Banavali breed coconut. And Chaughat Orange Dorf Coconut. 
यशोगाथा

नारळासह मसाले पिकांसाठी भाट्ये येथील संशोधन केंद्र

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. वाणनिर्मितीपासून ते प्रक्रियेपर्यंतचे संशोधन व प्रयोग येथे सुरू असतात. नारळासह मसाला पिके, कलमे यांच्यासह अन्य तंत्रज्ञानही शेतकऱ्यांसाठी येथे अनुभवण्यासाठी कायम उपलब्ध असते.

राजेश कळंबटे

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. वाणनिर्मितीपासून ते प्रक्रियेपर्यंतचे संशोधन व प्रयोग येथे सुरू असतात. महसुली उत्पन्नातही केंद्र आघाडीवर आहे. नारळासह मसाला पिके, कलमे यांच्यासह अन्य तंत्रज्ञानही शेतकऱ्यांसाठी येथे अनुभवण्यासाठी कायम उपलब्ध असते. कोकणात नारळ पिकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रत्नागिरी- भाट्ये येथे दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठांतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. केंद्र सरकारने एक जुलै १९५५ मध्ये सुरू केले. सन १९६८ मध्ये ते महाराष्ट्र राज्याकडे वर्ग करण्यात आले. विविध जाती, उत्पादनवाढीसह पिकाबाबत सर्वांगीण संशोधन व प्रयोग येथे कायम सुरू असतात. डॉ. वैभव शिंदे केंद्रप्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. केंद्राचे क्षेत्र सुमारे २५. ८४ हेक्टर असून, लागवडीखालील क्षेत्र २२.५० हेक्टर आहे. त्यात चार हजार ६४५ विविध प्रकारची नारळाची झाडे आहेत. सन १९५७ पासून २७ जातींचा संग्रह येथे करण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मसाला पिकांच्या म्हणजे जायफळ, दालचिनी, ‘ऑलस्पाइस’ वाणांचा संग्रहही येथे पाहण्यास मिळतो. विविधांगी प्रयोगांद्वारे शिफारशीही प्रसारित केल्या आहेत. बाणवली या स्थानिक जातीपासून निवड पद्धतीने प्रताप आणि कोकण भाट्ये कोकोनट हायब्रीड १ या संकरित जाती विकसित केल्या. बाणवली, लक्षद्वीप ऑर्डिनरी, फिलिपाइन्स, फिजी, केरा संकरा आणि चंद्रसंकरा, गोदावरी गंगा या सात जाती शिफारशीत केल्या. वाणांची वैशिष्ट्ये

  • प्रताप- नारळ आकाराने मध्यम, गोल. उत्पादन सुरू होण्यास सहा ते सात वर्षे लागतात. एका झाडापासून दीडशेपर्यंत नारळ मिळू शकतात.
  • कोकण भाट्ये कोकोनट हायब्रीड १ डी बाय टी २ - पाचव्या वर्षापासून उत्पादन. सरासरी प्रति वर्षी प्रति माड १२२ पर्यंत नारळ. प्रति नारळ खोबऱ्याचे वजन १६९ ग्रॅम.
  • लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा)ः नारळाच्या तीनही कडा उठावदार. प्रति माड सरासरी १५० फळे. सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे. तेलाचे प्रमाण ७२ टक्के.
  • टी बाय डी (केरासंकर)- फुलोरा कालावधी ६ ते ७ वर्षे. प्रति माड उत्पादन वर्षाला १४६ ते १५०. तेलाचे प्रमाण ७२ टक्के. या संकरित जातीची रोपे केंद्रावर तयार केली जातात.
  • केराचंद्रा (फिलिपाइन्स ऑर्डिनरी) ः उंच प्रकारातील जात. नारळ आकाराने फार मोठे. प्रति नारळापासून सरासरी २१५ ग्रॅम खोबरे. उत्पादन ९४ ते १५९ प्रति माड. तेलाचे प्रमाण ६९ टक्के.
  • -बाणवली- आयुष्य ७० ते ८० वर्षे. सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. प्रति माडापासून प्रतिवर्ष ५० ते १००, तर सरासरी ८० नारळ मिळतात.
  • * केरा बस्तर (फिजी)- ११० नारळ वर्षाला प्रति माड. प्रति हेक्टरी २.९७ टन खोबरे मिळते.
  • डी बाय टी (चंद्रासंकरा)- या संकरित जातीला फळधारणा ४ ते ५ वर्षांत. माडाला ५० ते २०० पर्यंत, तर सरासरी १४० फळे. खोबऱ्याचे प्रमाण १६० ते २३० ग्रॅम. तेलाचे प्रमाण ६८ टक्के.
  • गोदावरी गंगा- फुलोऱ्यासाठी साडेचार ते पाच वर्षे लागतात. सरासरी उत्पादन प्रति माड वर्षाला ९६. खोबरे २३० ग्रॅम, तर तेलाचे प्रमाण ६४.०५ टक्के.
  • मसाला पिकांची लागवड केवळ नारळावरील अर्थकारण पुरेसे ठरत नाही. त्यामुळे आंतरपीक वा मिश्रपीक म्हणून मसाला पिकांच्या प्रयोगातून लाखीबाग संकल्पना विकसित केली. त्यानुसार एक एकर नारळ लागवडीत ७० नारळाची, १४० काळी मिरी, ५४ जायफळ, २४६ दालचिनी, २४६ केळी व चार हजार ३२० अननस अशी झाडे लावावीत. १० ते १२ वर्षांच्या मेहनतीतून बागायतदाराला वर्षाला नारळापासून एक लाख रुपये व उर्वरित पिकापासून अन्य उत्पन्न मिळू शकते. प्रयोगशाळा वातावरणातील बदलांचा नारळावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. विविध किडींची ओळख, उपाययोजना या अनुषंगाने केंद्रात प्रयोगशाळा कार्यरत आहे. कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे येथे कार्यरत असून, मित्रकीटकांवरही येथे काम होते. काय अनुभवता येईल केंद्रात?

  • नारळ बाग व्यवस्थापन
  • नारळाचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे
  • जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळा
  • नारळ झाडावर शिडीच्या साह्याने चढण्याचे प्रशिक्षण
  • व्हर्जिन कोकोनट ऑइल बनवणे (उष्ण आणि थंड अशा दोन्ही प्रकिया पद्धतींचा वापर करून निर्मिती. हे तेल आरोग्यदायी आहे. काही शेतकऱ्यांकडून बनवूनही घेतले आहे.)
  • मधुमक्षिकापालन प्रशिक्षण
  • सुपारी लागवड प्रशिक्षण व मार्गदर्शन
  • नारळाच्या झावळापासून गांडूळ खतनिर्मिती प्रात्यक्षिक (झाडू, झापा तयार करणे)
  • नारळापासून साखरनिर्मिती प्रात्यक्षिक
  • केंद्राला दरवर्षी शेतकऱ्यांसह सुमारे २० हजार व्यक्ती भेट देतात. यात प्रशिक्षण कार्यक्रम, प्रक्षेत्र पाहणी, सहलींचा समावेश.
  • महसुली उत्पादनात अग्रेसर

  • सध्या वर्षाला काही लाख ते एक कोटीपर्यंत उत्पन्न केंद्राला मिळते. नारळ रोपे, मसाला पिकांची कलमे, मसाला पदार्थ, गांडूळ खत हे उत्पन्नस्रोत आहेत. दहा वर्षांपूर्वी हे उत्पन्न ५० लाख रुपयांच्या घरात होते.
  • आजमितीस २५ ते ३० हजार नारळ रोपांची विक्री, ३० हजारांपेक्षा अधिक मसाले रोपे,
  • दालचिनी साल २५० किलो, जायपत्री व तमाल पत्री प्रत्येकी १५ किलो याप्रमाणात विकली जाते. काळी मिरी, हिरवी मिरी, केळी आणि अननस यामधूनही किरकोळ उत्पन्न केंद्राला मिळते.
  • संपर्क ः डॉ. वैभव शिंदे, ९४२२४२५७२७ वरिष्ठ शास्त्रज्ञ

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

    Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

    Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

    Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

    Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

    SCROLL FOR NEXT