कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी पशुपालन
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी पशुपालन 
यशोगाथा

कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी पशुपालन

Santosh Munde

द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक शेतकऱ्याचे पशुपालनाकडेही तेवढेच लक्ष आहे. प्रत्येकाच्या गोठ्यात गाय, म्हैस, बैल यांसह किमान चार शेळ्या, मेंढ्याही दिसतात. २०१२ मध्ये झालेल्या ऐकोणीसाव्या पशुगणनेनुसार कडवंचीमध्ये ४३६ बैल, ३०५ गायी, ९३ म्हशी, २०२ मेंढ्या आणि १९ शेळ्या होत्या. सध्या होत असलेल्या पशुगणनेत ही संख्या निश्‍चितच वाढलेली असेल.

गावात किरकोळ स्वरूपात शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. प्रामुख्याने दुभत्या गायी, म्हशी या केवळ घरापुरते दुभते राहावे आणि शेतीला पुरेसे शेणखत उपलब्धतेसाठीच सांभाळल्या जातात. शेतीकामाच्या व्यापातून वेळ मिळाला आणि थोडेफार अधिकचे दूध शिल्लक राहात असेल तर जालना-सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना विक्री केली जाते.

शेळीपालनाकडे कल वाढला

दुभती जनावरे, शेळ्या केवळ दुभत्यासाठी नाही तर शेतीला शेणखत मिळावे म्हणून आम्ही सांभाळतो. गावातील बहुतांश शेतकरी याच उद्देशाने शेळीपालन, म्हैसपालन, गाईपालन करतात. बायोगॅस स्लरीमुळे जमिनीचा पोत टिकवून ठेवण्यास आम्हाला मदत होते. माझ्याकडे दोन गीर व एक संकरीत गाय आहे. याशिवाय दहा शेळ्या आहेत. गावातील प्रत्येकाच्या गोठ्यात किमान दोन, तीन शेळ्या दिसतात. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचा शेळीपालनाकडे कल वाढला आहे. - कैलास क्षीरसागर, पशुपालक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT