्हॅन कंटेनरमधून केळी मुंबई बंदरात
  • तेथून जहाजाने विविध आखाती देशांमध्ये रवाना
  • जूनपर्यंत पॅकहाऊसमध्ये काम. या काळात वादळी वारे व तापमानामुळे केळीचा दर्जा घसरतो. निर्यातक्षम केळी कमी उपलब्ध असते. यामुळे निर्यातही कमी होते
  • पश्‍चिम बंगालमधील कुशल मजूर येथे कार्यरत. त्यांना दीड रुपये प्रतिकिलो अशी मजुरी
  • दर महिन्याला ४० हजार रुपयांपर्यंत वीजबिल
  • यंदा २५० कंटेनरची निर्यात? महाजन बंधू काही निर्यातदार कंपन्यांना तांदलगाव परिसरातून केळीचा पुरवठाही करतात. मागील हंगामात विविध कंपन्यांच्या माध्यमातून २१० कंटेनर (प्रतिकंटेनर २० टन) केळी निर्यात झाली. यंदा जूनपर्यंत २५० कंटेनर निर्यात होईल, असा महाजन यांचा अंदाज आहे. पॅकहाऊसचा शेतकऱ्यांना फायदा निर्यातक्षम केळीच्या पॅकहाऊस सुविधेसाठी महाजन संबंधित कंपनीकडून प्रिमीयम दर घेतात. तो प्रतिक्विंटल १०० रुपये जादा असू शकतो. हे पैसे महाजन आपल्या शेतकऱ्यांना पास करतात. मागील हंगामात कमाल १४५० रुपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाले. तांदलवाडीनजीक बलवाडी, हतनूर, सुनोदा, मांगलवाडी, उदळी येथील शेतकरीही यात सहभागी आहेत. फ्रूटकेअर तंत्राची केळी

  • निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी या भागातील शेतकरी ‘फ्रूटकेअर’ तंत्राचा वापर करतात.
  • यात पुढील बाबींचा समावेश
  • ऊतिसंवर्धित रोपे, साडेबाच बाय सहा फुटांवर लागवड, ठिबक, मल्चिंग पेपर
  • घडाची काळी फुले (फ्लोरेट) काढणे, आठ ते नऊ फण्या ठेवणे
  • घडांना स्कर्टींग बॅग
  • किमान सात ते आठ इंच लांबी व ४२ ते४५ कॅलिपर घेर
  • प्रशांत महाजन-९८९०८१०३५७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT