Directors and office bearers of the company including the warehouse and machinery of the company.
Directors and office bearers of the company including the warehouse and machinery of the company. 
यशोगाथा

शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढी

Chandrakant Jadhav

शेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध व्हावीत यासाठी चांगदेव (जि.जळगाव) येथे काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा गट कार्यरत झाला. विश्वासार्हता, उत्कृष्ट सेवा, सातत्य व प्रयत्नांतून गटाने भरारी घेतली. पुढे जाऊन कृषी विज्ञान मंडळ व त्याही पुढे शेतकरी उत्पादक कंपनी असा यशस्वी प्रवास गटाने केला आहे. त्यातून प्रगतीची गुढीच जणू उभारली आहे.  जळगाव जिल्ह्यात चांगदेव (ता. मुक्ताईनगर) हे तापी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. केळी, कपाशी व मका ही इथली मुख्य पिके असून काळी कसदार जमीन गावशिवारात आहे. केळी बागायतदार गावात अधिक आहेत. व्यावसायिक व नगदी पिकांमध्ये अलीकडील काळात यांत्रिकीकरण वाढले आहे. मजूरटंचाईची मोठी समस्या आहे. ही परिस्थिती गावातीलवीर गुर्जर शेतकरी बचत गटाने ओळखली. शेतकऱ्यांना कमी दरात अवजारे व साहित्य भाडेतत्वावर देण्याची योजना आखली. मिळावे यासाठी 2007 मध्ये वीर गुर्जर शेतकरी बचत गटाने शेती उपयोगी अवजारे घेतली. या गटात गोकूळ श्रावण पाटील, सदानंद लक्ष्मण चौधरी, ज्ञानेश्‍वर ओंकार पाटील, रवींद्र विठ्ठल चौधरी, चंदन दिलीप पाटील, विनायक बाजीराव पाटील, अतुल युवराज पाटील, गजानन रामचंद्र चौधरी, प्रदीप काशिराम पाटील, किरण बाबूराव महाजन, सचिन मधुकर महाजन यांचा सहभाग आहे. अवजारांची विविधता  सुरवातीला बैलजोडीचलित अवजारे घेतली. गटातील प्रत्येक सदस्यांकडून २०० रुपये प्रति महिना यानुसार सहा महिने निधी संकलन झाले. अवजारे वापरापोटी शेतकऱ्यांकडून रक्कमही येत होती.टप्प्याटप्प्याने करीत आजघडीला २५ लाख रुपयांपर्यंतची अवजारे या गटाकडे आहेत. ट्रॅक्‍टरचलित अवजारे असून सरी पाडणारे यंत्र, केळीची खोडे काढण्यासाठी यू पास, कलिंगडासाठी गादी वाफे, जमीन सपाटीकरण, वरंबा तयार करणे, केळीची खोडे काढून जमीन भुसभुसीत करणे, बैलजोडी चलित कोळपे, वखर, हरभरा, मका व गहू पेरणी यंत्र, केळीच्या झाडांना माती लावण्याचे अवजार, सायकलचलित कोळपे आदी विविधता आहे. कीडनाशके फवारणीचे ५० नॅपसॅक आहेत. २० रुपये प्रति दिन असा त्याचा दर आहे. बैलजोडीचलित अवजारे ५० रुपये, ट्रॅक्‍टरचलित यंत्र २०० रुपये प्रति दिन दराने दिली जातात. काही महाग यंत्रांचा दर हाच दर  एक हजार रुपये आहे. पाण्याचे दोन टॅंकर (प्रति पाच हजार लिटर क्षमता), प्लॅस्टिकच्या मोठ्या ८० टोपल्या, ५०० व २०० लिटर क्षमतेच्या २० प्लॅस्टिक टाक्‍या, लग्न व अन्य कार्यासाठी गॅसचलित टाक शेगड्याही आहेत. यंत्रांसाठी कृषी विभागाचे अनुदान मिळाले.   कृषी विज्ञान मंडळ कार्यरत  ‘वीर गुर्जर’ गटातील गोकूळ पाटील व अन्य तिघांनी पुढाकार घेऊन श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळाची २००८-०९ मध्ये स्थापना केली. त्यातून प्रक्रिया युनिट उभारले. साडेपाच लाख रुपये निधी त्यासाठी लागला. शासनाकडून सात लाख रुपये अनुदानाच्या मदतीने धान्य साठवणूक गोदामही गावातच उभारले. हरभरा बिजोत्पादन उपक्रम हा गट राबवितो. दरवर्षी किमान ३०० क्विंटल बियाण्याची विक्री खासगी कृषी केंद्र व या गटाकडून केली जाते. ६० रुपये प्रति क्विंटल दरात धान्याची स्वच्छता, प्रतवारी यासंबंधीचे कामही युनिटमध्ये  केले जाते. चांगदेवनजीकच्या चिंचोल, मेहूण, वाढवा, कासारखेडा या गावांमधील शेतकरी या सुविधांचा लाभ घेतात. यांत्रिकीकरण योजनेतून मंडळाने ट्रॅक्‍टर, ट्रॅक्‍टरचलित अवजारे, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र मंडळाने घेतली. डीएपी- युरिया मिश्रित ब्रिकेटस निर्मितीही सुरू केली आहे.केळी उत्पादकांना त्याचा लाभ होतो.  शेतकरी उत्पादक कंपनी  कृषी विज्ञान मंडळ व बचत गटातील शेतकऱ्यांनी पुढे जाऊन एक पाऊल टाकले. त्यांनी २०१५ मध्ये संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. पाच गावांमध्ये त्या अंतर्गत १० शेतकरी गट स्थापन केले. प्रत्येक गटात १५ शेतकरी आहेत. एकूण ५३६ शेतकऱ्यांनी मिळून पाच लाख १३ हजार भागभांडवल उभे केले. गटाला ‘आत्मा’ अंतर्गत साडेतेरा लाख रुपये अनुदान मिळाले. सुमारे १८ लाख रुपयांच्या निधीतून मका ड्रायर यंत्रणा आणली. एक हजार चौरस फूट गोदाम उभारले आहे.  विविध सुविधा  गावात खते, कीडनाशके, पीव्हीसी, अन्य पाइप्स व किरकोळ साहित्य विक्रीही कंपनीने सुरू केली आहे. माफक दरात निविष्ठा उपलब्ध केल्या जातात. आरती चौधरी या कलाशाखेतील पदवीधर शेतकरी कंपनीच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या माहेरी शेतीचे वातावरण नव्हते. सासरी म्हणजेच चांगदेवला त्यांनी आपल्या शेतकरी कुटुंबात शेतीचे व्यवस्थापन, पीक पद्धती, प्रक्रिया अभ्यासली. काही जबाबदाऱ्या स्वीकारल्या. घरच्या ६५ एकर शेतीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. या सर्व बाबींचा लाभ त्यांना कंपनीचे व्यवस्थापन सांभाळताना होत आहे. अडीच कोटींची उलाढाल करण्यापर्यंत कंपनीने मजल मारली आहे. गावासह परिसरातील शेतकऱ्यांकडील मक्यावर प्रक्रिया, धान्य साठवणूक, धान्य साठवणुकीवर कर्ज योजना आदी कामे कंपनी करते. हरभरा बिजोत्पादनातही सहभाग आहे.  - गोकूळ पाटील  ९१३०९१५५२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT