Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; काही भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

Rain update : राज्यातील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

अनिल जाधव

Weather Update : राज्यात रब्बीची पेरणी आता वेगाने सुरु आहे. पण पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यातील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर रत्नागिरी जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या म्हणजेच मंगळवारी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये विजा, ढगांच्या गडागडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील दोन दिवस या पाच जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT